सागर सुरवसे, सोलापूर : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात भीती व्यक्त केली जात असतांना भारतातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला नोटिस देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनची परिस्थिती पाहता भारत जोडो यात्रेतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा थांबवावी अशी सूचना आरोग्य विभाकडून देण्यात आली आहे. त्यावर महाराष्ट्र कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी पलटवार केला आहे. भारत जोडो यात्रेला पाठवलेल्या नोटिसीवर काँग्रेस प्रवक्ते प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेला मिळणारे यश बघून भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवण्याऐवजी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी असे पत्र दिले जात आहे असा पलटवार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजपवर केला आहे.
याशिवाय चीनसारख्या देशात कोरोना वाढत असल्याचे दिसतय तर सर्वात आधी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध आणा
गुजरातच्या विजयानंतर देशभर भाजपच्या समर्थकांनी हौदोस घातला त्याबद्दल कोणाला नोटीस दिली का? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे.
मात्र मूळ विषय बाजूला ठेवून केवळ राहुल गांधींचे नेतृत्व मोठं होतंय म्हणून असे अशी नोटीस दिली जात आहे असेही कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्र दिले आहे, त्याच पत्रावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबते का ? याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.