नागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतांना मराठी भाषिकांनी कोल्हापूर येथे येऊन आंदोलन केले आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत काही मागण्या केल्या आहेत. अशी सर्व परिस्थिती असतांना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत एक मोठी मागणी केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र हा सीमा वादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जाऊन ठेपला आहे. तिथे दोन्ही बाजूचे वकील आपआपली बाजू मांडत आहे. हा वाद कधी निकाली लागेल माहिती नाही पण दुसरीकडे कर्नाटक सरकारने हा मुद्दा अधिक आक्रमक पणे हाती घेतला आहे. बेळगाव येथील मराठी भाषिकांवर अत्याचार करणे, कानडी भाषेत शिक्षण, कानडी भाषेतच व्यवहार करणे आणि इतकंच काय बेळगावला उपराजधानी घोषित करून नाव बदलण्याचे काम कर्नाटक सरकार करत असतांना महाराष्ट्र सरकार शांत बसले आहे. त्यामुळे गृहमंत्री यांनी याबाबत दखल घेऊन बेळगाव हा केंद्रशासित भाग म्हणून जाहीर करून हा सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
बेळगाव सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्या मागणीला महाराष्ट्र कॉंग्रेस पाठिंबा दिला आहे.
कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत हीच मागणी कॉंग्रेसची असल्याचे म्हंटले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज सभागृहात जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य होता, प्रश्न सोडवेपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित प्रदेश करा, काँग्रेसचीसुद्धा तीच भूमिका आहे असं म्हंटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट केलं असून ठाकरेंच्या मागणीला कॉंग्रेसने साथ दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ठोस भूमिका घेत नाहीत अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.