Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 07, 2022 | 10:12 AM

राजकीय बातम्या, महत्त्वाच्या शहरांमधील ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

आज रविवार, 4 डिसेंबर 2022. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. काल उदयनराजे यांनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. त्यापार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज रविवारचा दिवस असल्याने मेगा ब्लॉगची काय स्थिती आहे? यासह पुणे, नाशिक, नागपूर आणि अन्य शहरात आज काय घडतंय? यासह मनोरंजन आणि क्रिडाविश्वातील घडामोडींचे अपडेट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Dec 2022 10:03 AM (IST)

    बेळगाव डेपोमधून महाराष्ट्राच्या निघालेल्या बसेस थांबवल्या

    बेळगाव पोलिसांनी बसेस थांबवल्या

    प्रवाशांना फुटले रडू

    गोवाहूण कलकुंद्री लग्न कार्याला जाण्यासाठी आले होते

    बेळगाव महारष्ट्र बस कर्नाटक पोलिसांनी अडवले

    बससेवा पुन्हा झाली बंद

  • 05 Dec 2022 06:30 AM (IST)

    भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचे नवे अभियान

    हात से हात जोडो अभियान देशभरात राबवलं जाणार

    राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचणार

    26 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात हात से हात जोडो अभियान

    आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस करणार जोरदार तयारी


  • 05 Dec 2022 06:27 AM (IST)

    गुजरात विधानसभा निवडणुकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

    गुजरात विधानसभा निवडणुकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

    93 जागांसाठी आज होणार मतदान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणार

    दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    8 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

  • 04 Dec 2022 02:13 PM (IST)

    माथेरानसाठी उद्या ऐतिहासिक दिवस, उद्यापासून माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार

    पर्यटकांची माथेरानमध्ये होणारी पायपीट वाचणार

    ई रिक्षा संदर्भात सर्व प्रशासकीय चाचण्या पूर्ण

    उद्या 5 डिसेंबरपासून माथेरानच्या रस्त्यांवर धावणार ई रिक्षा

    माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची माहिती

  • 04 Dec 2022 01:18 PM (IST)

    संजय निरुपम यांची आज भारत जोडो यात्रा

    काँग्रेस नेते संजय निरुपम हे आज शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात रॅली काढणार होते,

    मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही

    त्यानंतर त्यांनी काल ट्विट करून पोलिसांवर आपला राग काढला

    आज संजय निरुपम भारत जोडो यात्रा करणार आहेत

  • 04 Dec 2022 10:15 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

    सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर निषेध आंदोलन

    ढोल वाजवून केलं जातं आहे निषेध आंदोलन

    आंदोलनात अनेक मराठा समन्वयक सहभागी

    राज्यपालांची हकालपट्टी करण्यासाठी आंदोलन

  • 04 Dec 2022 10:14 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात गोवरचा शिरकाव, 8 रुग्ण सापडले

    आरोग्य मंत्री तानाजी सावंत अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने आरोग्य विभागाने आतापर्यंत दडवली होती गोवरची माहिती

    आरोग्यमंत्री जिल्ह्यातून जाताच आरोग्य विभागाने जाहीर केली गोवरची माहिती

    अमरावती जिल्ह्यात आढळले गोवरचे 8 रुग्ण

    जिल्ह्यातून आतापर्यंत 249 संशयित नमुने पाठवले तपासणीला

    अमरावती शहरात एक तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले 7 गोवरचे रुग्ण

  • 04 Dec 2022 09:14 AM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज करणार समृद्धी महामार्गाची पाहणी

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारने नागपूर ते शिर्डी 586 किलोमीटरचा प्रवास करणार

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 586 किमी साडेसहा तास कारने प्रवास करणार असल्यांने पोलीसांची मोठी जबाबदारी

    ताफ्यात आठ गाड्या आणि एक रुग्णवाहिका असणार

    सर्वात आधी पोलीसांची वॅार्निंग कार, मग पायलट, व्हीआयपी कार, रिंग राऊंड,1,2,3 कार त्यानंतर स्पेअर कार असणार

    प्रवासात सुरक्षेच पोलिसांसमोर मोठं आव्हान

  • 04 Dec 2022 09:11 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपसह मित्र पक्षांनी कसली कंबर

    475 पैकी किमान 300 जागांवर थेट सरपंचपदासाठी भाजपकडून प्रयत्न

    भाजप, ताराराणी आघाडी, जनसुराज्य शक्ती पक्ष एकत्रितपणे ग्रामपंचायत निवडणुका लढवणार

    एकही आमदार नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा सरपंच पदासाठी आटापिटा

    उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची

  • 04 Dec 2022 09:06 AM (IST)

    काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्याकडून मालाड पश्चिम येथे ‘मालाड मस्ती’ कार्यक्रमाचे आयोजन

    या कार्यक्रमात अभिनेत्री काजोल, रेमो डिसूझा, अली असगर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार आणि अभिनेत्री येणार आहेत.

    या कार्यक्रमात योगासने, फुटबॉल, नृत्य अशा अनेक प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 04 Dec 2022 09:03 AM (IST)

    रत्नागिरीतील मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारावर

    साई रिसॉर्ट सह अन्य हॉटेल्स संदर्भात चौकशी सुरु

    ग्रामसेवक आणि सरपंचांना ईडी कार्यालयात विविध प्रकरचे दस्ताऐवज घेऊन बोलावले

    ईडीला ओरिजिनल आणि महत्त्वाची कागदपत्रे हवीत

  • 04 Dec 2022 08:57 AM (IST)

    राजधानी नवी दिल्लीच्या प्रदूषणात पुन्हा वाढ

    राजधानी नवी दिल्लीच्या प्रदूषणात पुन्हा वाढ

    अनेक भागातील AQI पोहचला 400 च्या वर

    दिल्ली सरकार समोर प्रदूषण कमी करण्याच आव्हान

    थंडीची तीव्रता वाढत असतानाच प्रदूषणात वाढ झाल्याने चिंता वाढली

  • 04 Dec 2022 07:54 AM (IST)

    नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश

    नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश

    मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश

    मनपाच्या दोन अतिरिक्त आयुक्तांवर दिली सहा विभागांची जबाबदारी

    शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेची मोहीम

  • 04 Dec 2022 07:53 AM (IST)

    भंडाऱ्यात 305 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 1284 उमेदवारांचे अर्ज

    भंडाऱ्यात 305 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 1284 उमेदवारांचे अर्ज

    शेवटच्या दिवशी 7 हजार 888 उमेदवारांचे नामांकन

    जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 1 हजार 384 व्यक्तींनी 1 हजार 288 नामांकन दाखल

    5 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार