सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक, मात्र शाळा नियम पाळेना, सिडकोचा कारवाईचा इशारा

| Updated on: Mar 23, 2021 | 2:31 PM

अनेक शाळा शालेय कालावधीनंतर आणि साप्ताहिक आणि सार्वजनिक (CIDCO Warns Navi Mumbai Schools ) सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे

सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक, मात्र शाळा नियम पाळेना, सिडकोचा कारवाईचा इशारा
सिडकोतर्फे विक्री केलेल्या भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरुवात
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनेक शाळा शालेय कालावधीनंतर आणि साप्ताहिक आणि सार्वजनिक (CIDCO Warns Navi Mumbai Schools ) सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सिडको महामंडळाने शाळांसोबत केलेल्या करारान्वये शाळांना शालेय कालावधीनंतर आणि साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक आहे. ज्या शाळा या अटीचे उल्लंघन करतील अशा शाळांवर सिडकोतर्फे सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे (CIDCO Warns Navi Mumbai Schools To Open The School Grounds For Common Citizens).

अनेक शाळा अट पाळत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले

सिडको महामंडळातर्फे शाळांसोबत केलेल्या करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक शाळा ही अट पाळत नसल्याचे सिडको महामंडळाच्या निदर्शनास आले आहे.

सिडको महामंडळाकडून अशा शाळांवर सक्तीच्या कारवाईचा इशारा

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, एखादी शाळा जर सदर अट पाळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर त्यांनी त्याबाबत सिडको महामंडळास माहिती द्यावी. त्याचप्रमाणे सिडको महामंडळातर्फे सर्व शाळांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीदेखील करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधी नंतर तसेच साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देण्यास तात्काळ सुरुवात करावयाची आहे. असे न केल्यास सिडको महामंडळाकडून अशा शाळांवर सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची सर्व शाळांनी नोंद घ्यायची आहे.

CIDCO Warns Navi Mumbai Schools To Open The School Grounds For Common Citizens

संबंधित बातम्या :

नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई, अंमली पदार्थांची विक्री करण्याऱ्या दोघांना बेड्या

सिडकोचा अजब कारभार, पोलिसांसाठीची घरेही 3 लाख रुपयांनी महागली, मनसेची किमती कमी करण्याची मागणी