आम्ही चिरीमिरी आंदोलन करत नाही. ते लोक घरी परतले नसते. असा हल्लाबोल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. राजकोट येथे ठाकरे गट आणि राणे समर्थक भिडले होते. त्यावर राणे यांनी ठाकरे समर्थकांना सज्जड दम दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या. केवळ भाजप विरोधासाठी हे आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या आठ महिन्यात आज आंदोलन करणारे नेते कधी महाराजांना मानवंदना देण्यासाठी दिसले का? असा सवाल पण त्यांनी केला.
शिवसेना राड्यामुळे मोठी झाली
माझ्यामुळे काही राडा झाला नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळला. शिवसेना राड्यामुळेच मोठी झाली. नावारुपाला आली हे सांगायला ते विसरले नाहीत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे हे सुद्धा शिवसेनेत सुरुवातीला नव्हते. त्यांना याविषयी काही माहिती नव्हती असे ते म्हणाले. उगाच जनतेला या मुद्दावर भावनिक करु नका. आम्ही केलेले काम पाहा असे राणे म्हणाले.
या प्रकरणाची चौकशी व्हावी
ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात हवामान आणि त्यामुळे उत्तरा पुतळा कोसळलेला आहे. मी यामध्ये होणार आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशन सर्व बांधणारे लोक या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे, असे खासदार राणे म्हणाले.
निवडणुकीमुळे भांडवल
निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करता आहेत या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोग किंवा टीका करू शकतील असं कोणते कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायेत असा आरोप त्यांनी केला. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला. मालवण जिल्ह्यातील लोक नतमस्तक झाली. आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आली नाहीत.ती कधी दिसली नाहीत. याच्यातले एकाने तरी एक तरी राष्ट्र पुरुषाचा पुतळा कुठे उभारला का? एखादी शाळा एखादी बालवाडी एखादा धार्मिक स्थळ त्याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही, अशी टीका राणे यांनी केली.