महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असून, राज्यात 1 जूनपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि एफडीएची मोठी कारवाई
धाड टाकून 10 मेडिकल आक्सिजन सिलेंडर जप्त
सोबतच पाच आक्सिजन सिलेंडर किटही जप्त
काजूपाडा साकीनाका मुंबई ह्या परिसरात संयुक्त कारवाई
बॉम्बे क्रिएशन्स ह्या गारमेंट कारखान्यात लपवून ठेवला होता सिलेंडर
काळा बाजारात विकण्यासाठी केली गेली होती आक्सिजनची खरेदी
संपूर्ण प्रकरणात दोन आरोपींना अटक
साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास आहे सुरू
अकोला कोरोना अपडेट :
आज दिवसभरात 343 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत
1264 अहवाला पैकी 921 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत
एकून कोरोना बाधितांचा आकडा 49735 झाला आहे
आज दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाला आहे
कोरोनामुळे आतापर्यंत 891 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 461 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे
तर 42024 जणांनी कोरोनावर मात केली आहे
उपचार घेत असलेले रुग्ण 6820 आहेत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 607 रुग्ण व 12 मृत्यू तर 819 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 207, तुळजापूर 73,उमरगा 49, लोहारा 59, कळंब 52, वाशी 59, भूम 51 व परंडा 60 रुग्ण
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5886 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 58 हजार 475 नमुने तपासले त्यापैकी 48 हजार 464 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 37.38 टक्के
41 हजार 473 रुग्ण बरे 86 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 1105 तर 2.28 टक्के मृत्यू दर
राज्यात दिवसभरात 34 हजार 448 नवे रुग्ण, 960 कोरोनाबाधितांचा दुर्देवी मृत्यू, तर दिवसभरात 59 हजार 72 रुग्णांना डिस्चार्ज
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1016 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 21 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 76901
एकूण कोरोनामुक्त : 64944
सक्रिय रुग्ण : 10725
एकूण मृत्यू : 1232
एकूण नमूने तपासणी : 431287
गोवा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना रूग्णांवर उपचारांसाठी गोव्याचे सर्व 21 खासगी हॉस्पिटल ताब्यात घेणार
50 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव असणार
21 हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याकडे DDSY कार्ड आहे त्यांचा सर्व खर्च सरकार करणार
वसई-विरार कोरोना उपडेट
मागच्या 24 तासात 536 जणांनी केली कोरोनावर मात
फक्त 264 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62,530 वर
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 51,452 वर
आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1255 वर
कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण 9823
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 1693 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 3033 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 72 रुग्णांचा मृत्यू, 24 रूग्ण पुण्याबाहेरील
– 1413 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 457987
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22304
– एकूण मृत्यू -7659
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 428023
सातारा कोरोना अपडेट
सातारा जिल्ह्यात आज 2379 जण कोरोनामुक्त
तर जिल्हयात 1726 जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह
जिल्हयात आज 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात सध्या 21,506 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
सातारा जिल्ह्यात एकूण 3142 कोरोना रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात एकूण 1,10283 रुग्ण झाले कोरोनामुक्त
जिल्हयात एकुण 1,34957 रुग्ण कोरोनाबाधित
येवला तालुका कोरोना अपडेट
दिवसभरात 47 जणांना कोरोनाची लागण
येवला तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 4733
आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण – 4430
आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 205
सध्या एकूण 98 कोरोनाग्रस्तांवर उपचार
चंद्रपूर : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी चंद्रपूर जिल्हा परिषद सरसावली
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 290 ऑक्सिजन बेडसची सज्ज करणार
58 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 5 बेड्स होणार सज्ज
ऑक्सिजन concentrator आणि 52 जि. प. शाळांत विलगीकरण कक्ष तयार करणार
प्राथमिक आरोग्य केंद्रात शेड उभारणीसाठी निधी केला मंजूर
जि. प. च्या आमसभेत एकूण 3 कोटी 58 लाखांच्या निधीला कोरोना विरोधी उपायोजनेला मंजुरी
पुणे : पुण्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण 15 लसीकरण केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्रांवर कोव्हॅक्सीनचे डोस अपलब्ध असतील. 17 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. सर्व केंद्रांवरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. पहिला डोस दिला जाणार नाही. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
वाशिम कोरोना अलर्ट
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज 10 रुग्णांचा मृत्यू
578 नव्या रुग्णांची नोंद
तर 496 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 15 दिवसात 70 रुग्णांचा मृत्यू
तर पंधरा दिवसांत नवे 7903 कोरोना रुग्ण
पंधरा दिवसांत 7141 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 35263
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4601
आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण – 30295
आतापर्यंत एकूण मृत्यू – 366
गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 118
आज झालेले मृत्यू – 07
आज बरे झालेले रुग्ण – 422
तालुका निहाय रुग्णसंख्या
गोंदिया————–40
तिरोडा————–07
गोरेगाव————–06
आमगाव————–10
सालेकसा————-26
देवरी——————11
सडक अर्जुनी ———–05
अर्जुनी मोरगाव——–13
इतर राज्य————–00
एकूण रुग्ण – 39201
एकूण मृत्यू – 631
एकूण बरे झालेले रुग्ण- 35180
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण- 3390
पणजी : गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या आवारात प्राणवायू प्लांटचे काम पूर्ण
24 तासांत काम पूर्ण केल्याचा प्रकल्प अधिकाऱ्यांचा दावा
गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अथॉरिटीचे ज्यूड कार्व्हलो यांची माहिती
नव्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता 23 हजार लिटर
आता कुणाचाही ऑक्सिजन अभावी मृत्यू होणार नाही
प्रकल्प अधिकाऱ्यांचा दावा
उल्हासनगर :
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
कॅम्प 1 मधील मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळत तळ मजल्यावर आला
आत्तापर्यंत 9 लोकांना फायर ब्रिगेडने सुखरूप बाहेर काढलं
तर अजूनही काही लोक आतमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त होतेय
फायर ब्रिगेड आणि उल्हासनगर महापालिकेकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पासून कडक निर्बंध
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई होणार
17 मे पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार क्रॅक डाऊन मोहीम
सांगली शहरात भाजपाकडून कोविड केअर सेंटर सुरु
50 बेडचे पंडित दीनदयाळ उपाध्याय कोविड केअर सेंटर सुरू
नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरावर पोहोचली कुवैतची मदत
कुवेत येथून ऑक्सिजनचे 9 टँकर जेएनपीटी बंदरावर दाखल
भारताची ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी जगातील अनेक देश मदतीला
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटर वर दिली माहिती
हे ऑक्सिजन टँकर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात पाठविले जातील
पहाटे 5 वाजेच्या सुमारास कुवेत येथून ऑक्सिजन टँकर दाखल
राज्याच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन दिला जाईल
मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटर मधील 100 पेक्षा जास्त रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येतंय…
– चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच कोविंड सेंटरला अलर्ट जारी केला आहे.
– या भागातील जवळील एमटी अग्रवाल राजावाडी मुलंड मिठागर कोविड सेंटर भाभा रुग्णालयया ठिकाणी या रुग्णांना हलवण्यात आलेला आहे.
– त्याबरोबर ज्या रुग्णांना अति दक्षता विभागात भरती करण्यात आलेल्या अशा रुग्णांसाठी मुलुंड अक्ट्राय नाका येथील आयसीयू युनिट हे तयार करुन ठेवण्यात आलेला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लसीकरण सुरु आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरु असतो. मात्र डोंबिवली मोठा गाव येथील शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने लसीकरण केंद्र सुरु आहे. याठिकामी इलेक्ट्रॉनिक्स टोकन देऊन लसीकरण केले जात आहे. त्याठिकाणी कोणताही गोंधळ होत नाही. त्याचा फायदा वयोवृद्ध व्यक्तिंना झाला आहे. आत्तार्पयत 5 हजार नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोल्हापूर
हसन मुश्रीफ –
कोल्हापूर जिल्ह्यातील इंचकरजी परिसरात कोरोनामुळे मृत्यूदर 4. 2 आहे त्यामुळे येथील आयजीएम हॉस्पिटल 300 बेड आयसीयु करण्यात येणार आहे
15 दिवसाच्या आत हे करण्यात येणार आहे
कोल्हापूर जिल्ह्यात टास्क फोर्स येऊन गेलं, त्यांनी दिलेल्या सूचना पाळण्यात येतील
आज रात्रीपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे त्यासाठी लोकांनी साथ द्यावी
येत्या दहा ते पंधरा दिवसात हे वाढलेलं प्रमाण कमी येईल
तिसरी लाट येण्यापूर्वी इचलकरंजी च आय जी एम हॊस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होई
पीएम केअर मधून आलेले व्हेंटिलेटर चायनीज त्याची चौकशी केली पाहिजे
अशोक चव्हाण यांच्या बाबत –
चंद्रकांत दादांनी केलेली टीका बरोबर नाही, रागवायचं कशाला, फडणवीस वकील आहेत त्यांना माहिती आहे मराठा आरक्षणाचं काय होणार आहे
चंद्रकांत दादा को इतना घुस्सा क्यू आता है
नागपूर
पालक मंत्री नितीन राऊत यांची कोरोना संदर्भातील आढावा बैठक सुरू
विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू
माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई –
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, राज्य टास्क फोर्सच्या हाती सोपवा
पहाटे आणखी 8 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू, गेल्या 5 दिवसांत ऑक्सिजन अभावी एकूण 83 मृत्यू.
कोरोनाच्या थैमानाला मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री जबाबदार.
ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू हे ‘मिड नाईट मर्डर’
गोवा सरकार पैसे कमविणे आणि उधळण्यात व्यस्त
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यात समन्वय नाही.
प्रशिक्षित ऑक्सिजन ट्रॅक्टर ड्रायव्हर जर कोल्हापूर मधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापूर हुन आणा.
पुणे
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर पण स्थिर
पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सुरुयेत सातव यांच्यावर उपचार
गेली 23 दिवस सातव व्हेंटिलेटरवर
मुबंईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ आशिम बॅनर्जी यांचे आज रुग्णालयात निधन झाले. ते कोविड पॉझिटिव्हव आले आले आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते: डॉ. आलोक रॉय, अध्यक्ष, मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, कोलकाता
कोस्ट गार्ड शिपने 3 मच्छिमारांचे प्राण वाचवले
केरळ किनाऱ्यावरील समुद्रात फिशिंग बोटवर अडकलेल्या 3 मच्छिमारांचे कोस्टगार्ड शिप विक्रमने 14 मे 21 रोजी मिडनाई येथे धडक मोहिमेत बचावले
व्यथित झालेल्या बोटीचे इंजिन अयशस्वी झाले होते
हवामानामुळे खराब होणारी नौका समुद्रात अडकली होती
चक्रीवादळाच्या विरोधातील तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत
सरकार आणि एनडीआरएफचे उच्च अधिकारीही या बैठकीत भाग घेतील
मालेगाव –
नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली बैठक
बैठकीत डॉक्टर, आरोग्य, महसूल आणि महापालिकेचे अधिकारी होते उपस्थित
भुसे यांनी या आजारावरील उपचारासाठी डोळे, कान, नाक, घसा तज्ज्ञांची नेमणूक करण्या बरोबरच जनजागृती करण्याची केली सूचना
संजय राऊत :
चक्रीवादळापेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे
या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत
लसीकरण संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरु आहेत
संजय राऊत ऑन फोन टॅपिंग –
देशांमध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाही हे सांगा आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील
हे आता राजकिय प्रकरण झाले आहे आम्ही त्याला गंभीरतेने नाही घेत
फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे
मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका फोन टायपिंग ही काही मोठी गोष्ट नाही आहे
पिंपरी-चिंचवड
– गणेश मंदिराच्या दान पेटीत जमा झालेल्या निधीतून दहा ऑक्सिजन बेड
– पिंपरी गावामधील मित्र सहकार्य तरुण मंडळाचा उपक्रम
– शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे
– अशात वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असून, सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र सहकार्य तरुण मंडळाकडून जिजामाता रुग्णालयास दहा ऑक्सिजन बेड देण्यात आले
औरंगाबाद –
कोरोना आणि लॉकडाऊनचा इंग्रजी शाळांना मोठा फटका
औरंगाबाद जिल्ह्यातील 40 टक्के इंग्रजी शाळा पडणार बंद
दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे उत्पन्न घटले
शिक्षकांच्या पगार, शाळा भाडे, वाहन भाडे थकल्यामुळे शाळा बंद करण्याची वेळ
हजारो शिक्षक आणि कर्मचारी होणार बेरोजगार
शाळा बंद करण्यासाठी अनेक संस्थाचालकांच्या शिक्षण विभागात चकरा सुरू
पुणे :
ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने घेतला पुढाकार
दररोज २०० रुग्णांना पुरेल एवढ्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्टची सीरममध्ये उभारणी
येथे तयार होणारा ऑक्सिजन गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार
केवळ १२ दिवसांमध्ये हा ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित केला असून प्रायमूव्ह इंजिनिअरिंग लिमिटेडचे या कामी महत्त्वाचे योगदान
नाशिक – तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी
मनपा आणि सिव्हीलच्या बेड मध्ये 250 ची वाढ
सध्या शहरात 100 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा
तर शहरात उभारले 14 कोव्हिडं सेंटर
बालकांसाठी विशेष टास्क फोर्स ची निर्मिती
वर्धा
# वर्ध्यातील श्री हॉस्पिटलमध्ये युवकांचा धुडगूस
# डॉक्टरवर मारायला स्टूल उचलत शिवीगाळ
# दवाखाण्याबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा दगडांनी फोडल्या
# डॉक्टर तोटे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल
#शुक्रवारी रात्री घातला धुडगूस , रात्री उशिरा गुन्हा दाखल
# सात ते आठ दिवसांपूर्वी एका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात आणलं होतं
# पण बेड उपलब्ध नसल्यानं महिलेला दुसऱ्या दवाखान्यात नेण्यास सांगितलं
# तिकडे त्या महिलेचा मृत्यू झाला
# तिच्यावर उपचार का केला नाही, अस म्हणत डॉक्टरांना शिवीगाळ करत धमकी दिली
# दवाखान्याबाहेर उभ्या कारच्या काचा फोडल्या
# याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला
# या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करत आरोपीना अटक केली आहे
# यावेळी डॉक्टर तोटे यांना सुद्धा धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली होती
– मुंबईच्या बीकेसी कोवीड जंबो लसीकरण केंद्रावर शुकशुकाट
– लसीकरण केंद्राबाहेर पुर्ण बॅरिकेटींग
– राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे
– तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
– याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे.
– मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये
– 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे.
– लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी कोरोनाकाळात ऑनलाइन परीक्षा दिल्या असून मागील चार दिवसात 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या काळात ऑनलाइन माध्यमातून या परीक्षा सुरळीत दिल्या.सुरुवातीला विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला परंतु आता विद्यार्थ्यांनी विना त्रुटी आणि मॉक टेस्ट देत या परीक्षा दिल्या आहेत.
सांगली –
परराज्यातून मिरज रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना, कोरोनाचे आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाणपत्र सक्तीचे
कोरोना चे प्रमाण देशात इतर राज्यात वाढत असलेने रेल्वे प्रशासन ने घेतला निर्णय
सद्या मिरज रेल्वे स्थानकात केवळ वैद्यकीय तपासणी केली जात आहे
सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस ,नागपूर एक्प्रेस,सह्याद्री एक्स्प्रेस ,रेल्वे जून अखेर बंद करण्यात आले आहेत
मात्र दिल्ली ,कर्नाटक, गोवा, सह पर राज्यतून येणाऱ्या एक्सप्रेस मधून प्रवासीवाहतूक सुरू आहे
प्रमाणपत्र शिवाय येणाऱ्या प्रवाशी ची तपासणी करून त्याना विलगिकर्नात पाठवले जाणार आहे
बारामती :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक
बैठकीसाठी अजित पवार यांचं आगमन
अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून घेणार कोरोना स्थितीची माहिती
मीरा भाईंदर –
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात 11 पैकी 9 लसीकरण केंद्र बंद
आज फक्त दोन ठिकाणी सुरु राहणार लसीकरण केंद्र
भाईंदर पश्चिम नाझरथ शाळेत आणि मीरा रोडच्या हैदरी चौक या दोन ठिकाणी 45 वयोगटातील वर असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे
सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दोन लसीकरण केंद्र सुरु राहणार आहे.
सोलापूर – राज्य शासनाच्या नियमावलीनुसार 1 जूनपर्यंत सोलापुरात कडक लॉकडाऊन
सकाळी सात ते अकरा मध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू
जिल्हा प्रशासनाने जाहीर केले पंधरा तारखेच्या सकाळी सात वाजेपर्यंत केले होते लॉकडाऊन जाहीर
अत्यावश्यक सेवा व कृषी विभागाची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार
होम डिलिव्हरी सकाळी सात ते रात्री 8 वाजेपर्यंत करता येणार
नागपूर –
45 वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण
राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना 15 मे रोजी कोव्हीशिल्डचा लसी चा पहिला व दूसरा डोज दिला जाईल.
राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिले आहे.
मनपाच्या सर्व ९६ केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर याना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे.
केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार आता कोव्हिशिल्ड चा दुसरा डोज १२ ते १६ आठवडयाच्या मधात नागरिकांना दयायचे आहे.
म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
पुणे :
– गेल्या 24 तासांत 1836 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– गेल्या 24 तासांत 3318 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 72 रुग्णांचा मृत्यू, 24 रूग्ण पुण्याबाहेरील
– 1381 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 456293
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 23692
– एकूण मृत्यू – 7311
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 424990
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 13908
नागपूर ब्रेकिंग –
नागपुरात दोन महिन्या नंतर आली कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारच्या खाली
पॉझिटिव्हीटी दर 14 टक्के वर
नागपूर जिल्ह्याला काहीसा दिलासा
24 तासात 1996 रुग्णांची नोंद झाली
तर 4965 जणांनी कोरोना वर मात केली
मात्र 70 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यू ची चिंता अजूनही कायम
मुंबई :
२४ तासात बाधीत रुग्ण १६५७
एकूण बाधीत रुग्ण : ६८५७०५
२४ तासात बरे झालेले रुग्ण : २५७२
एकूण बरे झालेले रुग्ण : ६३१९८२
२४ तासात मृत रुग्णांची संख्या : ६२
एकूण मृत्यू : १४१३८
मुंबईतील दुप्पटीचा दर : १९९ दिवस
राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 53 हजार 249 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.68 वर
गेल्या 24 तासांत 39,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत 695 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर