पुणे : पुण्यात झालेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही घोषणाबाजी करण्यात आली होती. अशा घोषणा करणाऱ्या समाजकंटकांची खैर नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी इशारा दिला होता. यानंतर आता देशद्रोहाचा(sedition) गुन्हा दाखल होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजी प्रकरणी आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे.
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाही असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले होतो.
यानंतर आता यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू असा दम उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मनसेने तर थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे मनसेच्या नेतृत्वाखाली हर हर महादेव आंदोलन करण्यात आले. यावेळी पी आय एफ आणि पाकिस्तान विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलीय