काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, त्या आमदारांचा कायमचा निक्काल लागणार, ‘या’ दिवशी होणार मोठा फैसला

| Updated on: Jul 14, 2024 | 5:29 PM

Congress Meeting For Legislative Council elections : काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या त्या आमदारांचा कायमचा निक्काल लागणार आहे. 'या' दिवशी मोठा फैसला होणार आहे. काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, त्या आमदारांचा कायमचा निक्काल लागणार, या दिवशी होणार मोठा फैसला
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

नुकतंच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं उघड झालं. त्यामुळे क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच संदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 19 जुलैला ही बैठक होणार आहे. या बैठकीत फुटलेल्या आमदारांबाबत महत्वाचा फैसला होऊ शकतो. दिल्लीतील महत्वाच्या नेत्यांसमोर या बाबतचा निर्णय होणार आहे. तसंच विधानसभेच्या जागावाटपावरदेखील चर्चा होणार आहे.

बैठकीत मोठा फैसला होणार

19 जुलैला होणारी ही बैठक जरी जागा वाटपाचा संदर्भातली असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात या बैठकीत मोठा निर्णय होणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी दिल्लीतून के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला या बैठकीसाठी येणार आहेत. विधान परिषदेत निवडणुकीत जे आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी इतर काँग्रेस नेते करणार असल्याची माहिती आहे. या मागणीनंतर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार या बैठकीत स्ट्रॅटर्जी आखली जाणार आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही क्रॉस वोटिंगवर प्रतिक्रिया दिलीय. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली. त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठाना कळवलं आहे. त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आम्ही सगळ्या आमदारांवर विश्वास ठेवला होता. पण या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वास घात केला आहे. आम्ही जी स्टॅटर्गी केली. त्यानुसार हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील क्रॉस वोटिंगवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणार. मागच्या वेळी काही नावे आमच्या कानावर आली. मात्र मी कारवाई केली नाही आता आम्ही पूर्ण अलर्ट होतो. आम्ही काही रणनीती आखली. त्यामुळे आमच्या पक्षातील असलेली घाण आमच्या लक्षात आली. त्याचा प्रस्ताव आम्ही कारवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.