बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’वरून वाद पेटला, उद्योजकाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा दणका

| Updated on: Mar 11, 2024 | 12:47 PM

बेळगावमध्ये कुस्ती मैदानात एका नेपाळी पैलवानाने 'जय महाराष्ट्र' म्हणताच त्याला रोखण्यात आले. उद्योजक श्रीकांत देसाई यांनी त्या पैलवानाला थांबवून 'जय महाराष्ट्र' असे सुनावले. यामुळे एकच खळबळ माजली असून असून कर्नाटकमध्ये पुन्हा नवा वाद पेटला आहे. 'जय महाराष्ट्र' म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने दणका दाखवला.

बेळगावमध्ये जय महाराष्ट्रवरून वाद पेटला, उद्योजकाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा दणका
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई | 11 मार्च 2024 : बेळगावमध्ये कुस्ती मैदानात एका नेपाळी पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ म्हणताच त्याला रोखण्यात आले. उद्योजक श्रीकांत देसाई यांनी त्या पैलवानाला थांबवून ‘जय महाराष्ट्र’ असे सुनावले. यामुळे एकच खळबळ माजली असून असून कर्नाटकमध्ये पुन्हा नवा वाद पेटला आहे. ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने दणका दाखवला आहे.

समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत देसाई यांच्या फलकला काळ फासलं तसेच देसाई यांच्या शिनोळी येथील कंपनी कार्यालया बाहेरील फलकावरही काळ फासून, गद्दार असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्या कंपनीच्या गेटवर जय महाराष्ट्र असा मजकूरही लिहीण्यात आला. यामुळे बेळगावमध्ये पुन्हा मराठी आणि महाराष्ट्रवरून वाद पेटला असून वातावरण तापू लागल्याचं चिन्ह दिसत आहे.

महाराष्ट्रात रहायचं असेल, उद्योग करायचा असेल तर ‘जय महाराष्ट्र’ हे म्हणावचं लागेल, असा इशारा शुभम शेळके यांनी दिला.

काय आहे प्रकरण ?

गेल्या आठवड्यात बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने हिंदवाडीमध्ये कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र व इतर भागातून पैलवान संघटना सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये थापा या नेपाळी पैलवानाने सुद्धा सहभाग घेतला होता. थापा पैलवानाने कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जय महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला. त्यामुळे श्रीकांत देसाई यांनी त्या पैलवानाच्या हातातील माईक हिसकावून घेत त्याला ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचं नाही, असा दम दिला. तसेच ‘जय कर्नाटक’ असं म्हणण्यास सांगितलं. इतकंच नाही, जय महाराष्ट्र म्हणून आम्हाला अडचणीत आणशील, असा दम देखील दिला. या सगळ्या प्रकारामुळे खळबळ माजली होती. कर्नाटकमधील मराठी भाषेविषयी असणारी गळचेपी पुन्हा एकदा समोर आली. याच घटनेचा निषेध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत देसाई यांना दणका दाखवत फलकावर काळ फासलं.