शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की!

| Updated on: Sep 11, 2022 | 1:38 PM

अमरावतीमधून (Amravati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला (Election) गालबोट लागलं आहे. मतदानादरम्यान दोन गट आमने-सामने आले. वादाचं रुपांतर राड्यात झालं आहे.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की!
Follow us on

अमरावती : अमरावतीमधून (Amravati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला (Election) गालबोट लागलं आहे. मतदानादरम्यान दोन गट आमने-सामने आले. वादाचं रुपांतर राड्यात झालं आहे. दरम्यान या सर्व गोंधळात आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत देखील कार्यकर्त्यांनी वाद घातला आहे. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

पंचवार्षिक निवडणुकीत राडा

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था अशी शिवाजी शिक्षण संस्थेची ओळख आहे. आज शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू होते. 9 जागांसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळपासून निवडणूक शांततेत पार पडत होती. अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन देशमुख आणि  काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्यात मुख्य लढत आहे. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्रावर आले, त्यानंतर विक्रम ठाकरे आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचं रुपातंर राड्यात झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

परिसरात तणावपूर्ण शांतता

मतदान सुरू असताना दोन गट आमने-सामने आले. मतदान सुरू असताना अचानक गोंधळ उडाल्याने पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांशी कार्यकर्त्यांनी वाद घातल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली, पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्च केला. या सर्व प्रकारात आमदार देवेंद्र भुयार यांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. मतदान सुरू असताना अचानक दोन गट आमने- सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला. या सर्व प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण शांतता होती.