विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी प्रचाराचा धुराळा उडाला असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज लातूरमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले पटोले?
नानो पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींसमोर त्यांच्या खासदारांना बोलण्याची मुभा नाही. त्यांना संविधान मान्य नाही. भाजप हा शिकारी आहे, एखाद्या पक्षाला पकडून खावू पिवू घालतात, त्याला बघून इतर पक्षी आले की ते त्याची शिकार करतता. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात, त्यांच्या खासरांना महत्त्व राहिलेलं नाही, लातूरमध्ये पुन्हा भाजप उभीच राहिली नाही पाहिजे असं पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सागू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा. छगन भुजबळ आमच्या सोबत होते, विधानभवनात एकदा भुजबळ म्हणाले होते, भारत जलावं पार्टी आता तेही तिकडे गेले. शेती मालाचे भाव वाढत नाहीत, सोयाबीनचे ही भाव वाढत नाहीत. नांदेडचा एक स्वयभू नेता आहे, तो काँग्रेसच्या जीवावर दोनदा मुख्यमंत्री झाला. त्याने सरकार कडून 150 कोटी रुपये साखर कारखाना तोट्यात असल्याचं दाखवून घेतले, असं म्हणत यावेळी अशोक चव्हाण यांना देखील पटोले यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.
आमचं सरकार आल्यावर कंत्राटी नोकर भरती केली जाणार नाही, थेट एमपीएससीच्या माध्यमातून पर्मनंट नोकरी मिळणार. आपल्या राज्यात पैशांची कमी नाही. मात्र यांनी देशात महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्याबाबत नंबर एकवर आणला. पोलीस अधीक्षक, ठाणेदार यांची यादी तयार केली आहे. आमच्याकडे गृह खाते आल्यानंतर असं चिक्की पिसिंग म्हणणाऱ्यांना आम्ही आत टाकणार, असा इशाराही यावेळी पटोले यांनी दिला आहे.