छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर आणि विशेषत: राष्ट्रवादीवर टीका केली आहे. शिवसेना आणि भाजप युती झालीये. त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे. राष्ट्रवादी कुरघोडी करत आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय राऊत यांचं राष्ट्रवादीच्या मांडीवर बसण्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. हे सर्व सिल्व्हर ओकला जातात. एक नंबरचा पक्ष ठरवण्याचा अधिकार शरद पवार यांना आहे. उद्धव ठाकरे गटाला जीर्ण केलं जातंय. आता ठाकरेगटाचं राष्ट्रवादीत विलनीकरण झालं तरी वावग वाटणार नाही, असं संजय शिरसाट म्हणालेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त काल राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र सदनात असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना या कार्यक्रमावेळी तात्पुरतं हटवण्यात आलं. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कशावर राजकारण करतात. राजकारण करण्याची पात्रता ठेवा. दलित समाजाला कुचलण्याचं काम यांनी केलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा संबंध नसतो. हा मूर्खपणा आहे. फोटो ठेवून ठेवून उल्लू बनवलं.चिल्लर राजकारण करण्यापेक्षा झाडून कामाला लागा, असं संजय शिरसाट म्हणालेत.
शिवसेनेत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांनी केलेलं वकत्व भंपक आहे, असं म्हणत विनायक राऊत यांच्या टीकेला शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
गजानन कीर्तिकर हे मोठे नेते आहे आहेत. संघटनेचा विषय आक्रमकपणे मांडतात.स्वतःसाठी कीर्तिकर यांनी काही मागितलं नाही.कीर्तिकर नाराज नाहीत.उलट आनंदाच्या कारंजे उडत आहेत, असंही ते म्हणालेत.
महाविकास आघाडीतील भांडण सोडवता-सोडवता निवडणूक येईल. आमचं युतीचं जागा वाटप जाहीर केलं जाईल. शिवसेनेच्या जागेवर भाजप तयारी करतेय, हा फक्त गैरसमज आहे. भाजपच्या जागेवर आमचं पाठबळ,शिवसेनेच्या जागेवर भाजपचे पाठबळ असेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.