संशयितांच्या मोबाईलमध्ये सापडला ‘कोडवर्ड’, नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ

| Updated on: Nov 22, 2024 | 11:29 AM

प्राथमिक चौकशीदरम्यान, संशयित व्यक्तीच्या फोनमध्ये गुप्त संभाषण आणि 'कोड शब्द' असल्याचे उघड झाले. याप्रकरणाची सध्या सखोल चौकशी करण्यात येत आहे.

संशयितांच्या मोबाईलमध्ये सापडला कोडवर्ड, नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ
नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ
Follow us on

चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या कार्यालयात संशयास्पद व्यक्ती आढळून आल्याने खळबळ माजली. एवढेच नव्हे तर त्यांच्या मोबाईलमधअये कोड असा शब्द आढळलल्याने आता नसीम खान यांच्या सुरक्षेत कडक वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नसीम खान यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संशयित व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिलं.

प्राथमिक चौकशीदरम्यान, संशयित व्यक्तीच्या फोनमध्ये गुप्त संभाषण आणि ‘कोड शब्द’ असल्याचे उघड झाले. याप्रकरणाची सध्या सखोल चौकशी करण्यात येत आहे.

संशयित हा मुंबईतील ‘लोकेश’ नावाच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात होता, असेही समोर आले आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. एवढंच नव्हे तर संशयित व्यक्ती हा नसीम खान यांच्या अनेक प्रचार कार्यक्रम आणि रॅलींमध्ये सहभागी झाली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची साकीनाका पोलिस आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करत असून नसीम खान यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. चांदिवली येथील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या कार्यालयात गेलेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांनी नसीम खानबद्दल चौकशी केली, त्यामुळे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने ही कारवाई केली.