कोल्हापूर: बंडखोरी नाट्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेल(CM Eknath Shinde) एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी (Vitthal Rukmini Temple Pandharpur) जात आहेत. पंढरपूरमधील पूजा झाल्यानंतर ते कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी (Ambabai Temple Kolhapur) येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या दौरावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे पंढरपूर जिल्ह्यासह कोल्हापूरचेही लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढण्याचे आयोजन केले आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर आणि कोल्हापूर हा पहिलाच दौरा असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचेही त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहाटी आणि गोवा दौरा केला होता, त्यामध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही समावेश होता. राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूरातील शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांचे शिवसेना कार्यालयावरील पोस्टर फाडले होते. त्यावेळी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी रवी इंगवले यांनी तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड असल्याचे सांगून मी तुला सोडणार नाही असा इशारीही त्यांनी देण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूरातील राजकारण प्रचंड तापले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा कोल्हापूर दौरा राजेश क्षीरसागर गटासाठी विशेष ठरणार आहे. कोल्हापूरात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या कोल्हापूरातील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-हळदी, कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वाळोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पूरपरिस्थितीचाही मुख्ममंत्री शिंदे आढावा घेणार का याकडेही कोल्हापूरवासियांचे लक्ष लागले आहे.