Maharashtra Coronavirus LIVE Update : आता घरीच चाचणी करा, आयसीएमआरची कोरोना RAT चाचणीला परवानगी

| Updated on: May 19, 2021 | 10:55 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : आता घरीच चाचणी करा, आयसीएमआरची कोरोना RAT चाचणीला परवानगी
MAHARASHTRA Corona
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असून, राज्यात 1 जूनपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 May 2021 10:53 PM (IST)

    आता घरीच चाचणी करा, आयसीएमआरची कोरोना RAT चाचणीला परवानगी

    आयसीएमआरचं घरीच कोरोना RAT चाचणीला परवानगी, कोरोनाची लक्षण आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली लोकं ही चाचणी घरीच करू शकतात, Mylab discovery pvt Ltd Pune ला कीट पुरवण्यास परवानगी, कंपनीचा मोबाईल डाऊनलोड करून त्यानुसार घरीच किटच्या माध्यामातून आता टेस्ट करू शकणार, नाकातून स्वँबचा नमुना तुम्ही घेवूनही टेस्ट करू शकता, घरच्या घरी अँटीजन टेस्ट कशी करायची यासाठी कंपनीकडून देण्यात आलेली मार्गदर्शक व्हिडीओ

  • 19 May 2021 10:12 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 449 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 449 रुग्ण, 08 मृत्यू तर 584 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 103, तुळजापूर 63,उमरगा 52, लोहारा 34, कळंब 52, वाशी 69, भूम 47 व परंडा 30 रुग्ण

    1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
    2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
    3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
    4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
    5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
    6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
    7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
    8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
    9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
    10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
    11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
    12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
    13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
    14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
    15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
    16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
    17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
    18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
    19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू-

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5008 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 67 हजार 504 नमुने तपासले त्यापैकी 50 हजार 352 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.82 टक्के

    44 हजार 204 रुग्ण बरे 87.78 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 1140 तर 2.26 टक्के मृत्यू दर


  • 19 May 2021 09:08 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1661 नवे कोरोनाबाधित

    नाशिक जिल्हा कोरोना अपडेट –

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2084

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1661

    नाशिक मनपा- 605
    नाशिक ग्रामीण- 1049
    मालेगाव मनपा- 07
    जिल्हा बाह्य- 00

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4202

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -40
    नाशिक मनपा- 18
    मालेगाव मनपा- 00
    नाशिक ग्रामीण- 22
    जिल्हा बाह्य- 00

  • 19 May 2021 08:09 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 34 हजार 31 नवे कोरोनाबाधित, 51 हजार 457 रुग्ण बरे, 594 जणांचा मृत्यू

    राज्यात आज 34 हजार 31 नवे रुग्ण
    राज्यात आज 51 हजार 457 रुग्णांनी केली कोरोनावर मात
    राज्यात आज 594 रुग्णांचा मृत्यू

  • 19 May 2021 07:54 PM (IST)

    2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात कमांडोंचे नेतृत्व करणारे NSG चे माजी प्रमुख जे के दत्त यांचं कोरोनाने निधन

    2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कमांडोंचे नेतृत्व करणारे एनएसजीचे माजी प्रमुख जे के दत्त यांचं कोरोनाने निधन, पीटीआयकडून सूत्रांच्या हवाल्याने वृत्त

  • 19 May 2021 07:39 PM (IST)

    डॉक्टरांच्या सुरक्षेवरून हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं

    मुंबई : हायकोर्टाने 13 मे रोजी राज्य सरकारला एक प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं ज्यामध्ये राज्यात किती डॉक्टरांवर हल्ले झाले आणि यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागवण्यात अली होती. राज्य सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले ज्यामध्ये 436 गुन्हे दाखल असायची माहिती देण्यात आली. ही आकडेवारी पाहता हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत सरकार या बाबतीत गंभीर नाही का? असा सवाल उपस्थित केला. उपचारासाठी डॉक्टरांनी सर्वस्व अर्पण करावं, अशी आपण अपेक्षा करतो. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण इतके ढिसाळ का? असं हायकोर्ट म्हणाले आहे.  हायकोर्टाने राज्य सरकारला आणखी एक प्रतिज्ञापत्र पुढच्या आठवड्यात सादर करायला सांगितलंय ज्यात या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती असेल. मुख्य न्यायाधीश दिपाणकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

  • 19 May 2021 07:35 PM (IST)

    वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी, दिवसभरात 82 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी

    मागच्या 24 तासात फक्त 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. तर आज दिवसभरात 05 जणांचा मृत्यू . 598 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 63,202

    कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या – 53,944

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या – 1281

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या – 7977

  • 19 May 2021 07:33 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 1164 नवे कोरोनाबाधित, 48 रुग्णांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट :

    – दिवसभरात 1164 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    – दिवसभरात 2407 रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू, त्यामधील 24 रूग्ण पुण्याबाहेरील.

    – 1348 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 462172

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15232

    – एकूण मृत्यू – 7843

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 439097

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10806

  • 19 May 2021 07:29 PM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात नागपुरात सर्वाधिक कोरोना चाचण्या

    नागपूर :

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात नागपुरात सर्वाधिक कोरोना चाचण्या

    एकट्या एप्रिल महिन्यात 4 लाख 26 हजार 493 चाचण्या

    तर 1 मे ते 16 मे पर्यंत 2 लाख 9हजार 390 चाचण्या करण्यात आल्या

    नागपुरात आतापर्यंत 18 लाख 89 हजार 694 चाचण्या महापालिका आणि खाजगी प्रयोग शाळेत करण्यात आल्या

    कोरोनाची साखळी जर खंडित करायची असेल तर जास्तीत- जास्त नागरिकांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या मताला अनुसरुन करण्यात आल्या कोरोना चाचण्या

  • 19 May 2021 06:33 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू, 2692 नवे कोरोनाबाधित

    सातारा कोरोना अपडेट :

    सातारा जिल्ह्यात आज 2881 कोरोनामुक्त, तर जिल्हयात 2692 जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

    जिल्हयात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात सध्या 19,185 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    सातारा जिल्ह्यात एकूण 3294 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,18,818 रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्हयात आतापर्यंत एकूण 1,41,312 रुग्ण कोरोनाबाधित

  • 19 May 2021 06:23 PM (IST)

    राज्यात म्युकर मायकोसिसचे 1500 रुग्ण : राजेश टोपे

    राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, रुग्णवाढीचा दर 0.5 टक्क्यांवर, देशभरात रुग्णवाढमध्ये महाराष्ट्र 34 व्या क्रमाकांवर, राज्याचा रिकव्हरी रेट हा 90.60 टक्के, राज्यात दररोज अडीच लाख चाचण्या होतात. राज्यात म्यकोर मायकोसिसचे 1500 रुग्ण, केंद्र सरकारने या आजारावरील इंजेक्शनचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच म्युकोर मायकोसिसबाधित रुग्णांच्या उपचाराचा आणि औषधाचा सर्व खर्च महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत राज्य सरकार करणार, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

  • 19 May 2021 06:13 PM (IST)

    कोरोना चाचणीसाठी थुंकीचे नमुने, ICMR ची मान्यता, नागपूरच्या ‘निरी’चे संशोधन

    आता कोरोना चाचणीसाठी नाका तोंडातुन स्वब देण्याची गरज पाडणार नाही. कारण नागपुरातील निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं नवीन पर्याय शोधून काढलाय. थुंकीचे नमुने आता कोरोना चाचणीसाठी वापरता येणार आहे. आयसीएमआरनं यासाठी मान्यता दिलीय. या पद्धतीमुळं वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढल्या. त्यामुळं अहवाल यायला तीन ते चार दिवस लागते. त्यामुळं उपचार घ्यायला उशीर व्हायचा होतो. उपचाराअभवी काहींचा जीवही गेला. टेस्टिंग लॅब वर आलेला ताण वेगळाच. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. सलाईन मध्ये वापरलं जाणारं ग्लुकोज तोंडात घेऊन त्यांची गुळल्या करून ती थुंकी एका बॉटल मध्ये घ्यायची. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जाणार आहे.
  • 19 May 2021 05:48 PM (IST)

    नागपुरात आज 3778 जणांनी केली कोरोना वर मात, 1377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात आज 3778 जणांनी केली कोरोना वर मात

    1377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 36 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 466780

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 436595

    एकूण मृत्यू संख्या – 8657

  • 19 May 2021 05:24 PM (IST)

    वाशिम जिलह्यात कोरोनाचा उद्रेक 275 नवे रुग्ण आढळले

    जिल्ह्यात पुनः कोरोनाचा उद्रेक …

    जिल्ह्यात आज 02 रुग्णांचा मृत्यू …

    नवे आढळले 275 रुग्ण…

    जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत पहिल्यादा कोरोना रुग्ण संख्येत घट..

    तर 472 जणांना देण्यात आला डिस्चार्ज…

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 19 दिवसात 81 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 9511 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 9170 कोरोनामुक्त झालेत…

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 36871

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 4169

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 32324

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 377

  • 19 May 2021 05:04 PM (IST)

    कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे बोगस महिला डॉक्टर वर कारवाई

    कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे बोगस महिला डॉक्टर वर कारवाई
    आरोग्य विभागासह कराड पोलिसांची कारवाई

    पंत क्लिनिक नावाच्या दवाखान्यात दोन वर्षापासून सुरु होते रुग्णांवर उपचार
    उपचारांच्या नावाखाली हजारो रुपये घेत होते रुग्णांकडून

    बोगस महिला डॉक्टर ला कराड पोलिसांनी घेतले ताब्यात
    पोलिसांकडुन पुढील चौकशी सुरु

  • 19 May 2021 03:31 PM (IST)

    मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरवर तीन पुरवठादारांना रस, स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार

    मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला तीन पुरवठादारांनी रस दाखवला आहे

    हे पुरवठादार स्फुतनिक लसींचा पुरवठा करू शकणार आहेत

    मात्र, या पुरवठादारांच्या कागदपत्रांची पूर्तता होणे अजून बाकी आहे

    मुंबई महापालिकेनं कालच हे टेंडर भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढवलीय

    येत्या सात दिवसांत केंद्राने जर इतर लसींच्या वापराला परवानगी दिली तर त्या कंपन्याही हे टेंडर भरु शकतील

  • 19 May 2021 03:17 PM (IST)

    राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 10 जून पासून घेण्यात येणार, मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

    मुंबई : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.

    राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

    या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 19 May 2021 03:16 PM (IST)

    ठाण्यात लोकांच्या जीवाशी खेळ, ठाणे महापालिकेचा बोगस RT PCR निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक

    ठाण्यात लोकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. कोरोना चाचणी न करताच ठाणे महापालिकेचा बोगस RT PCR निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखा ५ ने अटक केली, १२५० रुपयांच्या बदल्यात आधारकार्ड घेऊन ठाणे महापालिका वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना चाचणी न करताच देत होते खोटे निगेटिव्ह रिपोर्ट, पालिका कोविड रुग्णालयात कंत्राट तत्वावर वार्ड बॉय म्हणुन काम करणाऱ्या अफसर तेजपाल मंगवाना आणि संकपाल भास्कर धवने या दोघांना केली अटक, दोन्ही आरोपींना न्यायालयाने सुनावली २७ मे पर्यंत पोलीस कोठडी, या प्रकरणात मोठी टोळी आणि महापालिका अधिकारी असल्याची शक्यता, आत्तापर्यंत शेकडो लोकांना दिले गेलेत खोटे निगेटिव्ह रिपोर्ट, ठाणे गुन्हे शाखा ५ करीत आहे अधिक तपास

  • 19 May 2021 01:40 PM (IST)

    लॉकडाऊननंतर ठरणार मराठा आरक्षणावरील लढ्याची दिशा

    कोल्हापूर

    लॉकडाऊननंतर ठरणार मराठा आरक्षणावरील लढ्याची दिशा

    राज्य सरकारच्या मानेवर बसून आरक्षण घेण्यास सज्ज रहा

    कोल्हापूरातुन पुकारले जाणार आंदोलन

    मराठा आरक्षण आपल्या हक्काचे, आम्ही भीक मागत नाही

    रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही

    मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या

    भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन

  • 19 May 2021 11:51 AM (IST)

    सोलापुरात आज केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांचे लसीकरण

    सोलापूर –

    शहरात आज केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांचे लसीकरण

    तर 24 फेब्रुवारी अथवा त्यापूर्वी पहिला डोस घेतलेल्या पात्र नागरिकांना देखील मिळणार लस

    शहरातील शेळगी नागरी आरोग्य केंद्र वगळता उर्वरित केंद्रात होणार लसीकरण

    लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये.

    मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या सूचना

  • 19 May 2021 11:49 AM (IST)

    खासदार गिरीश बापट यांच्याकडून रिक्षा चालकांना आर्थिक मदत, 300 रिक्षा चालकांना प्रत्येकी 1500 रुपयांची मदत

    पुणे –

    – खासदार गिरीश बापट यांच्याकडून रिक्षा चालकांना आर्थिक मदत,

    – साधारण 300 रिक्षा चालकांना प्रत्येकी 1500 रुपयांची मदत,

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ,

    – सरकारकडून अद्यापपर्यंत एकही रिक्षा चालकांना मदत मिळाली नसल्याचा बापटांचा आरोप,

    – सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या सकाळी काळी पट्टी लावून आरटीओ कार्यालयात भाजप आंदोलन करणार

  • 19 May 2021 11:49 AM (IST)

    धारसंग  गावातल्या लोकांना लसीचे वावडे, अफवेमुळे गावकरी घेत नाहीत लस

    धारसंग  गावातल्या लोकांना लसीचे वावडे, अफवेमुळे गावकरी घेत नाहीत लस

    गावाला जोडणारा रस्ताच नसल्यामुळे वर्षानुवर्ष गाव लॉकडाउन मध्येच

    आम्ही गावातून बाहेर जात नाही आणि गावात कोणी येत नाही त्यामुळे आम्हाला काही होत नाही अशी गावकर्‍यांची धारणा

    आधी म्हणतात हो, गावात लसीकरणासाठी टीम आल्यानंतर कोणी घराच्या बाहेर येत नाही, तर कुणी घेतो शेतीचा सहारा

    लोकांना विश्वास बसावा यासाठी फ्रंटलाईनच्या बारा जणांनी घेतली लस

    मात्र तरीही गावकऱ्यांची लसीकरणाकडे पाठ

    आरोग्य विभागाचे कर्मचारीही झाले गावकऱ्यांसमोर हतबल

  • 19 May 2021 11:47 AM (IST)

    उस्मानाबादेत लसीकरणसाठी नंबर लावण्यासाठी नागरिकांच्या रात्री आणि पहाटे रांग

    उस्मानाबाद – लसीकरणसाठी नंबर लावण्यासाठी नागरिकांच्या रात्री आणि पहाटे रांग

    आज 9 केंद्रावर कोवक्सिन लसीचे 4 हजार 450 डोस

    प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने नागरिकांनी रात्री 2 वाजेपासून व पहाटे नंबर लावण्यासाठी गर्दी

    45 वर्षाच्या पुढील व फ्रंट लाईन वर्कर यांना दिला जात आहे कोरोनाचा दुसरा डोस

  • 19 May 2021 11:01 AM (IST)

    नाशकात रुग्णवाहिकेत कोरोना बाधिताचा मृत्यू, चालकला अंत्यसंस्कार करण्यास सांगून नातेवाईक फरार

    नाशिक –

    कोरोना बाधित रुग्णाला रुग्णवाहिकेत सोडून नातेवाईक फरार

    जिल्हा रुग्णालय परिसरातील धक्कादायक घटना

    रुग्णाचा रुग्णवाहिकेत मधेच मृत्यू

    रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिका चालकलाच अंत्यसंस्कार करण्यास सांगून नातेवाईक फरार

  • 19 May 2021 10:26 AM (IST)

    औरंगाबादेत पुन्हा लसींची टंचाई

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत पुन्हा लसींची टंचाई

    300 लसीकरण केंद्राऐवजी शहरात फक्त 3 लसीकरण केंद्रांवरच लसीकरण सुरू..

    महानगरपालिकेकडे फक्त 410 डोस शिल्लक..

    औरंगाबादकरांची पुन्हा वाढली चिंता..

    लसींचा साठा तात्काळ उपलब्ध करावा अशी औरंगाबादकरांची मागणी

  • 19 May 2021 09:20 AM (IST)

    सोलापुरातील टेंभुर्णीच्या महिलेचा म्युकरमायकोसिसने मृत्यू 

    पंढरपूर –

    टेंभुर्णीतील महिलेचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

    म्युकरमायकोसिस या आजाराने सोलापूर जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे

    हिराबाई अजिनाथ कदम या महिलेचा पुणे येथे उपचार घेत असताना झाला मृत्यू

  • 19 May 2021 09:18 AM (IST)

    पुणे शहरातील खाजगी रुग्णालये आता पालिकेच्या रडारवर

    पुणे –

    – शहरातील खाजगी रुग्णालये आता पालिकेच्या रडारवर,

    – दिवसातून तीन वेळा डॅशबोर्डवर अचूक माहिती भरण्याच्या पालिकेच्या खाजगी रुग्णालयांना सूचना,

    – यासंदर्भात खाजगी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे,

    – यामध्ये हलगर्जीपणा अथवा चुकीच्या माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा,

    – कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी पालिकेने सुरू केलेल्या उपाययोजने संदर्भात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पालिकेला जाग,

    – पालिकेने कंट्रोल रूममध्ये सुधारणा करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांनादेखील नवे आदेश दिले आहेत.

  • 19 May 2021 09:17 AM (IST)

    चढ्या दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करणाऱ्या तरुणाला शिक्रापूर पोलिसांनी केली अटक

    पुणे

    – चढ्या दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करणाऱ्या तरुणाला शिक्रापूर पोलिसांनी केली अटक

    – अमित पवार असं ह्या तरुणाचं नाव असून तो मूळ बीडचा असुन गेल्या काही दिवसापासून शिक्रापूर परिसरात कामानिमित्त राहत होता

    – अमित पवार हा बजरंगवाडी परिसरात दोन रेमडीसीव्हीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसानं मिळाली त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे

    – त्याच्या कडून 4 रेमडीसीव्हीर इंजेक्शन शिक्रापूर पोलीसांनी केली जप्त

  • 19 May 2021 09:15 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये आज कोवॅक्सिनचे 100 नोंदणीकृत डोस देण्यात येणार

    – मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये आज कोवॅक्सिनचे 100 नोंदणीकृत डोस देण्यात येणार

    – 92 सेंटरची यादी फलकावर लावण्यात आलीये

    – आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचाही परिणाम दिसून येतोय

    – छत्र्या उघडून लोक वॅक्सिन्शनसाठी येत आहेत

    – कोविशिल्डसाठी लोक विचारपूस करत आहेत

  • 19 May 2021 09:14 AM (IST)

    सोलापूर लसीकरण केंद्र उघडण्याआधीच वृद्धांची लसीकरणासाठी हजेरी

    सोलापूर – लसीकरण केंद्र उघडण्याआधीच वृद्धांची लसीकरणासाठी हजेरी

    मात्र परवापासून सुरू आहे शहरातील लसीकरण मोहीम टप्प

    आजही लसीकरण मोहीम लसीअभावी ठप्प

    शहराबरोबरच ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम ठप्प

  • 19 May 2021 09:14 AM (IST)

    रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सोशल मीडियात राजकीय पक्षाच्या नेत्यांची खिल्ली

    पुणे –

    देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सोशल मीडियात राजकीय पक्षाच्या नेत्यांची खिल्ली,

    राजकीय नेत्यांची सोशल मिडीयात बदनामी केल्याप्रकरणी पुण्याता आतापर्यंत सायबर पोलीस. ठाण्यात 150 जणांविरुद्ध गुन्हे दाखल,

    आपत्कालीन परिस्थितीत समाजात खोटी माहिती न पसरवण्याचं आवाहन,

    अन्यथा माहिती तंत्रज्ञान भा.दं.वि.कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा पुणे पोलीसांचा इशारा,

    सायबर पोलीसांत 130 तर,विश्नामबाग, आणि विमानतळ पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल,

    बदनामीकारक छायाचित्रे आणि फोटो मॉर्फ करून सोशल मिडीयावर प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंतची ही कारवाई

  • 19 May 2021 09:10 AM (IST)

    म्युकर मायकोसिसचे औषधही आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येणार,

    पुणे –

    म्युकर मायकोसिसचे औषधही आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येणार

    जिल्हा प्रशासनानं औषधाचं वितरण सुरळीत करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची केली नियुक्ती,

    अँम्फोटीसीरीन बी हे औषध आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली वितरीत होणार,

    या आधी रेमडेसीवीर, टॉसिलीझूमँब, हे औषध जिल्हाधिकारी कार्यालयानं आणलं होतं नियंत्रणाखाली,

    म्युकर मायकोसिसच्या आजाराचा काळाबाजार रोखता येणार

  • 19 May 2021 09:10 AM (IST)

    माहिती लपवणारी शहरातील खासगी रुग्णालयं पुणे महापालिकेच्या रडारवर

    पुणे –

    माहिती लपवणारी शहरातील खासगी रुग्णालय महापालिकेच्या रडारवर

    दिवसातून तीन वेळा डॅशबोर्डवर अचूक माहिती भरण्यासाठीच्या बजावल्या नोटीस

    रुग्णालयात नेमण्यात आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना रुग्णालयांकडून वेळेवर आणि पुरेशी माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी

    यात हलगर्जीपणा अथवा चुकीच्या माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा देण्यात आला इशारा

    महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील खासगी रुग्णालयांना बजावल्या नोटिसा

  • 19 May 2021 09:09 AM (IST)

    सोलापूर ग्रामीणमध्ये विनाकरण फिरणाऱ्याला पाचशे रुपये दंड

    सोलापूर –

    ग्रामीणमध्ये विनाकरण फिरणाऱ्याला पाचशे रुपये दंड

    दंडा बरोबरच वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत जप्त करण्याचे आदेश

    जिल्ह्यात संसर्ग वाढत असल्याने प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर कारवाई करण्याचे आदेश

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

  • 19 May 2021 09:08 AM (IST)

    नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

    नाशिक – नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी

    कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

    रुग्णालयांमध्ये 3500 बेड शिल्लक

    कडक लॉक डाऊन आणि फिजिकल डिस्टनसिंग चा परिणाम

    24 एप्रिल 28 हजारांवर असलेली रुग्णसंख्या, आज मात्र अवघ्या साडे सात हजारांवर

  • 19 May 2021 09:07 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसीत हलक्या सरी कोसळायला सुरुवात

    – मुंबईच्या बीकेसीत हलक्या सरी कोसळायला सुरुवात

    – आकाशात काळे ढग आले दाटून

    – दोन दिवसानंतरही ताऊक्ते चक्रीवादळाचे आफ्टर इफेक्ट्स जाणवायला सुरुवात

    – आजपासून लसीकरणालाही सुरवात अशात जोरदार पाऊस पडू लागला तर लसीकरण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह, जर सुरु राहीला तर अडचणीत वाढ होणार

  • 19 May 2021 09:02 AM (IST)

    नागपुरात 45 वर्षावरील नागरिकांचे आज लसीकरण

    नागपूर –

    45 वर्षावरील नागरिकांचे आज लसीकरण

    राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना १९ मे रोजी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दूसरा डोज दिला जाईल.

    राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिले आहे.

    केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार आता कोव्हिशिल्ड चा दुसरा डोज १२ ते १६ आठवडयाच्या मधात नागरिकांना दयायचे आहे.

    नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्या पुर्वी घेतला त्यांना दूसरा डोज़ दिला जाईल.

    मनपाच्या सर्व केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे.

  • 19 May 2021 08:59 AM (IST)

    सोलापूर मार्गे तामिळनाडूला रवाना झाली ऑक्सिजन रेल्वे

    सोलापूर – सोलापूर मार्गे तामिळनाडूला रवाना झाली ऑक्सिजन रेल्वे

    लोणीहुन आलेली ऑक्सिजन एक्सप्रेस तामिळनाडूच्या थीरुवल्लूरूला रवाना

    सोलापूर स्थानकात न थांबता थेट चेन्नईच्या दिशेने रवाना

    एक्सप्रेस मधून दोन ऑक्सिजनने भरलेले टँकर आणि चार टँकर रिकामे

    रेल्वेचा  परतीचा मार्ग असाच असण्याची शक्यता
    मात्र प्रत्यक्ष ऑक्सिजन एक्सप्रेसचा सोलापूरला काहीच फायदा नाही

  • 19 May 2021 08:16 AM (IST)

    सोलापुरातील अलकुंटे चौकात दोन ज्येष्ठ महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    सोलापूर –

    अलकुंटे चौकात दोन ज्येष्ठ महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    अलकुंटे चौकातील करण म्हेत्रे यांच्या अंत्यसंस्काराला झाली होती गर्दी

    खबरदारी म्हणून संपूर्ण अलकुंटे चौक केला आहे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

    आतापर्यंत अलकुंटे चौकातील 475 जणांची कोरोना चाचणी

    परिसरात नागरिकांना ये जा करण्यासाठी घालण्यात आली आहे बंदी

    आतापर्यंत परिसरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

  • 19 May 2021 07:36 AM (IST)

    लॅाकडाऊनमुळे गरीबांच्या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या

    – लॅाकडाऊनमुळे गरीबांच्या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या!

    – शुण्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचं कुपोषण गंभीर

    – नागपुर जिल्ह्यात ४९४ तीव्र आणि मध्यम कुपोषित बालके

    – जिल्ह्यात ९९ तीव्र कुपोषित बालके, आकडेवारीनं वाढवली चिंता

    – महिला व बालकल्याने विभागाने मार्च २०२१ मध्ये नोंदवली आकडेवारी

    – कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्याने कुपोषणाची समस्या

  • 19 May 2021 07:35 AM (IST)

    पंतप्रधान मोदी सोलापूरसह 17 जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

    सोलापूर –

    पंतप्रधान मोदी घेणार सोलापूरसह 17  जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा

    कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या , प्रशासनाकडून करण्यात येणारे उपाय योजना, या पार्श्‍वभूमीवर घेणार आढावा

    देशात दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांची साधणार संवाद

  • 19 May 2021 07:33 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन दिवसांनंतर कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध

    पिंपरी चिंचवड

    – पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन दिवसांनंतर कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध

    -45 वर्षांपुढील 28 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस 16 केंद्रांवर देण्यात येणार आहे. एका केंद्रांवर 150 जणांना डोस दिले जाणार आहे

    – तर, ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस 45 वर्षांपुढील नागरिकांना 50 केंद्रावर देण्यात येणार आहे

    -शासनाकडून महापालिकेला कोविशिल्डचे 5 हजार आणि कोव्हॅक्सिनचे 2 हजार डोस उपलब्ध झाले आहेत

  • 19 May 2021 07:32 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात आज 605 नवीन रुग्णांची नोंद, 2093 जणांना डिस्चार्ज

    पिंपरी-चिंचवड

    – शहरात आज 605 नवीन रुग्णांची नोंद, 2093 जणांना डिस्चार्ज तर 57 जणांचा मृत्यू

    -शहरातील 2 लाख 43 हजार 185 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण तर 2 लाख 24 हजार 419 कोरोना मुक्त

    -सध्या 15 हजार 33 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 333 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 700 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

  • 19 May 2021 07:31 AM (IST)

    चाचणी आपल्या दारी, नागपुरातील सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम

    नागपूर –

    चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम

    नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपूरा झोन क्र.७ व्दारे आज पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करुन तपासण्या करण्यात आल्या.

    नेहरु पुतळा ते मस्कासाथ चौक इतवारी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या प्रत्येक दुकानात “चाचणी आपल्या व्दारी” या धर्तीवर कोरोना चाचणी करण्यात आली.

    यामध्ये प्रत्येक दुकानदाराने सहकार्य केले.

    या सर्व दुकानातील दुकान मालक व येथे कार्यरत सर्व कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली

    तसेच रस्त्यावर विना मास्क वावरत असणा-या नागरिकांचीसुध्दा मौक्यावरच चाचणी करण्यात आली.

    या कार्यवाहीमध्ये एकूण २१७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या.

  • 19 May 2021 07:27 AM (IST)

    नागपुरात सकारात्मक चित्र, म्युकरमायकोसिसचे रुग्ण बरे होत आहेत

    – सकारात्मक चित्र, म्युकरमायकोसीसचे रुग्ण बरे होत आहेत

    – नागपूरच्या मेडीकलमध्ये ४९ रुग्णांपैकी १३ रुग्णांवर शस्रक्रिया

    – शासकीय दंत महाविद्यालयात रोज एक ते दोन शस्रक्रिया

    – कोरोनानंतर नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसीचा वाढता धोका

    – नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे २८४ तर पूर्व विदर्भात ३४० रुग्ण

  • 19 May 2021 07:25 AM (IST)

    कोल्हापुरात म्युकरमायकोसिससाठी सीपीआर रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु

    कोल्हापूर

    म्युकरमायकोसिससाठी सीपीआर रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु

    8 बेडचा नवा वार्ड कार्यान्वित

    म्युकरमायकोसिसचे सध्या जिल्ह्यात पाच रुग्ण

    यातील तिघांवर सुरू आहेत सिपीआर मध्ये उपचार

    रुग्ण संख्या वाढीची शक्यता लक्षात घेत म्युकरमायकोसिससाठी वॉर्ड केला तयार

  • 19 May 2021 07:24 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात प्लाझ्मा दान करण्यात तरुणाई आघाडीवर

    पिंपरी चिंचवड

    – शहरात प्लाझ्मा दान करण्यात तरुणाई आघाडीवर

    -वायसीएम रक्तपेढीत आतापर्यंत 1213 दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यापैकी 20 ते 30 या वयोगटातील 414 दात्यांनी प्लाझ्मा दान केले.

    -तर 30 ते 40 या वयोगटातील 500 दात्यांनी रक्तदान केले. तसेच 40 पुढील वयोगटातील जवळपास 250 जणांनी प्लाझ्मा दान केले आहे

    -त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यात तरुणाई आघाडीवर असल्याची स्थिती आहे.

  • 19 May 2021 07:24 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी

    – नागपूर जिल्हयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी

    – मेयो आणि मोडीकलमध्ये लहान मुलांसाठी १०० बेडच्या ‘आयसीयू’चा प्रस्ताव

    – जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळणं गरजेचं

    – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका

  • 19 May 2021 07:23 AM (IST)

    कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतकाच्या खिशातील पैसे, दागिने,मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक

    नागपूर –

    कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतकाच्या खिशातील पैसे, दागिने,मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक

    नागपूर च्या तहसील पोलिसांनी केली अटक

    पोलिसांनी त्यांच्या जवळून १ लाख १९ रुपये किमतीचे मोबाईल आणि मौल्यवान साहित्य देखील केले जप्त

    मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने व्यक्त केली जात आहे हळहळ।..

  • 19 May 2021 07:21 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमाइकोसिसचा पहिला बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमाइकोसिसचा पहिला बळी

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातला पहिला बळी

    जिल्ह्यात वाढत आहे म्युकरमाइकोसिसचा धोका

    एकूण रुग्ण संख्या 50 तर 26 रुग्णाची झाली शस्त्रक्रिया

    इंजेक्शन-औषधीचा जिल्ह्यात तुटवडा

  • 19 May 2021 07:20 AM (IST)

    पुण्यातील लसीकरणाबाबत महापालिकेची नवी नियमावली

    पुणे ब्रेक

    पुण्यातील लसीकरणाबाबत महापालिकेची नवी नियमावली,

    लसीकरण केंद्रावर खाजगी व्यक्तींनी बोर्ड अथवा फ्लेक्स लावल्यास सहाय्यक आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

    शहरातील अनेक केंद्रावर राजकीय हस्तक्षेप वाढल्यानं लसीकरणात अडथळे,

    लसीकरणात अडथळा आणणऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश,

    महापालिकेचेच कर्मचारी आता लसीकरण केंद्रावर देणार टोकन,

    ऑनलाईन लसीकरणाची नोंदणी केलेल्या आणि ऑनस्पॉट नोंदणी केलेल्या नागरिकांच्या असणार स्वतंत्र लाईन,

    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश

  • 19 May 2021 07:16 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयाबाहेर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल

    औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयाबाहेर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल सुरु असल्याचं चित्र

    घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात

    मात्र या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना इमारतीबाहेर असलेल्या उघड्या जागेत मुक्काम करावा लागत आहे

    पुरुषांबरोबर अगदी महिला सुद्धा मोकळ्या जागेत दहा दहा दिवस मुक्काम करत आहेत.

  • 19 May 2021 07:12 AM (IST)

    पुण्यात लसीकरण केंद्र माननीयांनी ताब्यात घेऊन मर्जीतील लोकांनाच लस देण्याचा प्रकार

    पुणे

    लसीकरण केंद्र माननीयांनी ताब्यात घेऊन मर्जीतील लोकांनाच लस देण्याचा प्रकार

    यावर आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लसीकरण केंद्रांसाठी खास नियमावली केली तयार

    तसेच लसीकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

    काय आहेत आयुक्तांचे आदेश

    – ज्या नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे व जे स्वतःला लस घेण्यासाठी आले आहेत. त्यांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा

    – लसीकरण सत्रात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनाच प्रवेश करता येईल

    – ऑनलाइन नोंदणी व ऑनस्पॉट लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांची स्वतंत्र रांग करावी

    – ऑनस्पॉट आलेल्या नागरिकांना महापालिकेच्या नागरिकांनीच टोकन द्यावे

    – लसीकरण केंद्रांत गर्दी होऊ नये याचे नियोजन करावे.

    – लसीकरण केंद्रावर खासगी व्यक्तींचे बोर्ड फ्लेकस लावल्यास त्यांच्यावर सहाय्यक आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा.

    – लसीकरण केंद्राबाहेर लस नेल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल

    – लसीकरणात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा.

    – लस उपलब्धतेबाबत नगरसेवकांनी मेसेजद्वारे नियमीत माहिती द्यावी

  • 19 May 2021 07:11 AM (IST)

    पुण्यात आज दोन दिवसानंतर लसीकरण सुरु होणार

    पुणे :

    पुण्यात आज दोन दिवसानंतर लसीकरण होणार

    शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचे ७,५०० डोस उपलब्ध

    त्यानुसार आजमहापालिकेची दवाखाने, प्रसूतिगृह, ओपीडी अशा ७३ ठिकाणी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोव्हीशील्डचा दुसरा डोस दिला जाणार

    ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच दुसरा डोस मिळणार

  • 19 May 2021 07:10 AM (IST)

    खासगी रुग्णालयामार्फत सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण सुरू करा पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली मागणी

    पुणे

    खासगी रुग्णालयामार्फत सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण सुरू करा पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली मागणी

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण २० हजार गृहनिर्माण सोसायट्या

    त्यापैकी १२ हजार पुणे शहरात तर 8 हजार पिंपरी चिंचवड शहरात

    येथील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    जहांगीर रुग्णालयाने सोसायटीत जाऊन लसीकरण सशुल्क सेवा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांची माहिती

  • 19 May 2021 07:03 AM (IST)

    पुणे जिल्ह्याला अँटिजेन किटचा पुरवठा सुरु

    पुणे :

    पुणे जिल्ह्याला अँटिजेन किटचा पुरवठा सुरु

    जिल्ह्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ॲंटिजन किटचा होता तुटवडा

    हाफकिनला पुणे जिल्हा प्रशासनाने 2 लाख 38 हजार ॲंटिजन किटची दिली ऑर्डर

    यापैकी 10 हजार 500 अँटिजेंन किट उपलब्ध झाले

    आता हाॅटस्पाॅट आणि रेड अलर्ट गावांमध्ये पुन्हा एकदा कोरोना चाचण्या सुरू होणार

  • 19 May 2021 07:00 AM (IST)

    लसीचा पुरवठा झाल्यामुळे पुण्यात 73 लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण पार पडणार

    पुणे –

    – लसीचा पुरवठा झाल्यामुळे 73 लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण पार पडणार,

    – सरकारकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचे ७,५०० डोस देण्यात आले आहेत.

    – त्यानुसार महापालिकेची दवाखाने, प्रसूतिगृह, ओपीडी अशा ७३ ठिकाणी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोव्हीशील्डचा दुसरा डोस दिला जाणार,

    – ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच दुसरा डोस मिळणार आहे,

    – ७३ केंद्राना प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत.

    – ही लस आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन कर्मचारी व ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी उपलब्ध असेल.

  • 19 May 2021 06:59 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 1021 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2892 रुग्णांना डिस्चार्ज

    ⦁ पुण्यात गेल्या 24 तासांत 1021 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2892 रुग्णांना डिस्चार्ज

    ⦁ करोनाबाधित ६८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू, 22 रूग्ण पुण्याबाहेरील.

    ⦁ 1364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    ⦁ पुण्यात आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 4,36,690.

    ⦁ पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या -16,523

    ⦁ एकूण मृत्यू – 9258

    ⦁ आज केलेल्या एकूण चाचण्या – 7895

  • 19 May 2021 06:56 AM (IST)

    सांगली कोरोना अपडेट, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1258 कोरोना रुग्ण

    सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1258 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 46 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3016 वर

    अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 14337 वर

    तर उपचार घेणारे 2027 जण आज कोरोना मुक्त

    गेल्या 24 तासांत अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 85553 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 102906 वर

  • 19 May 2021 06:56 AM (IST)

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    निफाड : नविन कोरोना बाधित रुग्ण – 51

    एकूण कोरोना बाधित रुग्ण – 17413

    आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण – 15975

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 610

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 838

    एकूण झालेल्या टेस्ट – 530

  • 19 May 2021 06:55 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 28,438 नवे कोरोना रुग्ण, 52,898 रुग्ण बरे होऊन घरी परतले

    राज्यात गेल्या 24 तासांत 28,438 नवे कोरोना रुग्ण

    52,898 रुग्ण बरे होऊन घरी परतले

    679 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

    सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54%