मुंबई : राज्यील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना (Shiv Sena) ही आता पडण्याच्या आणि संपण्याच्या मार्गावर आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. फक्त बंडखोरीच केली नाही तर आपल्या सोबत शिवसेनेतील मोठे नेते सोबत नेले. जी नावे शिवसेना म्हणून ओळखली जात होती. तेच नेते आपल्यासोभत नेत शिवसेना फोडली. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्ध ठाकरे (Chief Minister Uddh Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हमधून आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. तर फुटिर आणि बंडखोर आमदारांना परत या आणि माझ्याशी बोला त्यानंतर आपण निर्णय घेऊ असे म्हटलं आहे. तर भाजपवर निशाणा साधताना आज निवडूण आलेल्यांना तुम्ही फोडू शकता पण निवडूण देणाऱ्यांना कसं फोडाल? असा थेट सावाल शिंदेसह बंडखोर आमदारांना केला आहे.
राज्यातील राजकीय स्थिती ही बिघडत चालली आहे. तर हे संकट उलथवून लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष आणि शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू मांडत शिवसेनेतील या बंडखोर नेत्यांना मी नको असेन तर तसं मला बोलायला हवं होतं, मी बाजूला होतो. पण मातोश्रीला तुमच्या श्रद्धास्थानाला काही बोलू नका असे म्हटले. तसेच ठाकरे यांनी आपल्या संवादात थेट शिंदे यांच्यासह भाजपवर वार करताना, माझ्याबाबत काही तक्रार असेल तर येऊन मला सांगायला हवं होतं. पण काहीही न बोलता असे परस्पर निघून गेलात. समोर येऊन बोला मी तयार आहे. हे पद सोडतो. फक्त भाजपचा डाव ओळखा अशी त्यांनी विनंती केली. भाजपला तुम्हाला फोडायचं आहे. ही शिवसेना संपवायची आहे, हे ओळखा. आता इतके आमदार फोडलात. याला सोबत घेतलतं त्याला सोबत घेतलंत. पण तुम्ही निवडूण देणाऱ्यांना कसं फोडाल? या जनतेला या शिवसैनिकांना कसे फोडालं असा सवाल केला.
फोडाफोडीचे राजकारण करत बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. ते म्हणत आहेत की मी शिवसैनिकांच्या पाठीत वार केला. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे मी पाठीत वार करणार नाही. मी समोर येऊन निर्णय घेणारा आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत मला एकटं करायंचं ठरवलं आहे. आणि त्याला तुम्ही बळी पडत आहात. आज जे निवडूण आलेत त्यांना फोडले जात आहे. मात्र निवडून देणाऱ्यांना विकत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांना फोडू शकत नाही. आता जे तुमच्या सोबत येत असतील तर घेऊन जा, द्या त्यांना पैसा नाहीतर धमकी. पण तुम्ही निवडून देणाऱ्यांना कसं धमकावणार? त्यांना कसं विकत घेणार? त्यांना कसं फोडणार?