Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

| Updated on: May 08, 2021 | 12:37 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी किती घातक?
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 May 2021 11:09 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

    अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन,जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

    15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

    9 मे च्या रात्री 12 वाजेपासून ते 15 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत लाकडाऊन

    कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आदेश

    दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजीपाला फेरीवाल्यांना मुभा

    तर सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत शिवभोजन थाली, व रेस्टॉरंट, हॉटेल ला पार्सल ची सुविधा सुरू राहील

    अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार आहे

  • 07 May 2021 11:07 PM (IST)

    बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अखेर कडक लॉकडाऊन 

    बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अखेर कडक लॉकडाऊन

    उद्या सकाळपासून 15 मे पर्यंत असेल कडक लॉकडाऊन

    बदलापूर पालिकेच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आदेश

    या कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार

    किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी

    अखेर बदलापुरात मुरबाड पॅटर्नप्रमाणे लॉकडाऊनची घोषणा


  • 07 May 2021 11:06 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 660 नवे रुग्ण

    उस्मानाबाद  कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे  660 नवे रुग्ण

    दिवसभरात 8 जणांचा मृत्यू तर 764 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 223, तुळजापूर 57,उमरगा 60, लोहारा 87, कळंब 83, वाशी 48, भूम 83 व परंडा 19 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7134 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 38 हजार 820 नमुने तपासले त्यापैकी 43 हजार 357 रुग्ण आढळले

    आतापर्यंत 35 हजार 210 रुग्ण कोरोनामुक्त

    आतापर्यंत 1013 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

  • 07 May 2021 09:04 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 9 ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात 9 ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध

    9 मे पासून दुपारी 12 वाजेपासून निर्बंध लागू

    विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई होणार

    शिवभोजन थाळी, हॉटेल, खानावळ सकाळी 11 ते 7 पर्यंत सुरु. फक्त घरपोच सुविधा

    कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णतः बंद

  • 07 May 2021 08:56 PM (IST)

    यवतमाळमध्ये 7 दिवसांचा लॉकडाउन, 9 ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध 

    यवतमाळ- यवतमाळमध्ये 7 दिवसांचा कडक लॉकडाउन

    9 मे ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध

    दूध, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत मुभा

    चौकात भाजीपाला, दूध विक्री करण्यास असणार बंदी

    अनावश्यक फिरणाऱ्यांविरोधात केली जाणार कडक कारवाई

  • 07 May 2021 08:20 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4036 कोरोना रुग्णांची वाढ, 43 जणांचा मृत्यू

    नाशिक कोरोना अपडेट

    – पूर्ण बरे झालेले एकूण रुग्ण- 3606

    – दिवसभरात 4036 कोरोना रुग्णांची वाढ

    नाशिक मनपा- 1815 रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 1979 रुग्ण

    मालेगाव मनपा- 0068 रुग्ण

    – नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3784

    दिवसभरातील मृत्यू-  43

  • 07 May 2021 08:18 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 2451 कोरोना रुग्णांची वाढ, 3491 रुग्णांना डिस्चार्ज 

    पुणे  – दिवसभरात 2451 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 3491 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 85 रुग्णांचा मृत्यू, 21 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 1411 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 441702 वर

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 38481 वर

    – एकूण मृत्यू -7245

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 395976

     

  • 07 May 2021 07:48 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात 6 दिवसांचा जनता कर्फ्यु

    उस्मानाबाद जिल्ह्यात 6 दिवसांचा जनता कर्फ्यु

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश

    अत्यावश्यक सेवा सुरू

    किराणा, बेकरी, भाजीपाला, कृषी दुकाने बंद

    8 मे  ते 13 मे असा 6 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर

    अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, पेट्रोल पपं,एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा सुरू राहतील

    भाजीपाला , फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी व इतर आस्थापना दुकाने बंद

  • 07 May 2021 07:47 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 531 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण   

    अकोला कोरोना अपडेट

    आज दिवसभरात 531 रुग्ण पॉझिटिव्ह

    2647 अहवालांपैकी 2116 जणांचे अहवाल निगेटिव्ह

    कोरोनाबाधितांचा आकडा 44515 वर

    आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत 765 जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात 488 जणांना डिस्चार्ज

    तर 37348 जणांनी केली कोरोनावर मात

    सध्या 6402 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु

  • 07 May 2021 07:10 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 6526 रुग्णांनी केली कोरोनावर मात, 4306 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

    नागपूर : बधितांच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

    6526 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    4306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    तर 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 442144

    बरे होणाऱ्यांची संख्या – 371858

    एकूण मृत्यू संख्या – 7988

  • 07 May 2021 07:08 PM (IST)

    बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 12 मे पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा

    बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

    12 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

    कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश

    दररोज सकाळी 7 ते 10 पर्यंत भाजीपाला फेरीवाल्यांना मुभा

    10 ते 12 पर्यंत बँक सुरू राहणार

    अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद

  • 07 May 2021 07:06 PM (IST)

    वसई विरारमध्ये दिवसभरात 725 नागरिकांना कोरोनाची लागण

    वसई-विरार कोरोना अपडेट

    मागच्या 24 तासात 725 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

    दिवसभरात 621 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58,628 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 46,061 वर

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1178 वर

    सध्या 11389 जणांवर उपचार सुरु

  • 07 May 2021 06:55 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1449 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1449 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 23 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 69388

    एकूण कोरोनामुक्त : 52447

    सक्रिय रुग्ण : 15882

    एकूण मृत्यू : 1059

    एकूण नमूने तपासणी : 404847

  • 07 May 2021 06:55 PM (IST)

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1449 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 23 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण 69388

    एकूण कोरोनामुक्त 52447

    अॅक्टिव्ह रुग्ण 15882

    एकूण मृत्यू 1059

    एकूण नमुने तपासणी 404847

  • 07 May 2021 06:24 PM (IST)

    वाशिममध्ये दिवसभरात 597 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद  

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात दिवसभरात 07 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 597 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

    दिवसभरात 330 जणांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 37 दिवसात 144 रुग्णांचा मृत्यू,  तर नवे 15039 कोरोना रुग्ण आढळले

    जिल्ह्यात रुग्णांची संख्या – 31114

    सध्या सक्रिय रुग्ण– 4511

    आतापर्यंत कोरोनामुक्त- 26271

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 331

  • 07 May 2021 06:22 PM (IST)

    येवल्यात दिवसभरात 67 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    नाशिक : येवल्यात दिवसभरात 67 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    आतापर्यंत 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 4439 वर

    आतापर्यंत 3928  जण कोरोनामुक्त

    उर्वरित 332 जणांवर उपचार सुरु

    दिवसभरात 62 जणांना डिस्चार्ज

  • 07 May 2021 04:35 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त, 17 मृत्यूसह 427 नव्या बाधितांची नोंद

    गडचिरोली :  जिल्हयात 427 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 611 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील बाधित 24587 पैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 19687 वर पोहचली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात सध्या 4394 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयात एकूण 506 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

     

  • 07 May 2021 04:32 PM (IST)

    गडचिरोली तीन तालुक्यांसाठी दीडशे खाटाचे क्वॉरन्टाईन सेंटर

    गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संघ्या झपाट्याने वाढ झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि क्वॉरन्टाईन सेंटर वगळून गडचिरोली जिल्ह्यात एकही खासगी रुग्णालय उपलब्ध नव्हते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका प्रशासनाने दीडशे खाटांचे क्वॉरन्टाईन सेंटर तयार केले आहे. औद्योगिक केंद्राच्या इमारतीत दीडशे खाटांचे रुग्णालय उभे राहिल्यामुळे आता कोरोनाशी दोन हात करणे सोपे होणार आहे.

  • 07 May 2021 03:04 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात सात दिवस कडक लॉकडाऊन

    अमरावती जिल्ह्यात सात दिवस कडक लॉकडाऊन

    जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय

    रविवारी दुपारी 12 वाजता पासून 15 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित

    भाजीपाला सह किराणा दुकानेही राहणार बंद,ऑनलाइन सुविधा सुरू राहणार

    हॉस्पिटल व मेडिकल राहणार फक्त सुरु

    आता नियम मोडण्याऱ्याना दंड व वाहने जप्त केली जाणार

    जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची घोषणा

  • 07 May 2021 02:16 PM (IST)

    लसींच्या दराबद्दल अदर पुनावालांशी चर्चा करणार : अजित पवार

    अजित पवारांची कोव्हिड स्थितीवर आढावा बैठक

    पुण्यात कोरोनाची समाधानकारक स्थिती

    ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरच्या काळाबाजारावर चर्चा

    पुण्यात कडक निर्बंध करण्याच्या सूचना

    लसींच्या पुरवठ्याबाबत अदर पुनावालांशी चर्चा

    अदर पुनावाला अजून १० ते १२ दिवस भारतात येणार नाही

    ऑक्सिजनच्या कमतरतेवरही चर्चा केली

    १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात तुटवडा

    मराठा आरक्षण मिळवून देण्यास सरकार कटीबद्ध

    सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक

    राज्य सरकारचं काहीही चुकलं नाही

    वकिलांची फौज जशीच्या तशी

    गरज पडल्यास एकदिवशीय अधिवेशन बोलवू

  • 07 May 2021 02:02 PM (IST)

    या भागातील सर्वामान्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे – एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे

    या भागातील सर्वामान्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे

    दिलासा देण्याचे कार्य सुरू आहे

    नगरपालिके च्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार करणार

  • 07 May 2021 01:57 PM (IST)

    बीडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन

    बीडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन

    शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

    500 बेडचं कोव्हिड सेंटर आजपासून सुरू

    उद्घाटनाला अनेक शिवसेना नेते उपस्थित

    जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी उभारलंय कोव्हिड सेंटर

  • 07 May 2021 12:56 PM (IST)

    गोकूळ उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट, सत्ता येताच सतेज पाटील यांची मोठी घोषणा

    कोल्हापूर

    गोकूळ उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट

    सत्ता येताच सतेज पाटील यांची मोठी घोषणा

    आज नूतन संचालकांसोबत नेते मंडळींची बैठक

    दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू

    दोन महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार

    किमान दोन संचालक गोकूळच्या दूध रोज मुख्य कार्यालयात उत्पादकांना भेटणार

  • 07 May 2021 12:30 PM (IST)

    हेअर सलून आणि ब्यूटी सेक्टरच्या व्यवसायिकांची उद्या महत्वाची बैठक

    हेअर सलून आणि ब्यूटी सेक्टरच्या व्यवसायिकांची उद्या महत्वाची बैठक

    सततच्या लॉकडाउनमुळे या क्षेत्राशी निगडित लोकांसमोर भयंकर आर्थिक संकट

    आतापर्यंत अनेकांनी केली आहे आत्महत्या तर लोकडाउन असाच शुरू राहिला तर भूकबली देखील जातील असी शक्यता

    म्हणून उद्या हेयर सलून आणि ब्यूटी स्केटर मधल्या व्यवसायिकनच्या अस्तित्व टिकविन्यासाठी क़ाय भूमिका घ्यावी ही बाबत महत्वाचा निर्णय घेणार

    श्री संत सेना महाराज सभागृह दादर मध्ये उद्या दुपारी 2 .00 वाजता बैठक

    सलून ब्यूटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र तर्फे बैठकीत उपस्थित राहन्यासाठी आव्हान

  • 07 May 2021 12:01 PM (IST)

    औरंगाबाद शहरतील शहागंज परिसरात तुफान गर्दी, रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळेना

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरतील शहागंज परिसरात तुफान गर्दी

    गर्दीमुळे रस्त्यावर झाली ट्रॅफिक जॅम

    ट्रॅफिक जॅम मध्ये रुग्णवाहिकेलाही मिळेना रस्ता

    रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची झाली तुफान गर्दी

    औरंगाबादकरांना पडला कोरोनाचा विसर

  • 07 May 2021 11:30 AM (IST)

    नागपुरातील मोक्षधाम स्मशान स्वच्छ ठेवणाऱ्या रणरागिणी, निस्वार्थ सेवा

    – नागपुरातील मोक्षधाम स्मशान स्वच्छ ठेवणाऱ्या रणरागिणी

    – मोक्षधाम परिसर स्वच्छतेसाठी निस्वार्थ सेवा

    – मोक्षधाममध्ये होते कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार

    – बुटीबोरीतील कर्मयोगी फाऊंडेशनचा चांगला उपक्रम

    – झाडांना पाणी, मृतदेह जाळण्याच्या जागेची स्वच्छता

    – कोरोनाबाधीत मृतकाची राखंही गोळा केली जाते…

  • 07 May 2021 11:14 AM (IST)

    सोलापूर शहरात लसीकरणासाठी मोठी गर्दी

    सोलापूर शहरात लसीकरणासाठी मोठी गर्दी

    शहरातील 17 लसीकरण केंद्रासमोरा लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

    लसीकरणासाठी सलग तिसऱ्या दिवशी मोठी गर्दी

    लसीकरण केंद्रातच सोशल डिस्टंसिंगचा उडतोय फज्जा

  • 07 May 2021 11:13 AM (IST)

    सोलापुरात किराणा भुसार माल खरेदीसाठी कुंभार वेस येथे मोठी गर्दी

    सोलापूर –

    कुंभार वेस परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी

    उद्या रात्री आठ वाजल्यापासून जाहीर करण्यात आला आहे लॉकडाऊन

    पंधरा तारखेपर्यंत शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन

    लॉकडाऊन आधी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

  • 07 May 2021 10:25 AM (IST)

    औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावर सलग दुसऱ्या दिवशी उसळली गर्दी

    औरंगाबाद –

    औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावर सलग दुसऱ्या दिवशी उसळली गर्दी

    लसीकरणासाठी नागरिकांच्या लागल्या लांबच लांब रांगा

    लसीचा साठा कमी असल्यामुळे अनेक नागरिकांना मिळणार नाही लस

    लस मिळत नसल्यामुळे जेष्ठ नागरिक झाले हवालदिल

    औरंगाबादेत लसीकरण मोहिमेचा रोजच उडतोय गोंधळ

  • 07 May 2021 10:24 AM (IST)

    नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले निलंबित

    नागपूर –

    नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले निलंबित

    पोलिसांच्या ताब्यात असलेले रेमडीसीविर इंजेक्शन चे काळाबाजार करणारे दोन आरोपी पळून गेल्यानं केले निलंबित

    पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं निलंबन

  • 07 May 2021 10:09 AM (IST)

    सोलापुरात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड

    सोलापूर –

    भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड

    भाजीपाला खरेदीसाठी अक्षरशा जत्रेचे स्वरूप

    सोशल डिस्टंसिंगचा उडाला मोठा फज्जा

    सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातल्या रस्त्यावरचा प्रकार

    उद्या रात्री आठ वाजल्यापासून जाहीर करण्यात आला आहे लॉकडाऊन

    त्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठी झुंबड

  • 07 May 2021 10:08 AM (IST)

    अकोल्यातील प्रख्यात होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक कुचर यांचे कोरोनामुळे निधन

    अकोल्यातील प्रख्यात होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक कुचर यांचे कोरोनामुळे निधन

    शहरातल्या राउतवाडी येथील दवाखान्यात करायचे प्रॅक्टीस

    डॉक्टर वडिलांनी मुलाकडे दिली होती दवाखान्याची जबाबदारी

  • 07 May 2021 09:43 AM (IST)

    सांगलीत कोरोना रुग्णाच्या वाढदिवसाची जंगी पार्टी, माजी ग्रामपंचायत सदस्याविरोधात गुन्हा

    सांगली –

    कोरोना रुग्णाची वाढदिवसाची जंगी पार्टी

    माजी ग्रामपंचायत सदस्याविरोधात गुन्हा दाखल

    मिरज तालुक्यातील विजयनगर येथील घटना

    कोरोना पजिटीव्ही असनाना ही रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस केला साजरा

    मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    राकेश श्रीपाल कुरणे असे कोरोना रुग्णाचे नाव

    वाढदिवस साठी गेलेल्या 200ते 300 जणांचे दणाणले धाबे

    या प्रकरणानंतर आरोग्य विभागा ची उडाली तारांबळ

    सवसायितांची ची कसून चौकशी सुरू

  • 07 May 2021 09:11 AM (IST)

    सोलापुरात डी-मार्टसमोर सकाळी सहा वाजल्यापासून रांग

    सोलापूर –

    डी-मार्टसमोर सकाळी सहा वाजल्यापासून रांग

    उद्या रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेपर्यंत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन

    त्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा

    जुळे भागातील डी-मार्ट जवळ नागरिकांच्या रांगा

  • 07 May 2021 09:10 AM (IST)

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं संचारबंदीचं उल्लंघन

    औरंगाबाद –

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं संचारबंदीचं उल्लंघन

    संचारबंदीच्या काळात गर्दी जमवून केलं विकास कामांचं उद्घाटन

    पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरात केलं विकास कामांचं उद्घाटन

    उदघाटनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची तुंबळ गर्दी

    लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही मंत्री संदीपान भुमरे यांनी जमवली गर्दी

    उद्घाटन करून गर्दीसमोर केलं भाषणही

    एकीकडे कोरोनाने लोक मरत असताना शिवसेनेचे मंत्री मात्र उद्घाटनात व्यस्त

  • 07 May 2021 09:08 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री घेणार बैठक

    पुणे

    पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री घेणार बैठक

    सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होणार बैठक

    हायकोर्टाच्या सुचनेनंतर बैठकीत कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णय होणार का याकडे लक्ष

  • 07 May 2021 09:05 AM (IST)

    नाशकात अंत्यसंस्कार नोंदणीसाठी महापालिकेचे अँप

    नाशिक – अंत्यसंस्कार नोंदणीसाठी महापालिकेचे अँप

    शहरातील 18 स्मशानभूमीत जागा उपलब्धतेबाबत मिळणार माहिती

    गेल्या 41 दिवसात शहरात लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित

    प्रत्यक्ष मृत्यू आकडा आणि महापालिकेच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याने आयुक्तांचा निर्णय

    एप्रिल महिन्यात 15 दिवसात सव्वा दोन हजार मृत्यू

    समशानभूमीत किती जागा शिल्लक आहे, किती वाजता जागा मिळणार याची मिळणार माहिती

  • 07 May 2021 08:30 AM (IST)

    नागपूर विद्यापीठाच्या पदव्यूत्तर प्रथम वर्षाच्या परिक्षा स्थगित

    – नागपूर विद्यापीठाच्या पदव्यूत्तर प्रथम वर्षाच्या परिक्षा स्थगित

    – कोरोनाच्या भयवह स्थितीमुळे परिक्षा एक महिन्यासाठी स्थगित

    – कोरोनामुळे सध्या सुरु असलेल्या परिक्षा महिनाभरासाठी स्थगित

    – प्राधिकरण आणि प्राचार्य फोरमची मागणी मान्य

    – परिक्षा स्थगित केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

  • 07 May 2021 08:19 AM (IST)

    नागपुरात कोरोनाबाधित महिलेची रुग्णालयाच्या पाचव्या माळ्यावरुन उडी घेत आत्महत्या

    – नागपुरात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

    – एम्स रुग्णालयाच्या पाचव्या माळ्यावरुन उडी घेऊन केली आत्महत्या

    – रेणुका रमेश अलघटे या महिलेवर एम्समध्ये सुरु होते उपचार

    – प्रकृती खालावल्याने ३ मे रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं

    – महिलेवर कोरोनासह मानसिक उपचारंही सुरु होते

  • 07 May 2021 08:12 AM (IST)

    मिशन ऑक्सिजन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात होणार 14 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

    कोल्हापूर :

    मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्यात होणार 14 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

    जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य सरकारच्या विशेष निधीतून उभारले जाणार प्रकल्प

    सीपीआर,आयसोलेशन, आय जी एम या महत्त्वाच्या रुग्णालयांचा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातही करता येणार ऑक्सीजन निर्मिती

    ऑक्सीजन निर्मिती साठी ची निविदा प्रक्रिया सुरू

    प्रकल्पांसाठी 12 कोटींचा खर्च अपेक्षित तर प्रकल्पांमधून रोज 1800 सिलेंडर ऑक्सीजन निर्मिती करता येणार

    येत्या जून महिन्यापर्यंत प्रकल्पांचा काम पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

  • 07 May 2021 08:11 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खासगी रुग्णालयांना 48 व्हेंटिलेटर; रुग्णांकडून नियमित दराच्या पन्नास टक्के दर आकारण्याची सूचना

    पिंपरी-चिंचवड

    – महापालिकेतर्फे खासगी रुग्णालयांना 48 व्हेंटिलेटर; रुग्णांकडून नियमित दराच्या पन्नास टक्के दर आकारण्याची सूचना

    -पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कंपन्यांच्या ’सीएसआर’ फंडमधून व्हेंटिलेटर उपलब्ध झालेत

    – ते तातडीने सुरु करता येण्यासाठी ऑक्सिजन पाइपलाइन सुविधा असलेल्या रुग्णालयांना तात्पुरत्या आणि अटी-शर्तीवर दिले

    – त्यांची देखभाल आणि दुरुस्ती रुग्णालयांनी करावयाची आहे. महापालिकेच्या वॉररुममध्ये नोंद झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाणार

    – हे व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांकडून नियमित दराच्या पन्नास टक्के दर आकारण्याची सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत

  • 07 May 2021 08:00 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोविशिल्ड’चे पाच हजार डोस उपलब्ध; आज फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांचे लसीकरण

    पिंपरी चिंचवड

    -‘कोविशिल्ड’चे पाच हजार डोस उपलब्ध; आज फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांचे लसीकरण

    -शहरात 31 ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर लस देणे सुरू राहणार आहे

    -तर आज 18 ते 44 वर्ष वयोगटातील 1600 लाभार्थ्यासाठी शहरात आठ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे

  • 07 May 2021 07:58 AM (IST)

    नागपुरात सेंट्रल कंट्रोल रुममधून कोविड बेड व्यवस्थापन सुरु

    – नागपुरात सेंट्रल कंट्रोल रुममधून कोविड बेड व्यवस्थापन सुरु

    – गरजूंना बेड मिळावे म्हणून सेंट्रल कंट्रोल रुमची सुरुवात

    – कंट्रोल रुमच्या माध्यमातून आलेल्या रुग्णांना बेड देणे बंधणकारक

    – उच्च न्यायालच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानं सुरु झाली कंट्रोल रुम

    – ८० टक्के क्षमतेत गंभीर रुग्ण सोडून इतरांना दाखल करता येणार नाही

    – कंट्रोल रुममधून बेड अलॉट झाल्यानंतर रुग्णाला दाखल करता येणार

    – मनपा आयुक्त बी राधाकृष्ण यांचे निर्देश

    – संपर्क क्रमांक – ०७१२-२५६७०२१, व्हॉटसप नंबर – ७७७००११५३७

  • 07 May 2021 07:05 AM (IST)

    नागपूरला मिळाल्या 61 हजार लसी, जिल्ह्यातील लसीकरणाला येणार गती

    – नागपूरला मिळाल्या 61 हजार लसी, जिल्ह्यातील लसीकरणाला येणार गती

    – लस मिळाल्याने आज ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण वेगावे

    – १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी आता नागपूरात ६ केन्द्रांवर लसीकरण

    – राज्य शासनाचे कोटयातून मिळाला लसीचा साठा

    – लस मिळाल्यामुळे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी आता ९६ केन्द्रांवर लसीकरण

    – १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

  • 07 May 2021 06:57 AM (IST)

    नागपुरात मध्यरात्री उरकला भव्य लग्न समारंभ, 100 पेक्षा जास्त पाहुणे, कोरोनाचे नियम धाब्यावर

    – नागपुरात मध्यरात्री उरकला भव्य लग्न समारंभ

    – लग्न समारंभात 100 पेक्षा जास्त पाहुणे, कोरोनाचे नियम धाब्यावर

    – नागपूरातील सतरंजीपूरा झोन हद्दीत सुदर्शन नगरात लग्न समारंभ

    – २० पाहूण्यांची परवानगी, १०० पेक्षा जास्त पाहाणे, बॅंड बाजार बारात कशी?

    – अनेकांनी घातला नव्हता मास्क, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा

    – मध्यरात्री दोन वाजता पोलीस आणि मनपाच्या एनडीएस स्कॅाडने केली कारवाई

    – मनपाने आकारला ५० हजारांचा दंड

  • 07 May 2021 06:50 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात आढळले 2328 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आढळले 2328 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2511 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15902 वर

    उपचार घेणारे 1134 जण कोरोनामुक्त

    गेल्या 24 तासांत अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67234 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 85647 वर

  • 07 May 2021 06:48 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 813 नव्या रुग्णांची नोंद

    उस्मानाबाद :

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे  813 नवे रुग्ण

    गेल्या 24 तासांत 729  रुग्णांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 288, तुळजापूर 72,उमरगा 86, लोहारा 49, कळंब 104, वाशी 48, भूम 138 व परंडा 28 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 7252 सक्रिय रुग्ण

    आतापर्यंत 34 हजार 449 रुग्ण बरे, रिकव्हरी रेट 81.42 टक्क्यांवर

    आतापर्यंत 1005 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, मृत्यूदर 2.29 टक्क्यावर

  • 07 May 2021 06:47 AM (IST)

    ठाण्यात गेल्या 24 तासांत 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    ठाणे कोरोना अपडेट

    गेल्या 24 तासांत 692  जण कोरोनामुक्त

    दिवसभरात 601 जणांना कोरोनाची बाधा,

    कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,22,793 वर

    आतापर्यंत 1,13,883 रुग्ण कोरोनामुक्त

    रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.7 टक्क्यांवर

    सध्या 7,167 रुग्णांवर  उपचार सुरु

    दिवसभरात 8 जणांचा मुत्यू

    आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,743 जणांचा कोरोनामुळे मृत्यू