Dhopeshwar Refinery Project : धोपेश्वर रिफायनरीचा मार्ग मोकळा, तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी दिली संमतीपत्र

| Updated on: Jun 13, 2022 | 5:32 PM

बोलविण्यात आलेल्या बैठकिच्या आधी जमिन मालकांनी आपल्या सातबाऱ्यासह आपली जमिन प्रकल्पासाठी घ्यावी अशी लेखी संमतीपत्र सादर केली. यावेळी शिवसेना आमदारांसह अनेक प्रकल्प संमर्थक उपस्थित होते.

Dhopeshwar Refinery Project : धोपेश्वर रिफायनरीचा मार्ग मोकळा, तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी दिली संमतीपत्र
रिफायनरी प्रकल्प
Image Credit source: tv9
Follow us on

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर रिफायनरी (Dhopeeshwar Refinary) प्रकल्प प्रकरणात आता अणखी एक ट्टिस्ट पहायला मिळत आहे. इतके दिवस या प्रकरल्पाला जे विरोध करत होते, त्या लोकांनी आपल्या जमिनी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या कामातील मोठा अडथळा दुर झाला आहे. तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी आज एमआयडीसी (MIDC) आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही संमतीपत्र दिली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी (Green Refinery Project) लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्या बैठकिच्या आधी जमिन मालकांनी आपल्या सातबाऱ्यासह आपली जमिन प्रकल्पासाठी घ्यावी अशी लेखी संमतीपत्र सादर केली. यावेळी शिवसेना आमदारांसह अनेक प्रकल्प संमर्थक उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर रिफायनरीला मोठ्या प्रमाणात स्थिन लोकांनी मध्यंतरी विरोध केला होता. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पैसा कुठून येतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर यासंदर्भात चौकशी केली जाणार असल्याचे मध्यंतरी समोर आली होती. त्यानंतर एमआयडीसीनं ग्रीन रिफायनरी संदर्भात चर्चेसाठी लोकप्रतिनिधीना बोलावलं होतं. ग्रामपंचायत सरपंचापासून ते जिल्हा परिषद सदस्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले होते. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या अखत्यारित येणाऱ्या आठ सरपंचांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आल होतं. ती बैठक आज सोमवारी सायंकाळी 4 वाजता पार जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

हे सुद्धा वाचा

लेखी संमतीपत्र सादर

दरम्यान, रिफायनरी विरोधी समितीचा या बैठकिवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. एमआयडीसीच्या चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीला सरपंच जाणार नाहीत, असा रिफायनरी विरोधी समितीचा निर्धार असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे समर्थक आणि विरोधकांचा संधर्ष पेटणार असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान आता कोणताही वाद न पेटता रिफायनरी प्रकरणात ट्टिस्ट पहायला मिळाला. ज्यात तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी आज एमआयडीसी आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही संमतीपत्र दिली आहे. बोलविण्यात आलेल्या बैठकिच्या आधी जमिन मालकांनी आपल्या सातबाऱ्यासह आपली जमिन प्रकल्पासाठी घ्यावी अशी लेखी संमतीपत्र सादर केली. यावेळी शिवसेना आमदारांसह अनेक प्रकल्प संमर्थक उपस्थित होते.

मोठा विजय आहे

प्रकल्पाच्या समर्थनासाठी जमिन मालकांनी दिलेल्या समंतीपत्राचं स्वागत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलं. एवढी संमतीपत्र इथं आली यातच आपला मोठा विजय आहे प्रकल्प झाला पाहिजे या मुद्यावर या निमित्ताने शिक्कामुर्तब झाल्याची प्रतिक्रिया राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी दिलीय. संमती दिली हा स्तुत्य उपक्रम आहे भविष्यात शासनाकडून आणि महामंडळाकडून सर्व सहकार्य मिळेल अशी ग्वाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.