नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी महत्वाच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील दुष्काळ, मराठा आरक्षण आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.
सध्या पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असून अमित शहा हे त्यासाठी प्रचारामध्ये व्यस्त आहेत. मात्र काही दिवसांतच प्रचार थंडावेल. त्यानंतर 2 किंवा 3 डिसेंबरला दिल्लीत ही बैठक पार पडेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या बैठकीत उपस्थित असतील.
या मुद्यांवर होणार चर्चा
देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यांच्या प्रचारमोहिमेत अमित शहा हे व्यस्त आहेत. मात्र काही दिवसांतच प्रचार थंडावल्यानंतर ते व्यापातून मोकळेल होतील. सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2 किंवा 3 तारखेला ते एकनाथ शिंदे, , देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांची भेट घेतील. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मराठा आक्षणाच्या मुद्यासाठी मनोज जरांगे -पाटील यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. त्यासाठी त्यांनी 24 डिसेंबरची डेडलाईनही देण्यात आली आहे. या मुद्यावर चर्चा होईल.
राज्यात सध्या काही जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यासंदर्भात उपयायोजना काय कराव्यात यावरही या बैठकीत विचारविनिमनय होईल असे समजते.
या बैठकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा असेल तो आगामी लोकसभा निवडणुकांचा. या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जागांचं गणित नेमकं कसं असेल, या महत्वाच्या मुद्यावर बैठकीत चर्चा होईल.