‘मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात रात्री 12 वाजता अधिकाऱ्यांना भेटले, आणि…’, काँग्रेसचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 28, 2024 | 11:31 PM

"मुख्यमंत्री राहिलेल्या हॉटेलमध्ये काल रात्री बारा वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काही नावं काढून कारवाई करण्यासंदर्भातल सूचना देण्यात आल्या", असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात रात्री 12 वाजता अधिकाऱ्यांना भेटले, आणि..., काँग्रेसचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या हॉटेलमध्ये काल रात्री बारा वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काही नावं काढून कारवाई करण्यासंदर्भातल सूचना देण्यात आल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. पंचशील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी निवडूक आयोगाकडे आपण मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?

आताचे मुख्यमंत्री इथे ठाण मांडून बसले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आमच्याकडे अशी माहिती आहे की, काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी त्यांना पंचशील हॉटेलमध्ये भेटले. काही नावे काढून त्या लोकांवर कारवाया करण्याबाबत सूचना दिल्या. मला हे खरं असेल, खोटं असेल, माहिती नाही. पण माझ्याकडे माहिती आली आहे. पण याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. ते शिवसेना पक्षाचे आहेत. तर शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापुरातले सध्याचे विद्यमान खासदार आहेत. त्यांना यावेळी शाहू महाराजांचं कडवं आव्हान आहे. कोल्हापुरात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. असं असताना आता कोण बाजी मारतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.