मुंबई : पाथर्डीतील जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अहमदनगर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलेच खडसावले. कारवाई करायला कचरता कशाला? तुम्ही देवाविरोधात कारवाई करताय का? कारवाई आणि तपास करताना निधर्मी भावनेने वागा, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवा, अशी कडक समज खंडपीठाने पोलिसांना दिली. वर्ष २०१७ मधील तक्रारीच्या आधारे जगदंबा देवी ट्रस्टच्या तत्त्कालीन ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (Cops Must have ‘secular’ approach while probing : Bombay high court)
तत्त्कालीन ट्रस्टींवर फसवणूक, विश्वासघात तसेच काळी जादू केल्याचा आरोप आहे. ट्रस्टिंनी दोन किलो सोने जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच समारंभावर २५ लाख रुपयांची उधळपट्टी केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. खंडपीठाने या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत पोलिसांचे कान उपटले.
धार्मिक भावना असलेल्या प्रकरणांचा तपास करताना पोलिस नेहमीच घाबरतात. त्यांच्या मनात देवाची भिती असते. पोलिसांनी अशा प्रकरणांचा तपास करताना धार्मिक भावना बाजूला ठेवून विज्ञानवादी धोरण अवलंबले पाहिजे. केवळ पोलीसच नव्हे तर सर्वच यंत्रणा देवस्थानच्या प्रकरणांत हात घालायला घाबरतात. म्हणूनच अनेक विभागांकडे देवस्थानशी संबंधित अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, असे निरीक्षण न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने नोंदवले.
Video | Ajit Pawar | मंत्रालयात तुझा काका काम करणार का?, कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला अजितदादांचं मिश्किल उत्तर@AjitPawarSpeaks @NCPspeaks #NCP #AjitPawar pic.twitter.com/H0iSS8Da6D
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
इतर बातम्या