सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे (Karan Mhetre) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यानंतर रविवारी म्हेत्रेंच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक जमले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन असतानाही गर्दी जमली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Congress MLA Praniti Shinde supporter Social Activist Karan Mhetre Dies Mob gathers for Last Rites in Solapur)
करण म्हेत्रे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कार्यकर्ते संबंधित हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला.
अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी सोलापुरात म्हेत्रेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला.
माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती
करण म्हेत्रे हे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सोलापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांचं वजन होतं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत म्हेत्रेंचा पुढाकार दिसून यायचा. (Karan Mhetre Mob Last Rites Solapur)
गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण म्हेत्रे यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ताडीच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी स्वखर्चाने जिमही बांधली होती.
धडपडीचा युवा नेता हरपला
वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी करण म्हेत्रे यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी – काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे आणि मुले असा परिवार आहे. समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी गेल्याने दुःख व्यक्त होत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!
Congress MLA Praniti Shinde supporter Social Activist Karan Mhetre Dies Mob gathers for Last Rites in Solapur