नागपूर – कोरोनाच्या (corona) काळात शाळा (school) असल्याने विद्यार्थी (student) कंटाळले असल्याचे ऐकण्यात होते, परंतु कोरोनाच्या काळात पालक देखील आपल्या पाल्याला वैतागल्याचे चित्र नागपूरात (nagpur) पाहायला मिळत आहे. कारण अवघ्या जगात कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण (online education) पध्दत सुरू झाली. परंतु भारतात पहिल्यांदा ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला होता, की विद्यार्थी ऑनलाईन व्यवस्थित शिक्षण घेतील का ? परंतु मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांना घरातून ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. पण नागपूरात घरात बसलेल्या मुलांना पालक वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. पालकांनी घरात बसलेल्या मुलींची लग्न लावून देण्याचा निर्णय घेतल्याच पाहायला मिळत आहे. मिळालेली माहिती अशी की नागपूरात महिला कल्याण विभागाने कारवाई 11 प्रकरण उघडकीस आणल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्या 11 जणांवर कारवाई करून त्यांना समज दिल्याचे समजते. कारण बालविवाह करणे आपल्या देशात कायद्याने गुन्हा आहे. अजून अशी किती प्रकरण असतील अशी शंका देखील अनेकांनी तिथं उपस्थित केली आहे.
कोरोना विद्यार्थी
कोरोनाच्या काळात अनेकदा शाळा सुरू झाल्या आणि बंद देखील झाल्या. कारण राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात किंवा देशात तीन कोरोनाच्या लाटा आल्या त्यामुळं सगळ्यांचं क्षेत्रावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण कोरोनाच्या भक्ष्यस्थानी बळी गेल्याचे पाहायला मिळाले तर अनेकांनी आपली जीवनयात्रा संपल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोनाचा आपल्या लाईफस्टाईलवरती किती परिणाम झाला याची सगळ्यांना कल्पना आहे. दोन वर्षात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरला त्यामुळे पालक देखील विद्यार्थ्यांना कंटाळल्याचं चित्र संपुर्ण देशात आहे. तसेच विद्यार्थी सुध्दा दोन वर्षापासून शिक्षणापासून वंचित असल्याचे जाणवते.
बालविवाह रोखण्याचं महिला कल्याण विभागासमोर आवाहन
विद्यार्थ्यांची घरी बसून बदलेली मानसिकता तसेच पालकाची विद्यार्थ्यांला अभ्यास करा म्हणून वारंवार सांगणारी मानसिकता यातून असे प्रकार घडत असेल. कारण मागच्या दोन वर्षात विद्यार्थी मागच्या वर्गाचा किंवा तो असलेल्या वर्गाचा अभ्यास समजत नसल्याची तक्रार करतो. त्यामुळे अनेक पालक देखील चिंतेत आहेत. पण शाळा बंद असल्याने विद्यार्थींनीची लग्न लावली जाणं हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. ज्यावेळी अशी प्रकरण घडत असल्याचे महिला कल्याण विभागाच्या कानावर आले, त्यावेळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कारवाई केली. तसेच पालकांकडून पुन्हा असं करणार नाही असं प्रतिज्ञापत्र सुध्दा लिहून घेतलं.