नागपूर : नागपूरमधील काँग्रेसच्या प्रदेश महासचिवांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दंतवैद्यक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलाला शून्य गुण दिल्याने पटेल यांनी टोकाचे पाऊल उचलले. जिया पटेल यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याने मोठा अनर्थ टळला. पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. (Congress State General Secretary Jiah Patel attempts Suicide in Dental College at Nagpur)
आठपैकी सात विषयात शून्य गुण
जिया पटेल हे नागपूर काँग्रेसचे प्रदेश महासचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पुत्र दंत महाविद्यालयात दंतवैद्यक विषयाचे शिक्षण घेतात. मात्र त्यांच्या मुलाला थिअरीच्या आठपैकी सात विषयात शून्य गुण देण्यात आले होते. याच व्यथेतून जिया पटेल यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणातच अंगावर रॉकेल ओतलं
जिया पटेल यांनी संबंधित दंत महाविद्यालयात येऊनच आत्महत्येचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या प्रांगणातच अंगावर रॉकेल ओतून पटेल यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवल्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
पाहा व्हिडीओ :
नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद मृतदेह
छत्तीसगडमधील बेपत्ता अधिकाऱ्याचा मृतदेह कालच (4 मार्च) नागपूरमधील लॉजवर संशयास्पद अवस्थेत आढळला होता. कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Congress State General Secretary Jiah Patel attempts Suicide in Dental College at Nagpur)
आठ महिन्यांपासून वेतन थकित
राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्यामुळे छत्तीसगढमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव एक मार्चपासून मंत्रालयातून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
छत्तीसगडमधून बेपत्ता, नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह
चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या
(Congress State General Secretary Jiah Patel attempts Suicide in Dental College at Nagpur)