मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये एक मोठं विधान केलं आहे. चार महिन्यापूर्वी आलेले सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज नाशिकमधील ठाकरे गटाचे अकरा माजी नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर प्रवेश केला आहे. चार महिन्यापूर्वी राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे आणि ते सरकार 2019 मध्ये यायला हवे होते असा एकप्रकारे सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. याशिवाय जनतेला आमचा निर्णय योग्य वाटला आहे. दौऱ्याला गेल्यानंतर स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. जनतेची कामं व्हायला लागली आहे. त्यामुळे लोकांना हे सरकार आपलं सरकार वाटत आहे. सगळेच जण विश्वास ठेवत असल्यानं दररोज प्रवेश होत आहे. नाशिकमधील 11 जणांनी प्रवेश केला आहे. नाशिकला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचा सर्वांगीन विकास करायचा आहे. त्यासाठी बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप ह्या युतीच्या माध्यमातून नाशिकच्या जनतेची कामे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी शिंदे गटात नाशिकच्या नगरसेवकांनी प्रवेश केला त्यावर दलाल असल्याची टीका केली होती, त्यावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे.
संजय राऊत यांच्या टीकेला अजय बोरस्ते यांनी उत्तर दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात हे सरकार लोकप्रिय झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.
नाशिक शहरातील 11 नगरसेवकांनी बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या वतिने अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
नाशिक शहरातील झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करत घटनास्थळी पाहणी केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावरून चित्र बदलंल असल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिडकोबाबत जो निर्णय घेतला त्याची मोठी मदत होणार आहे, नागरिकांच्या नावावर घरे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
याच वेळी ज्यांनी बाळसाहेबांचे विचार सोडले त्यांच्या कडून लोकं अपेक्षा करत नाही, कामं होत असल्याने नागरिक आपल्या पक्षात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
मात्र, याचवेळी बोलतांना चार महिन्यांपूर्वी जे सरकार आलं ते 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्यानं या विधानावरून राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.