ठाणे : येथील छटपूजेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात छटपूजेचं आयोजन करण्यात येते. ठाण्यातही कृत्रिम तलावं निर्माण करण्यात आलीत. तीन-चार महिन्यांपूर्वी मी मोठा कार्यक्रम केला. त्याची जगभरात दखल घेण्यात आली. गणपती उत्सव, दिवाळी हे मोठे सण साजरे झाले. आता छटपूजा जोरात होत आहे. अशा कार्यक्रमांमधून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. आनंद दिघे यांनी राज्यासाठी खूप काही केलं. त्यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ही सरकार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. 370 रद्द करण्याचं काम मोदी यांच्या काळात झालं. अयोद्धेत राममंदिराचं कामही जोरात सुरू आहे. असं म्हणताचं जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. अयोद्धेला आम्ही लवकर जाणार आहोत, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
जिथं जिथं जातो हजारो लोकं स्वागतासाठी येतात. मोठं परिवर्तन राज्यात झालंय. दुसऱ्या राज्यातही लोकं स्वागतासाठी तयार असतात. लोकांच्या मनातील गोष्ट आम्ही केली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 397 जागा भाजपला मिळाल्या. बाळासाहेब ठाकरे गटाला 277 जागा मिळाल्या. चार महिन्यात येवढ्या जागा मिळाल्या. तर अडीच वर्षात काय होईल, याची चिंता लागली आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मी काम करणार मुख्यमंत्री आहे. जे काम करत नव्हते त्यांनाही मी कामाला लावलं असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला. सगळे चिंतेत आहेत. मी झोपतो केव्हा. मी जागणारा आहे. राज्याची सुरक्षा करायची आहे. न्याय द्यायचा आहे. विकासाची कामं केली जात आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.