Maharashtra Coronavirus LIVE Update : 18 जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट राज्यापेक्षा जास्त : अजित पवार

| Updated on: May 28, 2021 | 11:24 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : 18 जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट राज्यापेक्षा जास्त : अजित पवार
MAHARASHTRA Corona
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 May 2021 10:31 PM (IST)

    18 जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट राज्यापेक्षा जास्त : अजित पवार

    सातारा :

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    18 जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट राज्यापेक्षा जास्त आहे

    फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढायचा प्रयत्न केला

    जिथे कर्मचारी कमी तिथे कर्मचारी दिले

    सात रुग्णवाहिका उद्या सातारासाठी येतील

    लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या

    पोलिसांना कोणाचीही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना

    आणखी काही ठिकाणी जम्बो हॉस्पिटलसाठी सूचना दिल्या आहेत

    रेमडिसिव्हीरचा आता तुटवडा राहिला नाही

    पण ब्लॅक फंग्सची इंजेक्शन कमी पडत आहेत

    ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटच्या सूचना

    काही कठोर गोष्टी प्रशासनाकडून केल्या जातील. सातारकरनी वाईट वाटून घेऊ नये

    कारवाईची वेळ नागरिकांनी आणू नये

    सूचनांचं पालन अधिकारी किंवा प्रशासकीय जे लोक करणार नाहीत त्याच्यावर कारवाई करणार

  • 28 May 2021 09:17 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1218 नवे कोरोनाबाधित, 36 जणांचा मृत्यू

    सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1218 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 114, आज आढळलेले 4 रुग्ण, आज 2 रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत्यू 7 रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 36 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3337 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 12715 वर

    तर उपचार घेणारे 1256 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 99384 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 115436 वर


  • 28 May 2021 07:55 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 424 रुग्णांचा मृत्यू

    महाराष्ट्राला मोठा दिलासा, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, राज्यात दिवसभरात 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 424 रुग्णांचा मृत्यू, तर 31 हजार 671 रुग्णांची कोरोनावर मात

  • 28 May 2021 07:24 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 195 नवे कोरोनाबाधित, 9 जणांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट :

    अकोल्यात आज दिवसभरात 195 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत 1056 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 48879 जणांनी कोरोनावर मात केली

    तर सध्या 5127 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 430 जण कोरोनामुक्त झाले

  • 28 May 2021 06:38 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 205 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

    वाशिम कोरोना अलर्ट :

    जिल्ह्यात आज नवे आढळले 205 रुग्ण

    तर आज  275  जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 06 रुग्णांचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात 15 मे नंतर मागील 14 दिवसात 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे 4998 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 6715 रुग्ण कोरोनामुक्त झालेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39683

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 2707

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 36524

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 451

  • 28 May 2021 06:30 PM (IST)

    पुण्यातील विकेंड लॉकडाऊन उठवला, अत्यावश्यक सेवेवरील निर्बंध काढले

    पुण्यातील विकेंड लॉकडाऊन उठवला
    – अत्यावश्यक सेवेवरील निर्बंध काढले
    – विकेंड लॉकडाऊन बाबत लोकप्रतिनिधी यांनी काही मागण्या केल्या होत्या त्यानुसार विकेंड लॉकडाऊन उठवला

  • 28 May 2021 06:17 PM (IST)

    वारीबाबत निर्णय झालेला नाही, कॅबिनेटमध्ये चर्चा करू : अजित पवार

    अजित पवार –

    – ११ वाजता GST ची बैठक सुरू झाली

    – कोरोनाची बैठक राजेश टोपे यांनी घेतली

    – पालखीच्या बाबत बैठक झाली

    ऑन वारकरी बैठक
    – वारकरी संप्रदाय सांगतोय ते करू

    – वारीबाबत निर्णय झालेला नाही

    – कॅबिनेटमध्ये वारीबाबत चर्चा करू

    – मुख्यमंत्री ते निर्णय घेतील

    ऑन GST मिटिंग
    – GST मध्ये १८ विषय

    – कोरोनाच्या काळात लागणाऱ्या गोष्टीवर सवलत द्यावी

    – त्याबाबत मागणी केली

    – थकीत बाबत अजून मुद्दा झाला नाही
    ४६ हजार कोटी अजून मिळू शकले नाही

    – त्यात २४ हजार कोटी रिपये दिले 22 बाकी

    ऑन संभाजीराजे
    – त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली होती

    – दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ लोकांची कमिटी नेमलीय

    – त्यानुसार सर्व काम करू, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न

    – राजकारण न आनता, कुठल्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण दिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करू

    – तज्ज्ञ जसं सांगितल तसा निर्णय करू

    ऑन महाविकास आघाडी वाद
    – महाविकास आघाडी चांगला कारभार करतंय

    – कुठलीही नाराजी नाही, तक्रार नाही

    – पवार साहेबांनी जशी वेळ दिली तसा मी भेटलो

    – बातम्या पेरल्या जातात

    – मात्र कुठल्याही बाबत काहीही झालेलं नाही

    – सगळं व्यवस्थित सुरू आहे

    ऑन संभाजीराजे आंदोलन इशारा
    – आंदोलनाला अज वेळ आहे ना

    – मार्ग निघेल, अजून ९ दिवस आहे

    ऑन चंद्रकांत पाटील आंदोलन इशारा
    – चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलनावर उडवली खिल्ली

    – मराठा आरक्षणावर सगळ्या मराठा समाज्याने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलंय तर मग आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, आम्हीही मराठा आहे
    ( पाटलांना दादांचा मजेशीर टोला )

  • 28 May 2021 06:15 PM (IST)

    साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, 2528 नवे कोरोनाबाधित, 30 जणांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट :

    आज सातारा जिल्ह्यात 2528 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2053 नागरिकांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

    सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतची आकडेवारी

    एकूण नमुने -70533
    एकूण बाधित – 160554
    घरी सोडण्यात आलेले -135043
    मृत्यू -3592
    उपचारार्थ रुग्ण-21819

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 28 May 2021 06:11 PM (IST)

    बुलडाणा : खामगाव शहरात सोसाट्याचा वारा

    बुलडाणा : खामगाव शहरात सोसाट्याचा वारा, सोसाट्याच्या वाऱ्याने अनेकांचे झाले नुकसान, अनेक अतिक्रमित टपर्‍या आणि टिनपत्र रोडवर येऊन पडले, तर अनेकांचे दुकानासमोर असलेले शेड सुद्धा हवेने पडले

  • 28 May 2021 06:10 PM (IST)

    नागपूरला मोठा दिलासा, मृत्यू आणि कोरोनाबाधितांची संख्या कमी

    नागपूर :

    नागपूरला आज मोठा दिलासा, मृत्यू आणि बाधितांची संख्या कमी

    नागपुरात आज 365 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    1333 जणांनी केली कोरोना वर मात

    तर 11 जणांचा कोरोना मुळें मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 473537

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 456579

    एकूण मृत्यू संख्या – 8865

  • 28 May 2021 06:05 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 573 नवे कोरोनाबाधित, 41 रुग्णांचा मृत्यू, 999 जणांना डिस्चार्ज

    पुणे :
    – दिवसभरात ५७३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ
    – दिवसभरात ९९९ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ४१ रुग्णांचा मृत्यू. त्यातील १२ मृत्यू पुण्याबाहेरील.
    – ९८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६८७०२.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७५३५.
    – एकूण मृत्यू -८१७७.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५२९९०.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८२००.

  • 28 May 2021 06:03 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात 232 कोरोनामुक्त, 3 जणांचा मृत्यू, 108 नवे कोरोनाबाधित

    गडचिरोली : आज जिल्हयात 108 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 232 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27301 वर पोहचली. तसेच सद्या 1129 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 710 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

  • 28 May 2021 05:32 PM (IST)

    डबेवाल्यांनी डबेवाला पुरस्कार देऊन मानले सुनील शेट्टी यांचे आभार

    कोरोना महामारीमुळे डबेवाल्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असता लॉकडाऊन काळात डबेवाल्यांना मदतीचा हात पुढेकरून Save the children India या संस्थेच्या माध्यमातून सिने कलाकार व समाजसेवक सुनीलजी शेट्टी साहेबांनी पुण्यामध्ये डाबेवाल्यांच्या गावी रेशन वाटप करण्यात आले म्हणून डबेवाले संघटनेच्या वतीने आज त्यांना डबेवाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व आभार मानले.

  • 28 May 2021 04:21 PM (IST)

    लॉकडाऊन 15 दिवसांसाठी आणखी वाढवला, 1 जूनला नियमावली जाहीर करणार : राजेश टोपे

    पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    – पालखी सोहळ्यासंदर्भात वारकऱ्यासोबत बैठक सुरू
    -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू
    – पुण्यातील परिस्थिती समाधानकारक आहे
    – रुग्णसंख्या कमी येतेय
    – पॉझिटिव्ह रेट अद्याप कमी नाहीय
    – टेस्टिंग संख्या कमी होता कामा नये
    – होम आयसोलेशनची संख्या आता 56 टक्क्यांवर आली आहे
    – होम आयसोलेशनची संख्या कमी झाली पाहिजे
    – खाजगी रुग्णालयाचे प्रत्येक बिल चेक केलं जाणार
    – याआधी दीड लाखांचे बिल चेक केलं जातं होतं
    – पुण्याच्या प्रशासनाने उत्तम काम केलं हवं
    – म्युकरमायकोसिसचे 550 रुग्ण उपचार घेत आहेत
    – या सर्वांना मोफत उपचार मिळाला पाहिजे असा आदेश रुग्णालयाना दिला आहे
    – खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरनाच्या दरावर आमचा अधिकार नाही, त्यावर केंद्राचा अधिकार आहे, मात्र योग्य दर लावण्याचे खाजगी रुग्णालयांना आवाहन
    – लॉकडाऊनसंदर्भात 15 दिवस वाढवण्यात आला आहे, मात्र 1 तारखेला त्याची नियमावली जाहीर केली जाणार

  • 28 May 2021 02:38 PM (IST)

    राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    पुणे –

    – राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात,

    – बैठकीला अजित पवारांची अनुअपस्थिती,

    – अजित पवार जीएसटीच्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित असल्यामुळे कोरोना आढावा बैठकीला नसणार आहेत,

    – विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरुय

  • 28 May 2021 12:42 PM (IST)

    संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही – आरोग्य मंत्री

    पुणे –

    ज्या जिल्ह्यांमध्येे पॉझिटिव्ही रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. तर जिथं कोरोनाची साथ आटोक्यात आलीय तिथंही फार तर काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते, पण संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी दिलाय

  • 28 May 2021 12:40 PM (IST)

    कोविडमुळे पालकंना गमावून बसलेल्या अनाथ मुलांसाठी बारावीपर्यंतचे शिक्षण विनामुल्य करण्याचा शिक्षण विभागाचा मानस

    महाराष्ट्रात कोविडमुळे पालकंना गमावून बसलेल्या अनाथ मुलांसाठी बारावीपर्यंतचे शिक्षण विनामुल्य करण्याचा शिक्षण विभागाचा मानस

    कोविड -१९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना राज्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये बारावीपर्यंतचे विनामूल्य शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतल्याची माहीती

    ९० हून अधिक मुलांनी दोन्ही पालकांना गमावले, तर २,००० हून अधिक मुले एका पालकांशिवाय आहेत

  • 28 May 2021 11:39 AM (IST)

    लॉकडाऊनच्या काळात सोलापूर एसटी विभागाला चांगलाच फटका

    सोलापूर –

    लॉकडाऊनच्या काळात सोलापूर एसटी विभागाला चांगलाच फटका

    1 एप्रिल 2021 पासून एसटीचे सेवा पूर्णपणे बंद

    एरव्ही रोज सोलापूर विभागाला 60 लाख उत्पन्न

    त्यानुसार साधारण गेल्या 57 दिवसातील 342 कोटी रुपयांचे उत्पन्न  बुडाले

    त्यामुळे तिथून एसटी विभागाचा खर्च भागणार कसा ,

    कर्मचाऱ्यांचा पगार कसा होणार आणि अन्य खर्चाचा भार कसा उचलणार असा प्रश्न एसटी महामंडळासमोर

  • 28 May 2021 11:38 AM (IST)

    लाॅकडाऊन काळात लोककलावंतांना मदतीचा हात द्या, शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचं दानशुरांना आवाहन

    मुंबई –

    – लाॅकडाऊन काळात लोककलावंतांना मदतीचा हात द्या, शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचं दानशुरांना आवाहन

    – तसेच लोककलावंतांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनीही पुढे यावे असे आवाहन शिवशाहीर व समाज प्रबोधनकार ह.भ.प. कल्याण काळेंनी केलंय

    -आपलं जीवन आनंदाने जगणारे लोककलावंत गेल्या एक ते दीड वर्षापासुन कला हेच जीवन असताना लॉकडाऊनमुळे अत्यंत भयानक परिस्थितीतून जात आहे.

    – बेरोजगारी आणि यातच पोटातील भुख, औषध उपचार न मिळाल्याने अनेक लोक कलावंतांनी जगाचा निरोप घेतला आहे.

    – त्यामुळे लोककलावंतांना मदतीचा हात द्या असे आवाहन कल्याण महाराज काळे यांनी केलंय

  • 28 May 2021 11:02 AM (IST)

    औरंगाबादेतील सर्वात मोठ्या बजाज कंपनीत लसीकरणाला सुरुवात

    औरंगाबाद –

    सर्वात मोठ्या बजाज कंपनीत लसीकरणाला सुरुवात

    बजाज कंपनी स्वखर्चाने करतेय कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचं लसीकरण

    चार हजार कामगार आणि कुटुंब मिळून 15 हजार जणांचं करणार लसीकरण

    बजाज कंपनीला पहिल्या टप्प्यात 5 हजार कोव्हीशिल्ड लसी प्राप्त

    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते होणार लसीकरणाचे उद्घाटन

    कामगारांचं लसीकरण करणारी बजाज ठरतेय देशातील पहिली कंपनी

  • 28 May 2021 10:07 AM (IST)

    देशात आज 1 लाख 86 हजार 364 नवे रुग्ण

    देशात आज 1 लाख 86 हजार 364 नवे रुग्ण

    देशात आज 2 लाख 59 हजार 459 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    देशात आज 3 हजार 660 रुग्णांचा मृत्यू

  • 28 May 2021 09:25 AM (IST)

    सोलापुरात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या घटल्याने पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध

    सोलापूर –

    जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या घटल्याने शासकीय आणि खाजगी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध

    लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 12 हजार 909 बेड

    आयसीयुचे 285 बेड, व्हेंटिलेटरचे 75  तर ऑक्सिजनचे 983 बेड रिकामे

    2700  रेमडीसीव्हर इंजेक्शनचा साठा उपल्बध

  • 28 May 2021 09:23 AM (IST)

    सोलापूर कोव्हिड रुग्णालय परिसरात विनाकारण गर्दी केल्यास 500 दंड

    सोलापूर – कोव्हिड रुग्णालय परिसरात विनाकारण गर्दी केल्यास 500 दंड

    ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर

    कोव्हिड रुग्णालय परिसरात रुग्णालयाचे नातेवाईक विनाकारण करत आहेत गर्दी

    त्यामुळे आता रुग्णालय परिसरात विनाकारण करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

  • 28 May 2021 09:21 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पावसाळ्यापुर्वीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात

    मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पावसाळ्यापुर्वीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात

    – ४० फूट ऊंचीचे दोन मोठे मंडप तयार केले…

    – पावसाळ्यात वॅक्सिनेशनला खंड पडू नये म्हणून मजबूत बांधकाम सुरू…

    – आज बीकेसीत २०० जणांना वॅक्सिन मिळणार… ४५ च्या वरील लोकांना १०० कोविशिल्ड लसीचा पहिला डोस…

    – १०० को वॅक्सिनचा दुसरा डोस ६० च्या पूढील लोकांना दिला जाईल.

  • 28 May 2021 08:32 AM (IST)

    ‘म्युकरमायकोसिस’ वरील आजारावरील इंजेक्शनचा वितरण नियमात बदल

    पुणे

    ‘म्युकरमायकोसिस’ वरील आजारावरील इंजेक्शनचा वितरण नियमात बदल

    इंजेक्‍शन आणि औषधीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात गर्दी

    त्यामुळे आता या कार्यालयातून खासगी रुग्णालयांना करण्यात येणारे वितरण बंद करण्याचा निर्णय

    त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून केवळ सरकारी रुग्णालयांना पुरवठा केला जाणार

    या कार्यालयाकडे शिल्लक राहणारा औषधांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी रुग्णालयांना वितरित होणार

    नव्या नियमांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा मनस्ताप वाढला

  • 28 May 2021 08:20 AM (IST)

    नाशिक ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आता शहरातील उद्योग अडचणीत

    नाशिक ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आता शहरातील उद्योग अडचणीत

    सद्यस्थितीत 30 टक्के उद्योगांना जाणवतोय ऑक्सिजनचा तुटवडा

    उद्योग चालवण्यास परवानगी, मात्र ऑक्सिजन पुरवठा नाही

    जिल्हा प्रशासनाकडून आढावा मात्र निर्णय अद्याप नाही

    वैद्यकीय वापरासाठी दिलेल्या 2000 सिलेंडर च्या परतीची प्रतीक्षा

  • 28 May 2021 08:12 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

    नाशिक – जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

    आतापर्यंत म्युकरमायकोसिसने 19 जणांचा बळी

    सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसचे 325 च्या वर रुग्ण

    तर यापैकी 185 रुग्णांणवर शस्त्रक्रिया सुरू

    शहरांपेक्षा ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक

  • 28 May 2021 08:11 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील 76 हजार केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीत धान्य

    बुलडाणा

    जिल्ह्यातील 76 हजार केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीत धान्य

    जून महिन्यात होणार वाटप

    कोरोना काळात दिलासा

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेनंतरंगत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिका धारक यांनाही मिळणार धान्य,

    राज्य शासनाने घेतला निर्णय

  • 28 May 2021 08:11 AM (IST)

    रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये, कोरोना मृत्यूचा आकडा वाढताच पुन्हा कडक लाॅकडाऊन बाबत आज महत्वपूर्ण  बैठक

    रत्नागिरी –

    रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये, कोरोना मृत्यूचा आकडा वाढताच

    रत्नागिरीत पुन्हा कडक लाॅकडाऊन बाबत आज महत्वपूर्ण  बैठक

    पालकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत घेणार आढावा

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लवकरच कडक लाॅकडाऊन बाबत निर्णय़

    जिल्ह्याचा मृत्यूदर ३.३१ टक्के, मृत्यूदर कमी आणण्यासाठी तंज्ञ डाॅक्टरांची मदत घेतली जाणार

  • 28 May 2021 08:10 AM (IST)

    मुंबई मॉडेलचे हायकोर्टाकडून पुन्हा कौतुक

    मुंबई

    मुंबई मॉडेलचे हायकोर्टाकडून पुन्हा कौतुक

    मुंबई महापालिकेने केलेले नियोजन

    नियमांची काटेकोरपणे केलेली अंमलबजावणी

    या मुळेच मुंबईतील कोविड रुग्ण संख्या झपाट्याने घटली

    राज्यातील इतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी

    मुंबई महापालिकेशी संपर्क साधुन मुंबई माँडेलच अनुकरण कराव

    हायकोर्टाच्या सुचना

    कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिके सज्ज

    लहान मुलांवर उपाचारासाठी विषेश सोय

    आरोग्य सुविधेवर भर

    प्रशासनाची हायकोर्टात माहिती

  • 28 May 2021 08:09 AM (IST)

    नागपुरात म्युकर मायकोसिस वरील अम्फोटेरिसिन 1150 व्हायरस प्राप्त झाल्या

    नागपूर –

    नागपुरात म्युकर मायकोसिस वरील अम्फोटेरिसिन 1150 व्हायरस प्राप्त झाल्या आहेत

    नागपुरात सध्या स्थितीत 439 रुग्ण घेत आहे उपचार

    हे इंजेक्शन खाजगी आणि सरकारी रुग्णालय ला वितरित करण्यात आले

    यामुळे या रुग्णांवर वेगाने उपचार करण्यास होणार मदत

  • 28 May 2021 08:08 AM (IST)

    रत्नागिरी – म्युकरमायकोसिसचा सर्वात मोठा धोका कोकणाला

    रत्नागिरी – म्युकरमायकोसिसचा सर्वात मोठा धोका कोकणाला

    आर्द्रता अधिक असल्याने अधिक काळजीचे आरोग्य विभागाचे आवाहन

    जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण, दोघांचा मृत्यू

    जिल्ह्यात औषधाचा पुरेसा साठा

  • 28 May 2021 07:10 AM (IST)

    औरंगाबादेत लॉकडाऊन उठलं नाही, तर मनसेकडून थेट दुकाने उघडण्याचा ईशारा

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    लॉकडाऊनच्या वादात आता मनसे आणि भाजपचीही उडी

    लॉकडाऊन उठलं नाही तर मनसेकडून थेट दुकाने उघडण्याचा ईशारा

    मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिला दुकाने उघडण्याचा ईशारा

    तर लॉक डाऊन नाही उघडल्यास भाजप कडून रस्त्यावर उतरण्याचा

    जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून दिला रस्त्यावर उतरण्याचा ईशारा

    भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला ईशारा

    एक जून पासून दुकाने उघडण्याची मनसे आणि भाजपची मागणी

    एक जून नंतर लॉकडाऊन प्रश्नी औरंगाबादेत वातावरण तापण्याची शक्यता

  • 28 May 2021 07:06 AM (IST)

    पीकविमा वाटपात पक्षपात, भाजप आमदार प्रशांत बंब यांचा गंभीर आरोप

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    पीकविमा वाटपात पक्षपात

    भाजप आमदार प्रशांत बंब यांचा गंभीर आरोप

    पीकविमा वाटपात महाविकास आघाडीडून पक्षपात झाल्याचा आरोप

    मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पत्र लिहून केला पक्षपाताचा आरोप

    विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदार संघात पीक विमा नाकारल्याचा आरोप

    आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदार संघात पीकविमा दिला नसल्याचा आरोप

    तर शिवसेना आमदारांच्या मतदार संघात पीकविमा वाटल्याचा आरोप

    पीकविमा मिळाला नाही तर उद्रेक होण्याचा प्रशांत बंब यांचा ईशारा

  • 28 May 2021 07:03 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ ला सुरुवात

    पुणे

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ ला सुरुवात

    त्यानुसार विद्यापीठात रोज 100 सॅम्पल्सची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करता येणार

    विद्यापीठातील या केंद्रात हॉस्पिटमधून रुग्णांचे सॅम्पल्स रोज येतील.

    30 स्वयंसेवकांच्या मदतीने या सॅम्पल्सची तपासणी करून त्यांचे निकाल पाठवून दिले जातील.

    प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाची येथे तपासणी केली जाणार

    या तपासण्या हळूहळू वाढवण्यात येणार

  • 28 May 2021 07:00 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आज सातारा दौरा

    सातारा –

    सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आज सातारा दौरा

    सायंकाळी 7वाजता सातारा येथे कोरोना परस्थितीचा व उपाययोजनांचा घेणार आढावा

    सातारा जिल्ह्यात दररोज वाढती कोरोनाबाधितांच संख्या व मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

    जिल्ह्यात दररोज दोन हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडतायत तर दररोज मृत्यूची संख्या 35 च्या पुढे

    जिल्ह्यात अॅक्टिव् रुग्णांची संख्या वीस हजाराच्या पुढे

  • 28 May 2021 06:56 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1010 कोरोना रुग्ण

    सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 1010 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 110, आज 2 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 35 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3301 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 12789 वर

    तर उपचार घेणारे 1062 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 98128 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 114218 वर

  • 28 May 2021 06:23 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 21,273 नवे कोरोनाबाधित, 34,370 रुग्णांची कोरोनावर मात

    राज्यात गेल्या 24 तासांत 21,273 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

    गेल्या 24 तासांत नवीन 34,370 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

    एकूण 52,76,203 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

    राज्यात एकूण 3,01,041 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

    राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.02% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.