मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नगर | 13 नोव्हेंबर 2023 : अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात एक धार्मिक स्थळात सकाळी अमावस्येनिमित्त महाआरती सुरु असताना दोन समुदायात लाथाबुक्यांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या गावातील कानिफनाथांचे मंदिर असून त्यावरुन दोन समुदात सुरु असलेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले आहे. या हाणामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. येथील एका प्रार्थनास्थळावरुन हा गेल्या अनेक वर्षांपासून दोन समुदायात वाद सुरु आहे. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तात येथे अमावस्येनिमित्त महाआरती घेतली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात एका प्राथर्ना स्थळाच्या मालकी वरुन दोन समुदायात वाद सुरु आहेत. या गावातील कानिफनाथाचे मंदिर असून ही जागा दर्गा की मंदिराची या वरुन वाद सुरु आहे. हे प्रकरणाचा वाद कलेक्टर आणि कोर्टात प्रलंबित आहे. या मंदिराच्या जमीनीच्या मालकीवरुनचा वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. परंतू या प्रकरणात दोन गटांमध्ये वाद असताना अमावस्येनिमित्त मंदिरात महाआरती करण्यावरुन दोन गटात वाद होऊन
तहसीलदारांनी येथे पुजा करण्यास परवानगी दिल्यानंतर येथील गावकऱ्यांनी मंदिराची साफ सफाई करुन सकाळी महाआरती करणार असल्याची घोषणा केली. कानिफनाथ मंदिरात महाआरती करण्यासाठी गावकरी जात असताना तेव्हा विरोधी गटाने सकाळी त्यांच्यावर हल्ला केला. यात लाथाबुक्यांनी दोन्ही गटांनी एकमेकांची यथेच्छ धुलाई केली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहे. दुसऱ्या गटाने मंदिरात पूजा करणाऱ्या भक्तांना आणि पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा आरोप केला आहे.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. सकाळी झालेल्या दोन गटातील वादानंतर गुहा गावात आता तणावपुर्ण शांतता आहे. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे राहुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज अमावस्या असल्याने कानिफनाथ मंदिरात महाआरती करण्यात येत असते. आता 7.30 वाजता आरती पार पडणार असल्याने पोलिस घटनास्थळी ठाण मांडून आहेत.