गिरीश गायकवाड, मुंबईः महाराष्ट्रासाठी अत्यंत सुखद मंगळवार ठरावा, अशी सकारात्मक बातमी आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता आशादायी वृत्त आहे. स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये (Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्योगमंत्री उदय सामंत सध्या डाव्होस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रासाठी झालेल्या भरभक्कम गुंतवणुकीविषयी उदय सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितली.
यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
डाव्होस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
#दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आज झुरिच येथे आगमन झाले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले.#WorldEconomicForum #Davos pic.twitter.com/eXtv29KuWO— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 16, 2023