Corona Cases and Lockdown News LIVE : ठाण्यात पार्किंग प्लाजा कोव्हिड सेंटरमध्ये पाणीच नाही, बाथरुम, शौचालयमध्येही पाणी नाही

| Updated on: Apr 12, 2021 | 11:53 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : ठाण्यात पार्किंग प्लाजा कोव्हिड सेंटरमध्ये पाणीच नाही, बाथरुम, शौचालयमध्येही पाणी नाही
corona virus news
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Apr 2021 10:12 PM (IST)

    नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्याने 10 रुग्णांचा मृत्यू

    – नालासोपाऱ्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधित रुगणांचा मृत्यू

    – ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने रुगणांचा मृत्यू झाला असल्याचा मयताच्या नातेवाईकांचा आरोप

    – नालासोपारा पूर्व विनायक हॉस्पिटल मध्ये 2 तासात 7 जणांचा तर रिद्धीविनायक रुग्णालयात 3 जणांचा असा एकूण 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू

    – संतप्त नातेवाईकांचा विनायक हॉस्पिटलमध्ये राडा

    – ऑक्सिजनमुळे नाही तर क्रिटिकल परिस्थितीमुळे रुगणांचा मृत्यू झाला असल्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा दावा

  • 12 Apr 2021 10:09 PM (IST)

    ठाण्यात पार्किंग प्लाजा कोव्हिड सेंटरमध्ये पाणीच नाही, बाथरुम, शौचालयमध्येही पाणी नाही

    ठाण्यातील पार्किंग प्लाजा कोविड सेंटर मध्ये गेली 2 तास झाले पाणीच नाही, रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, बाथरूम आणि शौचालय मध्येही पाणी नाही. दोन दिवसांपूर्वी याच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासली होती. पुन्हा ठाणे पालिकेचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.


  • 12 Apr 2021 10:02 PM (IST)

    साताऱ्यात जिल्ह्यात दिवसभरात 526 नवे कोरोनाबाधित रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट 

    जिल्ह्यात आज दिवसभरात 526 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 6 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1852 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 4059 वर

    तर उपचार घेणारे 277 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 501789 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 56080 वर

  • 12 Apr 2021 10:01 PM (IST)

    ठाण्यात दिवसभरात 1394 नवो कोरोनाबाधित रुग्ण

    ठाणे कोरोना अपडेट :

    # आज 1,394 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 97,131 इतकी आहे
    # आज 1,064 रुग्ण कोरोनातून झाले बरे
    # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 79,526 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 82% इतकं आहे )
    # 16,152 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत
    # आज 6 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,453 जणांचा मृत्यू झाला
    # मागील 24 तासात एकूण 7,468 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 1,394 ( 14.29% ) कोरोना बाधित झाले आहेत

  • 12 Apr 2021 08:49 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4849 नवे कोरोनाबाधित, तर 65 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट :
    – दिवसभरात ४८४९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात ३८९६ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ६५ रुग्णांचा मृत्यू. १२ रूग्ण पुण्याबाहेरील.
    – १०५० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३३४५१०.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५३३७६.
    – एकूण मृत्यू -५८०१.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २७५३३३.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२४६६.

  • 12 Apr 2021 08:27 PM (IST)

    मालेगावात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 95 नवे कोरोनाबाधित

    मालेगाव :-मालेगावमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, आज सापडले 95 नवीन रुग्ण, तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मालेगाव मनपा क्षेत्रांतिल सक्रीय रुग्णांची संख्या 1785 वर

    एकूण रुग्ण – 9809
    डिस्चार्ज – 7804
    मृत्यू। – 220

    सक्रीय – 1785

  • 12 Apr 2021 08:25 PM (IST)

    मुंबईकरांना किंचीत दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत घट

    मुंबईकरांना किंचीत दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात 6 हजार 905 रुग्णांची नोंद झाली आहे, तर कालपेक्षा 3 हजार 84 रुग्णांची घट झालीय

  • 12 Apr 2021 08:16 PM (IST)

    करोनाचा फैलाव करण्यासाठी तब्लिगींना जबाबदार धरणारे आता कुंभ मेळ्यात गर्दी होत असताना कुठे आहेत? : अस्लम शेख

    करोनाचा फैलाव करण्यासाठी ताब्लिगींना जबाबदार धरणारे आता कुंभ मेळ्याच्याच गर्दी होत असताना कुठे आहेत? असा सवाल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला. भाजपकडून मतांचं राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. शेख यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊन विषयावरही भाष्य केलं.

    “लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाही. आम्ही सर्व बाजूने विचार करत आहोत. अनेकांची अनेक मते आहेत. ते विचारात घेतले जात आहेत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे आता सरकार चर्चा करत आहे. सगळ्यांना त्याची पूर्व कल्पना दिली जाईल. रेमडेसिव्हीरबाबतची कारवाई केंद्रातून केली जाते”, अशी भूमिका अस्लम शेख यांनी मांडली.

  • 12 Apr 2021 08:10 PM (IST)

    रेमडेसिव्हीर इंजेक्शन सरसकट देऊ नका, भाजप नेते गिरीश बापट यांच्या सूचना

    भाजप नेते गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या :

    – रेमडेसिव्हीर इंजेक्शन सरसकट देऊ नका,

    – जिथे गरज असेल तिथेच रेमडीसीवर वापरावे,

    – केंद्र आणि राज्य आणि महापालिका असा भेद मी करणार नाही,

    – संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नाहीय,

    – पीएमपी सुरू करण्यासंदर्भात सरकारने अद्याप निर्णय घेतला नाहीय,

    – हॉटेल व्यावसायिकांना थोडा दिलासा दिला पाहिजे,

    – मी यामध्ये राजकारण आणणार नाही

  • 12 Apr 2021 08:06 PM (IST)

    वसई विरारमध्ये किरोनाचा हाहा:कार, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोव्हिड रुग्णालय हवालदिल

    वसई विरारमध्ये किरोनाचा हाहा:कार सुरू

    – ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोव्हिड रुग्णालय हवालदिल

    – प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा होणारा पुरवठा काही तासांचाच शिल्लक असल्याच्या बातम्या व्हायरल

    – नालासोपाऱ्याच्या सर्वात मोठ्या रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 3 रुगणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्वत: माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियावर दिलीय. याबाबतचा त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

    – बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक किशन मामा बंडागळे यांचे ऑक्सिजन अभावी कोरोनाने निधन झाल्याचेही राजीव पाटील यांनी आपल्या ऑडीओ क्लिपमध्ये उल्लेख केला

    – दुसरीकडे ऑक्सिजन आभावी नाही तर क्रिटिकल पोझिशनमुळे माजी नगरसेवक किशन बंडागले यांचा मृत्यू, रिद्धीविनायक हॉस्पिटलचे व्यवस्थापक सागर वाघ यांचा खुलासा

    – वसई विरारमधील बहुतेक हॉस्पीटलमध्ये दोन ते तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असल्याचं हॉस्पीटलमधील डॉक्टरांची माहिती

    – वसई विरार मध्ये ऑक्सिजन पुरवठा तात्काळ देण्यात यावा यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पत्रव्यवहार, गंभीर परिस्थितीची जाणीव करुन, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत मागणी केली आहे.

  • 12 Apr 2021 08:01 PM (IST)

    हे सरकार जन्माला आल्यापासूनच कोरोना घेऊन आले, भाजप आमदाराची खरमरीत टीका

    कल्याण : कोरोनाच्या काळात राज्य सरकार हे दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला. केंद्राकडून लस  पुरवण्याचे काम करत आहे. मात्र विनाकारण दिशाभूल करू नये. तसेच हे राज्य सरकार जन्माला आल्यापासून कोरोना घेऊन आले आहे. या सरकारचे करायचे नेमके काय चालले आहे? हेच समजायला मार्ग नाही, अशी खरमरीत टीका कथोरे यांनी राज्य सरकारवर केली.

    खाजगी रुग्णालयातून लूट होत असून त्यावर सरकारचा अंकुश असणे गरजेचे आहे. नागरिक संभ्रमित झाले आहेत. त्याचबरोबर कोविड काळात दुकानदार असतील किंवी सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाबाबतदेखील पाऊल उचलावे, असे देखील कथोरे म्हणाले.

  • 12 Apr 2021 07:28 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात 1798 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    नांदेड कोरोना अपडेट :

    24 तासात 1798 पॉजिटिव्ह

    12859 एक्टीव्ह रुग्ण

    24 तासात 26 मृत्यु

    आतापर्यंत एकूण 1103 मृत्यु

    188 रुग्ण गंभीर

  • 12 Apr 2021 07:26 PM (IST)

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, महाराष्ट्रासह इतर राज्यांना कोरोना लस द्या, काँग्रेस शासित किंवा काँग्रेस आघाडीचं सरकार असलेल्या राज्यांनाही कोरोनाच्या लसी द्या, अशी मागणी त्यांनी केलीय. तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा पुरवठा करा, तसेच मेडिकल वस्तूंवरील जीएसटी रद्द करा, अशा अनेक मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.

  • 12 Apr 2021 07:12 PM (IST)

    …तर उद्या 25 जणांचा अत्यंविधी एकाच सरणावर करण्याची वेळ येईल, धनंजय मुंडे यांचा इशारा

    बीड : “रुग्ण वाढतायेत, लॉकडाऊन शिवाय आता मार्ग नाही. 9 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला. उद्या 25 जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येईल. त्यामुळे लॉकडाऊन हे केलंच पाहिजे”, असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं. मुंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो. प्रशासन म्हणून आपण काळजी घेतली नाही. जनतेने तर काळजी घेतलीच नाही तर परिस्थिती गंभीर होईल याचा अंदाज मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. आता सर्व झटकून कामाला लागा, असं पालकमंत्री धनंजय मुंडे अधिकाऱ्यांना म्हणाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जिल्ह्यात ऑक्सिजनचे 2500 बेड तयार, नव्याने एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करणार. बेड कमी पडले तर खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, अशा सूचना मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

     

     

  • 12 Apr 2021 07:05 PM (IST)

    केडीएमसीत दिवसभरात 1414 नवे कोरोनाबाधित, तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

    कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 1414 नवे कोरोनाबाधित, तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, केडीएमसीत आज दिवसभरात 1103 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, सध्या 16453 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 79843 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • 12 Apr 2021 06:46 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील पोटा गावात 77 जण पॉझिटिव्ह, संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर

    बुलडाणा जिल्ह्यातील पोटा गावात 77 जण पॉझिटिव्ह आले आहेत. संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलं आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा गाव आहे.  आज 145 तापसणी केली असता 77 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उद्यपासून पूर्ण गावाची तपासणी करण्यात येणार आहे.

  • 12 Apr 2021 06:37 PM (IST)

    नाशिकच्या येवल्यामध्ये 74 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

    येवला :कोरोनाबाधित 74 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पर्यंत 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  येवल्यातील 2613 कोरोनाबाधितांची एकूण संख्या पोहचली आहे. तर, कोरोनावर 2166 जणांनी मात करत घरवापसी केली.  उर्वरित 351  जण कोरोणा उपचार घेत आहेत.

  • 12 Apr 2021 06:35 PM (IST)

    नागपुरात आज 69 जणांचा कोरोना मुळे मृत्यू, 5661 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात आज 69 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

    5661 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 3247 जणांनी केली कोरोना वर मात

    एकूण रुग्ण संख्या – 284217

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 220560

    एकूण मृत्यू संख्या – 5838

  • 12 Apr 2021 06:35 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर, 88 कोरोनाचे रुग्ण वाढले तर तीन रुग्णांचा मृत्यू

    वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर…

    आज पुन्हा आढळले 488 कोरोनाचे रुग्ण तर तीन रुग्णांचा मृत्यू…..

    तर 262 रुग्ण झालेत कोरोनामुक्त …

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 37 दिवसात एकूण 55 रुग्णांचा झाला मृत्यू तर मागील 12 दिवसात आढळले 3423 नवे कोरोना रुग्ण….

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 19383

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2422

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 16749

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 211

  • 12 Apr 2021 06:01 PM (IST)

    रेमडेसिव्हीर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात

    रेमडेसिव्हीर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात

  • 12 Apr 2021 05:57 PM (IST)

    चंद्रपूरमध्ये कोरोनाचा हाहाकार विक्रमी 974 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहाकार, 1890 नमुने तपासणीतून आतापर्यतच्या विक्रमी 974 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 10 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 34503

    एकूण कोरोनामुक्त : 28113

    ऍक्टिव्ह रुग्ण : 5888

    एकूण मृत्यू : 502

    एकूण नमूने तपासणी : 304498

  • 12 Apr 2021 05:55 PM (IST)

    पिंपरीत रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार

    पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून ऑक्सिजन देत उपचार सुरु, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील विदारक स्थिती समोर, शहरातील आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण

  • 12 Apr 2021 04:08 PM (IST)

    राज्य सरकारकडून गुढीपाडवासाठी सणानिमित्त गाईडलाईन्स जारी

    राज्य सरकारने गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करावं. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. या गाईडलाईन्सनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय.

     

  • 12 Apr 2021 03:20 PM (IST)

    1200 मेट्रिक टन ऑक्सिजन शंभर टक्के आता फक्त मेडिकलसाठी वापरतो : राजेश टोपे

    जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

    बैठकीत ऑक्सिन संदर्भात चर्चा झाली. ऑक्सिजन संदर्भात काय पर्याय आहेत? कारण 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन शंभर टक्के आता फक्त मेडिकलसाठी वापरतो आहोत. या ऑक्सिजनचं दररोज उत्पादन झालंच पाहिजे. ऑक्सिजनाच्या उत्पादनाच्या कामात योग्यपणे मॉडीटरिंग झालं पाहिजे. त्यानंतर ऑक्सिजन प्रत्येक जिल्ह्याला कोठ्यानुसार दिला गेला पाहिजे. तिथं गेल्यानंतरही जे रिफलिंग केला जातो, त्यावेळी देखील त्याठिकाणी एफडीएचे अधिकारी आणि कलेक्टर तिथे असले पाहिजे. कारण रिफिलिंग सेंटर येथून इन्डस्ट्रीज सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यामुळे हा ऑक्सिजन मेडिकलला कमी पडू शकतो. त्यामुळे मॉडेटरिंग झालं पाहिजे. यासाठी एफडीएला जबाबदार धरलं आहे.

    सध्याची जी परिस्थिती आहे, आता अनेक लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्ध नाहीत. तर मी स्वत: मालेगावमध्ये गेले होतो. तिथे लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथे लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टॅंक निर्माण झाले पाहिजे. असा चर्चेत निर्णय झाला. लिक्विड ऑक्सिजन स्टोरिज टँक झाले पाहिजेत. कारण सध्याचे सिलेंडर लवकर संपतात. त्यानंतर चार-पाच तासात ते संपतात. लिक्विड टँकमुळे पंधरा दिवसांचा साठा ठेवता येईल. याशिवाय रुग्णांनाही योग्य वेळी मिळेल.

    लिक्विड ऑक्सिजनबाबतचा निर्णय घेणं जरुरीचं होतं. सध्या जेवढं लिक्विड ऑक्सिजन होतं ते 12 हजार टन ऑक्सिजन पुरेसं नाही. जवळपासच्या राज्यातूनही आपल्याला मिळत नाहीय. हवेतलं ऑक्सिजन आपण प्युरिफिकेश करतोय. सहा बाय पाच फूट एवढ्या छोट्या मशीनमधून हे मशीन बसवता येतं.

    या बैठकीत रेमडेसिव्हीर इंडजेक्सनबाबतही चर्चा झाली. हे इंजेक्शन 1400 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले जाणार नाहीत.

    मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. सगळ्यांनी लॉकडाऊनची गरज असल्याचं सांगितलं. पण हातावरती पोट असणाऱ्यांं नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या मदतीच्या अनुषंगाने काही गोष्टी कराव्या लागतील. अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करुन याबाबत निर्णय घेतील. लॉकडाऊनसाठी तयारी आणि त्यानंतरचा परिणाम याबाबत चर्चा सुरु आहे.

    सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात ऑक्सिजन बेड वाढवा, बेड वाढवा, डोकॉटर, नर्सेसची संखया वाढवा, पैसे दिले आहेत.

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन 15 दिवसात दुप्पट होणार आहे

    परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षा आज नाही तर उद्या होतील, किंवा सगळ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय होऊ शकतो, त्याबाबत मी आग्रह केला होता, परीक्षा पूढे ढकलण्याचा निर्णयाचे मी स्वागत करतो

    राज्याला आवश्यक ती लस मिळत नाही ही आमची अजूनही खंत आहे. देशाने ज्या लसी दिल्या त्या सगळ्या आम्ही वापरल्या, त्यामुळे आम्हाला आणखी लसी हव्या आहेत. भारत सरकारला विनंती आहे दिवसाला 6 लाख लसी द्यावेत. मग आम्ही भारत सरकारचे आभारी राहू.

  • 12 Apr 2021 02:09 PM (IST)

    पुण्यात आज संध्याकाळपर्यंत रेमेडीसिव्हीरचे पाच हजार इंजेक्शन येणार

    पुणे –

    पुण्यात आज संध्याकाळपर्यंत रेमेडीसिव्हीरचे पाच हजार इंजेक्शन येणार

    रुग्णसंख्येचेच्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलमध्ये रेम्डीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार

    सध्या पुण्यात जवळपास 70 टक्के रेम्डीसिव्हर इंजेक्शनची कमतरता

    रेम्डीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच दिवस लागणार

    अन्न औषध प्रशासनाची माहिती

  • 12 Apr 2021 02:06 PM (IST)

    नागपुरात रुग्णालयाबाहेर ॲब्युलन्समध्ये रुग्णांची बेडसाठी प्रतिक्षा

    – नागपुरात रुग्णालयाबाहेर ॲब्युलन्समध्ये रुग्णांची बेडसाठी प्रतिक्षा

    – ॲब्युलंसमध्येच ॲाक्सीजन लावून रुग्ण बेडची वाट पाहतायत

    – नागपुरात उपचाराअभावी हॅास्पीटलबाहेर रुग्णांवर मरण्याची वेळ

    – नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती

    – खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील कोरोनाचे बेड फुल्ल

    – बेड मिळत नसल्याने रुग्णांवर हॅास्पीटलबाहेर तडफडत मरण्याची वेळ

    – मोडीकल आणि मेयोच्या बाहेर १०० पेक्षा जास्त रुग्ण वेटिंगवर

  • 12 Apr 2021 01:45 PM (IST)

    वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी

    वाशिम:

    वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली

    जणू काही ही दिवाळीच्या खरेदीसाठीची गर्दी आहे

    लॉकडाऊन लागणार असल्याच्या भीतीनं खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी

  • 12 Apr 2021 12:18 PM (IST)

    कोरोना संदर्भात मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु, अजित पवार, राजेश टोपे उपस्थित

    कोरोना संदर्भात मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु,

    राजेश टोपे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

    अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार

    काल टास्क फोर्सची बैठक झाली होती, त्यानंतर आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही बैठक बोलावली

  • 12 Apr 2021 12:12 PM (IST)

    आंबेडकर जयंती घरुनच साजरी करा, दीक्षाभूमी स्मारक समितीचे आवाहन

    नागपूर –

    आंबेडकर जयंती घरुनच साजरी करा, दीक्षाभूमी स्मारक समितीचे आवाहन

    येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी जनतेने घरूनच साजरी करावी, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीने केले आहे.

    २०२० मध्ये काेरोनामुळे आंबेडकरी अनुयायांना कोणतेही सण व उत्सव साजरे करता आले नाही.

    पण, आंबेडकरी जनेतेने अभूतपूर्व संयम दाखवित सर्व सण उत्सव घरूनच साजरे केले.

    कोरोनाची परिस्थिती याही वेळी बदललेली नाही. उलट अधिक भयावह झालेली आहे. ते लक्षात घेता आंबेडकरी जनतेने याही वर्षी संयम दाखवित आंबेडकर जयंती घरूनच साजरी करावी,

    असे आवाहन स्मारक समितीतर्फे केले आहे.

  • 12 Apr 2021 11:57 AM (IST)

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे

    नागपूर –

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे

    मुंबई बॉम्ब स्फोटातील दोन दहशतवादी, एक नक्षलवादी आणि एका तुरुंग रक्षकासह 9 जणांना कोरोनाने विळखा घातला आहे

    नागपूर मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला 2200 कैदी असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सह मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी सुद्धा आहेत त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहातील प्रशासनाला कोरोनाचा सामना करावा लागतोय

    विशेष म्हणजे तीन फाशीचे कैदी आणि मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी यांना देखील कोरोना झाला आहे

  • 12 Apr 2021 11:43 AM (IST)

    नाशकातील मध्यवर्ती कारागृहातील दहा कैद्यांना कोरोनाची लागण

    नाशिक –

    मध्यवर्ती कारागृहातील दहा कैद्यांना कोरोनाची लागण

    बाहेरुन आलेल्या काही कैद्यांची टेस्ट केल्यानंतर 10 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड

    कोरोनाग्रस्त कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरु

  • 12 Apr 2021 11:26 AM (IST)

    येवला शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचं थैमान

    येवला शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे

    गेल्या आठ दिवसात साडेतीनशे जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

    तर 30 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूदराचा आकडा त्यातुलनेत आठ ते नऊ टक्के इतका

  • 12 Apr 2021 11:18 AM (IST)

    ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाही – प्रवीण दरेकर

    प्रविण दरेकर –

    काल जी टास्क फोर्सची बैठक झाली, त्यातील चर्चा अतिशय दुर्दैवी

    त्या 95 टक्के रुग्ण घरीच बसून बरे होतील,

    मग रुग्णालयात बेड का उपलब्ध नाहीत,

    तसेच अस्लम शेख यांचं बेजबाबदार वक्तव्य,

    5 टक्के रुग्ण रुग्णालयात जागा अडवून ठेवतात,

    ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाही

  • 12 Apr 2021 10:42 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली, ‘मरण डोळ्यांसमोर आणि उपचारासाठी बेडची प्रतिक्षा’

    – नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली

    – ‘मरण डोळ्यांसमोर, आणि उपचारासाठी बेडची प्रतिक्षा’

    – मेडीकलच्या कोवीड रुग्णालयाबाहेर आजंही रुग्णांची बेड साठी प्रतिक्षा

    – एक-एक दिवस रुग्ण बेडच्या प्रतिक्षेत फुटपाथवर झोपलेय

    – काहींचं ॲाक्सीजन कमी होतंय, काहींची प्रकृती ढासळतेय

    – सरकारी रुग्णालयात बेड फुल्ल झाल्याने रुग्णांची फरफट

  • 12 Apr 2021 10:40 AM (IST)

    सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा आदेश येईपर्यंत बिगर अत्यावश्यक सेवेचे दुकाने उघडण्यात येणार नाही

    सोलापूर –

    मुख्यमंत्र्यांचा आदेश येईपर्यंत बिगर अत्यावश्यक सेवेचे दुकाने उघडण्यात येणार नाही

    सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय

    टास्क फोर्सच्या बैठकीनंतर होणारा लॉकडाऊन बाबतचा निर्णय

    तोपर्यंत बिगर अत्यावश्यक सेवेचे आस्थपना बंद ठेवण्याचा निर्णय

  • 12 Apr 2021 10:15 AM (IST)

    विकेंड लॅाकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार आहे – विजय वडेट्टीवार

    विजय वडेट्टीवार –

    – विकेंड लॅाकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार आहे

    – भविष्यात भयावह अशी स्थिती हेणार

    – म्हणून १० दिवसांपीसून मी कडक लॅाकडाऊनची मागणी करतोय

    – राज्यात सध्या लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही

    – एक आठवडा किंवा १४ दिवस लॅाकडाऊन? याबाबत कॅबीनेट बैठकीत चर्चा होणार

    – मुंबई लोकल बंद करायची की निर्बंध लावायचे, यावर कॅबीनेट बैठकीत निर्णय

    – मुंबई लोकलची गर्दी थांबावी लागेल

    – मे शेवटीपर्यंत ही विस्फोटक परिस्थिती राहील

    – राज्यात लस संपलीय, अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झालंय

    – गुढीपाडवा आणि १५ एप्रिलनंतर लॅाकडाऊन बाबत निर्णय

    – लॅाकडाऊन मध्ये गरीबांना मदतीसाठी अर्थमंत्री नियोजन करतायत

    – माणसं मरत आहेत, लसीकरण उत्सव कसला?

    – कुणी उपकाराची भाषा करत असेल, तर तो पदाशी बेईमानी करतोय

    – कोरोनावर विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल

    – विरोधकांनी राजकारण करु नये

  • 12 Apr 2021 10:11 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज कोविशिल्डचे 20 हजार लसीचे डोस होणार दाखल

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यात आज कोविशिल्डचे 20 हजार लसीचे डोस होणार दाखल

    अकोला इथून दुपारी 1 वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात लस होणार उपलब्ध….

    पाच दिवस पुरेल इतका डोस साठा होणार उपलब्ध…

    जिल्ह्यातील 30 केंद्रावर होणार सुरुवात

  • 12 Apr 2021 10:10 AM (IST)

    कोरोना वाढला तर त्याचं अपयश केंद्राचंही – संजय राऊत

    संजय राऊत –

    कोरोनाची लढाई मोदींच्या नेतृत्त्वात,

    कोरोना वाढला तर त्याचं अपयश केंद्राचंही,

    राज्याला बदनाम करण्याचं कारस्थान सुरुये

  • 12 Apr 2021 09:45 AM (IST)

    मुंबई पालिकेचा कोरोना संदर्भात मोठा निर्णय, कोव्हिडसाठी पालिका काही पंचतारांकित आणि हॉटेल्स घेणार ताब्यात

    -मुंबई पालिकेचा कोरोना संदर्भात मोठा निर्णय

    -कोव्हिडसाठी मुंबई पालिका काही पंचतारांकित आणि हॉटेल्स घेणार ताब्यात

    -कोव्हिड केअर सेंटर मध्ये होणार रुपांत

    -खासगी डाँक्टरांमार्फत ठेवणार नियंत्रण

    -या ठिकाणी रिकव्हर पेशंट्स ना करणार शिफ्ट

    -मुंबई पालिकेनं 325 ICU बेड केले उपलब्ध ,एकुण संख्या 2466

    -सध्या एकुण बेड्सची संख्या 19151 बेड्स त्यापैकी 3777 रिकामे

  • 12 Apr 2021 09:42 AM (IST)

    निफाड तालुक्यात 249 नवीन कोरोनाबाधित आढळले

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    नवीन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 249

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 244

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 9254

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 6738

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2272

  • 12 Apr 2021 09:36 AM (IST)

    दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाऊननंतर सोलापूर शहरात गर्दी व्हायला सुरुवात

    दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाऊननंतर सोलापूर शहरात गर्दी व्हायला सुरुवात

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी ती गर्दी झाली

    त्यामुळे सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला आहे

  • 12 Apr 2021 09:04 AM (IST)

    मुंबईत वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

    मुंबईत वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे वय 54 यांचा कोरोनामुळे मृत्यू

    कोविड पोसिटीव्ही आल्यानंतर त्यांना बिकेसी कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

    मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं

    12 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांचा मृत्यु झाला

  • 12 Apr 2021 09:03 AM (IST)

    नागपूरच्या कॅाटनमार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – नागपूरच्या कॅाटनमार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – दोन दिवसांच्या लॅाकडाऊनंतर उसळली गर्दी

    – मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – बरेच लोक विनामास्क वावरतात

  • 12 Apr 2021 08:25 AM (IST)

    पुण्यात बेड न मिळाल्याने 51 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा घरातच दुर्देवी मृत्यू

    पुणे

    बेड न मिळाल्याने 51 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा घरातच दुर्देवी मृत्यू

    औंधमधील आंबेडकर वसाहतीत संतोष ठोसर यांचा झाला मृत्यू

    महापालिकेची हेल्पलाईन देखील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप

    बेड न मिळाल्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला ठोसर यांचा मृत्यू.

  • 12 Apr 2021 08:23 AM (IST)

    नाशकात रेमडीसिव्हीरचा काळा बाजार करणारा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

    नाशकात रेमडिसिव्हरचा काळा बाजार करणारा डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

    पंचवटी परिसरात १२०० रुपयांचं इंजेक्शन २० हजाराला विकताना एकाला अटक

    पीडितांच्या तक्रारीनंतर कारवाई

  • 12 Apr 2021 07:59 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नवे 367 कोरोना रुग्ण आढळले

    कोल्हापूर

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नवे 367 कोरोना रुग्ण आढळले

    कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रांत सर्वाधिक 177 रुग्ण

    सब जेल मधील 31 कैद्यांचा ही समावेश

    जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली 2 हजार 210 वर

  • 12 Apr 2021 07:58 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात रेमडिसिव्हीरची भासू लागली कमतरता

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यात रेमडिसिव्हीरची भासू लागली कमतरता

    शासकीय आणि खाजगी रुग्णालया कडे मोजकाच साठा शिल्लक

    जिल्ह्यासाठी 15 हजार इंजेक्शन मागवले

    आज सायंकाळ पर्यंत नवे इंजेक्शन मिळण्याची शक्यता

    गंभीर रुग्णांणाच प्राधान्याने इंजेक्शन देण्यावर भर

  • 12 Apr 2021 07:57 AM (IST)

    कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर जिल्हा राज्यात 15 व्या स्थानी

    कोल्हापूर

    कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर जिल्हा राज्यात 15 व्या स्थानी

    राज्याच्या आरोग्य विभागाचा अहवाल

    पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती आटोक्यात असल्याचं चित्र

  • 12 Apr 2021 07:56 AM (IST)

    मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये लाॅकडाऊनच्या भीतीपोटी ग्राहकांची तोबा गर्दी

    – मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये लाॅकडाऊनच्या भीतीपोटी ग्राहकांची तोबा गर्दी

    – भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी,सोशल डिस्टेंसिंगचा ऊडाला फज्जा

    – कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला 10 हजारांच्या पास पोहोचला, करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लादले

    – मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अशा करोना नियमांचं पालन करणं बंधनकारक

    – मात्र भाजीमार्केटमध्ये करोनाच्या नियमांचा बोजवारा

  • 12 Apr 2021 07:33 AM (IST)

    नागपुरात कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर व्हिनस रुग्णालयात तोडफोड

    – कोरोनाबाधीत महिलेच्या मृत्यूनंतर व्हिनस रुग्णालयात तोडफोड

    – मृतक महिलेच्या मातेवाईकांनी हॅास्पीटलवर केली दगडफेक

    – नागपूरातील शहरातील छावणी परिसरात घटना

    – सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    – नागपुरात हॅास्पीटलवर दगडफेकीची आठ दिवसातली दुसरी घटना

  • 12 Apr 2021 07:24 AM (IST)

    नागपुरात तीन दिवस सरकारी केंद्रांवर RTPCR चाचणी बंद

    – नागपुरात तीन दिवस सरकारी केंद्रांवर RTPCR चाचणी बंद

    – RTPCR चा बॅकलॅाग भरुन काढण्यासाठी मनपाचा निर्णय

    – संसर्ग वाढला असताना RTPCR चाचण्या बंद का?

    – सरकारी चाचणी केंद्रांवर होणार रॅपीड ॲंण्टीजेन चाचणी

    – १३ तारखेला गुढीपाडव्यामुळे शहरातील सरकारी चाचणी केंद्र

    – लक्षणं असलेल्या नागरीकांसाठी करणार विशेष व्यवस्था

  • 12 Apr 2021 07:18 AM (IST)

    नागपूर कारागृहातील नक्षलवादी, दहशतवाद्यांनाही कोरोनाचा विळखा

    – नागपूर कारागृहातील नक्षलवादी, दहशतवाद्यांनाही कोरोनाचा विळखा

    – नागपूर मध्यवर्ती कारागृहात वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण

    – आठ कैद्यांसह नऊ जणांना कोरोनाची लागण

    – मेडीकलमध्ये केली सर्वांची तपासणी, एकाला केले भरती

    – तीन फाशीच्या कैद्यांना झाली कोरोनाची लागण

    – नागपूर कारागृहात सध्या २२०० कैदी भोगत आहेत शिक्षा

  • 12 Apr 2021 07:08 AM (IST)

    नागपुरात ‘लस महोत्सव’, पहिल्याच दिवशी उडाला फज्जा

    – नागपुरात ‘लस महोत्सव’, पहिल्याच दिवशी उडाला फज्जा

    – लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद

    – नागपूर शहरात दररोज १४५०० लसीकरण होते

    – लस महोत्सवच्या पहिल्या दिवशी अवघं ६६०५ जणांचं लसीकरण

    – लस नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतोय

  • 12 Apr 2021 07:08 AM (IST)

    ठाणे महापौरांची मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सॲप विनंती, अवघ्या काही मिनिटांत 24 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

    ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे व्हॉट्सॲप विनंती

    अवघ्या काही मिनिटांत २४ मेट्रिक टन ऑक्सिजनची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली व्यवस्था

     

  • 12 Apr 2021 07:05 AM (IST)

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची 12 एप्रिलला होणारी सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे

  • 12 Apr 2021 07:04 AM (IST)

    माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन  

    पालघर

    माजी आमदार पास्कल धनारे यांचं निधन

    पहाटेच्या दरम्यान कोरोनाने रुग्णालयात झाले निधन

    2014 मध्ये  डहाणू विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून आले होते प्रथमच निवडून ,

    कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गुजरात वापी येथील रेनबो हॉस्पिटल मध्ये सुरू होते उपचार

  • 12 Apr 2021 07:01 AM (IST)

    पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग ‘या’ नंबरवर कॉल करा

    पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग ‘या’ नंबरवर कॉल करा

  • 12 Apr 2021 06:58 AM (IST)

    नांदेडमध्ये 24 तासांत तब्बल 1859 कोरोना पॉझिटिव्ह

    नांदेड – कोरोना अपडेट

    24 तासांत तब्बल 1859 कोरोना पॉझिटिव्ह

    24 तासात 27 मृत्यु

    आतापर्यंत 1077 मृत्यु

    12382 एक्टीव्ह रुग्ण

    230 रुग्ण अत्यवस्थ

  • 12 Apr 2021 06:53 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 63,294 नवे रुग्ण सापडले

    राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 63,294 नवे कोरोना रुग्ण सापडले

    349 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद

    सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.7 टक्के

    राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5,65,587