काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट; कुणा- कुणाला संधी?

| Updated on: Oct 26, 2024 | 12:16 PM

Congress Second Candidates List : विधानसभेसाठीची काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या दुसऱ्या यादीत 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत कुणा- कुणाला संधी देण्यात आली आहे? याबद्दलचे तपशील. वाचा सविस्तर बातमी...

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, 23 जणांना तिकीट; कुणा- कुणाला संधी?
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यात तीन महिलांना विधानसभेचं तिकीट दिली आहे. जळगाव- जामोदममधून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार, भंडाऱ्यातून पूजा ठावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काही विद्यमान आमादारांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिरोळची जागा काँग्रेसला स्वत: कडे ठेवण्यात यश आलं आहे. तर श्रीरामपूरच्या जागेवर काँग्रसने धक्कातंत्र अवलंबलं आहे. 23 जणांच्या या उमेदवार यादीत कुणा- कुणाला संधी देण्यात आली आहे? वाचा संपूर्ण यादी…

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

१. भुसावळ- राजेश मानवतकर

२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर

३. वर्धा- शेखर शेंडे

४. सावनेर- अनुजा केदार

५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

६. कामठी- सुरेश भोयर

७. भंडारा- पूजा ठावकर

८. अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड

९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके

११. यवतमाळ- अनिल मंगुलकर

१२. अरणी- जितेंद्र मोघे

१३. उमरखेड- साहेबराव कांबळे

१४. जालना- कैलास गोरंट्याल

१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख

१६. वसई- विजय पाटील

१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया

१८. चारकोप- यशवंत सी.

१९ सायन- गणेश यादव

२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे

२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे

२२. शिरोळ- गणपतराव पाटील

२३. अकोट – महेश गणगणे

शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी

कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिरोळची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. शिरोळमध्ये आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.

श्रीरामपूरमध्ये धक्कातंत्र

श्रीरामपूरमध्ये मोठा काँग्रेसने मोठा बदल केल्याचं दिसत आहे. काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली आहे. श्रीरामपूर काँग्रेसमधील अंतर्गत दोन्ही गटांचा वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेस श्रेष्ठींनी विद्यमान आमदाराला नाकारत नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.