Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात 56 हजार 647 नवे रुग्ण, तर 669 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: May 02, 2021 | 11:57 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात 56 हजार 647 नवे रुग्ण, तर 669 रुग्णांचा मृत्यू
MAHARASHTRA Corona
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2021 08:33 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

    पिंपरी-चिंचवडमध्ये आज 2933 नवे कोरोना रुग्ण सापडले. दिवसभरात 2485 कोरोनामुक्त झाले असून, 92 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 02 May 2021 08:31 PM (IST)

    नागपुरात आज 6376 जणांनी केली कोरोनावर मात

    नागपूर : नागपुरात आज 6376 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. तर 5007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आज 112 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकूण रुग्णसंख्या 419370 असून एकूण मृत्यूसंख्या 7599 आहे.

  • 02 May 2021 08:25 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात आज रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या

    पुणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आज पुन्हा 10 हजारावर

    दिवसभरात 11 हजार 661 रूग्णांची झाली वाढ

    तर 159 जणांचा दिवसभरात झाला मृत्यू

    9 हजार 566 जणांना डिस्चार्ज

    एकूण रुग्णसंख्या पोहोचली 8 लाख 60 हजार 844 वर

  • 02 May 2021 08:21 PM (IST)

    पुण्यात उद्याही लसीकरण बंद राहणार

    पुणे : शहरात उद्याही लसीअभावी 45 वर्षावरील व्यक्तीचं लसीकरण राहणार बंद

    आजही शहराला राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा नाहीच

    दोन दिवसापासून लसीकरण होतं बंद

    उद्याही लसीकरण बंद राहणार

    महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

  • 02 May 2021 08:19 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    वाशिम : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतोय. आज जिल्ह्यात 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 680 नवे रुग्ण सापडले. दिवसभरात 718 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 32 दिवसांत 121 रुग्णांचा मृत्यू झाला तर 12493 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

  • 02 May 2021 08:04 PM (IST)

    महाराष्ट्र कोरोना अपडेट

    मुंबई : आज राज्यात 56 हजार 647 नवे रुग्ण
    आज राज्यात 51 हजार 356 रुग्णांनी केली कोरोनावर मात
    आज राज्यात 669 रुग्णांचा मृत्यू

  • 02 May 2021 08:03 PM (IST)

    पुरेशा लस साठ्याअभावी 3 मे रोजी लसीकरण बंद राहणार

    मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी 45 वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण 3 मे 2021 रोजी बंद राहणार आहे. तर 18 ते 44 वर्ष वयोगटाचे लसीकरण पाच केंद्रांवरच सुरु ठेवण्यात येणार आहे. अॅपद्वारे नोंदणी धारकांनीच लसीकरण केंद्रावर यावे, इतरांनी गर्दी करू नये, असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

  • 02 May 2021 05:04 PM (IST)

    नागपूरला अखेर 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप

    नागपूर :

    नागपूरला अखेर 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप

    यापुढे रेमडेसिवीर चा इतर साठा केंद्रीय पद्धतीने खरेदी करून वाटप करा,

    रोज वाटपा संदसर्भातील माहिती FDA च्या वेबसाईटवर अपलोड करा

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

    समन्यायक वितरण करण्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारला दिले निर्देश

    न्यायालयाच्या आदेशानंतरही रेमडीसीविर इंजेक्शन मिळाले नव्हते त्यावर झाली आज सूनवाई

    हाय कोर्टाने सुमोटो याचिका केली होती दाखल

  • 02 May 2021 05:01 PM (IST)

    मुख्य शासकीय कोविड रुग्णालयाच्या इलेक्ट्रिशियनचा कोरोना उपचारात हलगर्जीपणाने मृत्यू

    चंद्रपूर : मुख्य शासकीय कोविड रुग्णालयाच्या इलेक्ट्रिशियनचा कोरोना उपचारात हलगर्जीपणाने मृत्यू, सुदेश सुखदेव टेंभरे यांच्या ICU तील मृत्यूने नातेवाईक संतापले, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगार 10 महिन्यापासून आहेत वेतन वंचित, त्यातच कोरोना रुग्णालयात जोखमीच्या ड्युटीमुळे झाला कोरोना, मुलीला शेवटचा मोबाईल कॉल करताना सुदेश यांनी ऑक्सिजन दिला जात नसल्याची केली होती तक्रार, 24 तासातच सुदेश यांचा मृत्यू झाल्याने सामाजिक संघटना संतप्त-अधिकाऱ्यांना विचारला जाब

  • 02 May 2021 04:12 PM (IST)

    कोविडच्या औषधांचा त्रास जाणवू लागल्याने भाजप आमदार प्रसाद लाड लिलावती रुग्णालयात दाखल

    मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड लिलावती रुग्णालयात दाखल, कोविडच्या औषधांचा त्रास जाणवू लागल्याने अचानक रुग्णालयात दाखल, त्यांना काही दिवसांपुर्वी  कोरोनाची लागण झाली होती.

  • 02 May 2021 03:16 PM (IST)

    दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

    दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शोक व्यक्त

  • 02 May 2021 03:12 PM (IST)

    हरियाणामध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जारी

    हरियाणामध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जारी

    वाढता कोरोना संसर्ग पाहाता हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

    राज्याचे आरोग्य मंत्री अनिल विज यांची ट्वीट करत माहिती

  • 02 May 2021 02:33 PM (IST)

    पुद्दुचेरीमध्ये कोव्हिड-19 1,360 नवे रुग्ण 

    केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये कोव्हिड-19 चे 1,360 नवे रुग्ण आढळून आले आहेत

    रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 16 जणांचा मृत्यू झाला आहे

    एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 61 हजार 361 झाली आहे

    एकूण कोरोनाबळींची संख्या 833 वर पोहोचली आहे

    पुद्दुचेरीमध्ये आता 10,620 सक्रिय रुग्ण आहेत

  • 02 May 2021 01:39 PM (IST)

    चंद्रपुरात गांधी उद्यान योग मंडळाचे कार्यकर्ते बनले ‘प्राणवायू पथक’

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात कोविड काळात युवकांची अनोखा पुढाकार, गांधी उद्यान योग मंडळाचे कार्यकर्ते बनले ‘प्राणवायू पथक’, कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या वरोरा शहरात ऑक्सिजन सिलिंडरची घरपोच मदत, 80 सदस्यांनी राशी एकत्र करत चालविली आहे मोफत सेवा, प्राणवायू पथकाच्या सिलिंडर मदतीने वाचले शेकडोंचे प्राण, माणुसकी लोप पावत चाललेल्या वातावरणात प्राणवायू पथकाची लक्षवेधी कामगिरी

  • 02 May 2021 01:25 PM (IST)

    भोपाळमध्ये ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर बसवून मोफत रुग्णालयापर्यंत पोहोचवणारा देवदूत 

    भोपाळमध्ये जावेद खान नावाचा ऑटो चालक कोरोनादरम्यान ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर बसवून लोकांना मोफत दवाखान्यात पोहोचवण्याचं काम करत आहे. ते म्हणाले, “अशा प्रकारे वाहन चालवण्यास परवानगी नाही. पण पोलीस विभागाने मला परवानगी दिली आणि सांगितले की तुम्ही चांगले काम करत आहात, सुरु ठेवा. “

  • 02 May 2021 12:14 PM (IST)

    तेलंगणामध्ये 7,430 नवे कोरोना रुग्ण, 56 लोकांचा मृत्यू

    गेल्या 24 तासांत तेलंगणामध्ये कोरोनाचे 7,430 नवे रुग्ण 

    56 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    राज्य आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यात गेल्या 24 तासांत 5,567 रुग्ण बरे झाले आहेत

    तेलंगणामध्ये सक्रिय रुग्णसंख्या 80,695 आहे

  • 02 May 2021 12:00 PM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील कोरोना आढावा बैठक सुरु

    पुणे

    -आंबेगाव तालुक्यातील कोरोना आढावा बैठक सुरु

    -जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,माजी खासदार शिवाजी आढळराव उपस्थित

  • 02 May 2021 11:53 AM (IST)

    पहिल्या दिवशी 18-44 वयोगटातील 86,023 लोकांचं लसीकरण

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी 11 राज्यांमध्ये 18-44 वयोगटातील 86,023 लोकांना कोरोनाचं लसीकरण करण्यात आलं आहे

  • 02 May 2021 11:48 AM (IST)

    ओदिशामध्ये 5 मेपासून लॉकडाऊन

    ओदिशा सरकार ने कोविड-19 संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांना पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे, आदेशानुसार, हा लॉकडाऊन 5 मेपासून ते 19 मेपर्यंत असेल

  • 02 May 2021 10:37 AM (IST)

    मेहकर येथे आज 100 कोव्हिड बेडचे उद्घाटन करण्यात आलं आहे

    बुलडाणा

    मेहकर येथे आज 100 कोव्हिड बेडचे उद्घाटन करण्यात आलं आहे

    जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे स्वखर्चातून करताहेत व्यवस्था

    परिसरातील नागरिकांना होणार फायदा

  • 02 May 2021 09:49 AM (IST)

    Tamilnadu Election Result: तामिळनाडूमध्ये द्रमुक 111 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 111 तर अण्णा द्रमुक 65 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.

  • 02 May 2021 09:47 AM (IST)

    शनिवारी देशभरात 18.26 लाख लोकांचं लसीकरण

    देशात आतापर्यंत एकूण 15,68,16,031 लोकांचे लसीकरण झाले आहे

    शनिवारी, देशभरात 18,26,219 लोकांचे लसीकरण झाले

    कालपासून देशात 18 ते 4 वर्ष वयोगटातील लसीकरण सुरु झाले

  • 02 May 2021 09:44 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्ण

    देशात गेल्या 24 तासांत 3,689 लोकांचा मृत्यू

    संसर्गामुळे 3,07,865 लोक बरे झालेॉ

    देशात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33,49,644 झाली आहे

     

  • 02 May 2021 09:08 AM (IST)

    Nashik Corona LIVE Update | नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, पॉझिटिव्ह रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

    नाशिक –

    जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी

    पॉझिटिव्ह रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

    24 तासात 3749 रुग्ण पॉझिटिव्ह

    तर 5206 रुग्ण झाले बरे

    दिवसभरात 40 जणांचा मृत्यू

    जिल्हयात आतापर्यंत 2 लाखांपेक्षा रुगण बरे होऊन घरी

  • 02 May 2021 08:05 AM (IST)

    Nagpur Corona LIVE Update | नागपूरकरांना निःशुल्क ऑनलाईन वैद्यकीय उपचार

    नागपूर  –

    नागपूरकरांना निःशुल्क ऑनलाईन वैद्यकीय उपचार

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार

    नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरकरांसाठी सेवाभावी उपक्रम

    कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.

    वैद्यकीय व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

    त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांची खूप परवड होत आहे. कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळविताना प्रचंड त्रास होत आहे.

    तसेच सर्दी, खोकला, ताप या आणि आरोग्याच्या इतर सामान्य तक्रारी असलेल्या नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही.

    या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून नागपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने एक सेवाभावी उपक्रम नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच सुरू होत आहे.

  • 02 May 2021 08:03 AM (IST)

    Nagpur Corona LIVE Update | हनुमाननगर झोनमधील रेड झोनमध्ये दोन दिवस कोरोना चाचणी अभियान

    नागपूर –

    हनुमाननगर झोनमधील रेड झोनमध्ये दोन दिवस कोरोना चाचणी अभियान

    महापौरांच्या निर्देशानंतर फिरते कोव्हिड चाचणी केंद्र तैनात

    हनुमाननगर झोन मध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथील रेड झोनमध्ये रविवार व सोमवार दोन दिवस पूर्णपणे चाचणी अभियान

    फिरत्या चाचणी केंद्राद्वारे विविध भागातील नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता या मोहिमेला सुरुवात होईल.

  • 02 May 2021 07:38 AM (IST)

    Nagpur Corona LIVE Update | रविवारी दहा झोनमधील दहा केंद्रांवर कोरोना लसीकरण

    नागपूर –

    रविवारी दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण

    नागपूर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी २ मे रोजी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.

    १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल,

    अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

    विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे.

    केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    तसेच राज्य शासनाद्वारे ४५ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपाला ११५० लस प्राप्त झालेल्या आहेत.

  • 02 May 2021 06:39 AM (IST)

    ऑक्सिजन ट्रेन गोंदिया जिल्ह्यात दाखल

    गोंदिया –

    विशाखपट्टणमयेथून ऑक्सिजन घेऊन निघालेली रेल्वे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली

    या रेल्वेत ऑक्सिजनचे 5 कंटेनर असून ही रेल्वे, नाशिक, मुंबई याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणार आहे

    त्यामुळेच महाराष्ट्रतील रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे

  • 02 May 2021 06:32 AM (IST)

    निफाडमध्ये एकूण 314 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    नविन कोरोना बाधित अहवाल आलेले रुग्ण – 314

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 15228

    आजपर्यंत एकूण बरे झालेले – 12438

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 464

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2326

  • 02 May 2021 06:30 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासांत 3897 रुग्ण सापडले

    मुंबईत गेल्या 24 तासांत 3897 रुग्ण सापडले

    एकूण रुग्णांची संख्या 652368

    मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनानं 90 जणांचा मृत्यू

     

     

  • 02 May 2021 06:25 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    राज्यात गेल्या 24 तासांत 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    राज्यात आज रोजी एकूण 6,63,758 सक्रिय रुग्ण

    राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 46,65,754

    सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 % एवढा

    राज्यात आज 61,326 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

    राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत