मुंबई : देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढू लागल्याने आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3 हजा 641 रुग्ण आढळले आहेत. सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सोमवारी छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात कोरोनाचे 19 रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात 11 विद्यार्थिनी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्याबरोबरच उर्वरित विद्यार्थिनींचीही चाचणी केली असता, आणखी 8 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे ही संख्या संख्या आता 19 वर गेली आहे. सर्व विद्यार्थिनींना वसतिगृहातच क्वारंटाईन करून वेगळे ठेवण्यात आले आहे.
सध्या मुलींच्या वसतिगृहात कोरोनाबाधित विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींचीही कोरोना चाचणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
छत्तीसगडमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यूही झाला आहे. सध्या दिल्लीत संसर्गाचा दर 18 टक्क्यांनी वाढला आहे.
तर 15 दिवसांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये 6 पटीने वाढ झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 12 पटीने वाढली आहे. त्यामुळे आता दिल्लीबरोबरच महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत.
एकाच वसतिगृहातील मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता वसतिगृहातील सर्व मुलींच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.