राहुल गांधी उद्या घेणार गुरुद्वाराचं दर्शन, प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेचा राज्यातील दौरा सांगितला

| Updated on: Nov 07, 2022 | 10:22 PM

आज रात्री मशाल रॅली आहे. उद्या गुरुनानक जयंती आहे. त्यानिमित्त गुरुद्वाराचं दर्शन राहुल गांधी घेणार आहेत.

राहुल गांधी उद्या घेणार गुरुद्वाराचं दर्शन, प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेचा राज्यातील दौरा सांगितला
Follow us on

नांदेड : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य हे अतिशय निंदनीय आहे. भाजपच्या नेत्यांकडून असे विकृत मानसिकतेतले वक्तव्य बाहेर येतात. यावर ते माफीसुद्धा मागत नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. विकृत शब्द महिलांबद्दल वापरले जातात. असं वक्तव्य केलं जाते. हे एकंदरित महिलांच्या विरोधातील मानसिकता आपल्याला दिसून येते. लोकसभेच्या महिला खासदाराला असं बोलत असतील. तर सामान्य महिलांचं काय. म्हणून आपल्या देशात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार दिसतात. काही लोकं अशा गुन्हेगाराना पाठीशी घालत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी केली.

प्रणिती शिंदे यांनी नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेनिमित्त दौरा केला. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, न भुतो न भविष्यती असा हा दौरा राहणार आहे. या क्षणाची आम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो. देगलूर, नांदेड येथे भारत जोडो यात्रा येणार आहे.

आज रात्री मशाल रॅली आहे. उद्या गुरुनानक जयंती आहे. त्यानिमित्त गुरुद्वाराचं दर्शन राहुल गांधी घेणार आहेत. 16 दिवस राहुल गांधी हे महाराष्ट्रात असणार आहेत. पाच जिल्हे आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा येथे येतील. शेगावला सभा होणार आहे. त्यापूर्वी नांदेड येथे सभा होणार आहे.

नागरिकांमध्ये खूप जोश आहे. कारण ही मानवतेची यात्रा आहे. ही भारत जोडो यात्रा आहे. लोकं जोडले जात आहेत. महिला, शेतकरी असे सर्व वर्गातील लोकं या यात्रेस सहभागी होत आहेत. साहित्यिक, कला जपणारे लोकंही या यात्रेत सहभागी होत आहेत. न भुतो न भविष्यता असा हा क्षण आहे. तो आपण अनुभवणार आहोत, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.