सातारा : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर (Vilas Undalkar) याचं अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षे वयाचे होते. त्यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. (Congress leader and former minister Vilas Undalkar passes away)
त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांचे सहकारी क्षेत्रातही मोठे काम आहे. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
विलासकाका उंडाळकर कोण आहेत?
काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या सर्व क्षेत्रात त्यांनी चांगले काम करुन महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला.
विलासकाका उंडाळकर तब्बल 7 टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले होते.
विलासकाका उंडाळकर यांची राजकीय कारकीर्द
उंडाळकरांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली आहे. त्यांनी 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्री काम केले. विलासकाका 1980 ते 2014 असे सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत तयार झालेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांच्या नेतृत्वाखाली नाबार्डचे सात पुरस्कार मिळाले. अनेक सहकारी संस्था त्यांनी उभ्या केल्या. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असणारे उंडाळकर घराणे नेहमी समाज हितासाठी कार्यरत होतं. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली झाल्याची भावना राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली
जीवनपट :
विलासकाका पाटील-उंडाळकर
जन्म : १५ जुलै १९३८
प्राथमिक शिक्षण : जिल्हा लोकल बोर्ड, उंडाळे
माध्यमिक शिक्षण : टिळक हायस्कूल, कराड
कॉलेज शिक्षण : राजाराम कॉलेज, कोल्हापूर
>>> जिल्हा परिषद सदस्य : 1967 ते 1972 शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य
>>> सातारा जिल्हा मध्यवती बँक (1967 पासून संचालक)
>>> अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा
>>> सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरा
>>> कराड दक्षिण मतदारसंघाचे 1980 ते 2014 पर्यंत सलग 35 वर्षे आमदार
>>> दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991 ते 1993
>>> विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003
>>> सहकार व वस्त्रोद्योगमंत्री 2003 ते 2004
>>> महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा 2008
>>> 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन
>>> देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती
>>> जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती
>>> डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
संबंधित बातम्या :
‘चंद्रकांतदादांचे पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा’, राऊतांचा टोला
मोदी सरकार आता ‘या’ सरकारी कंपनीचा हिस्सा विकणार, 300 कोटी कमावणार
2 नव्हे तर 3 लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? वाचा अजून एक गुड न्यूज
(Congress leader and former minister Vilas Undalkar passes away)