Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाच्या नव्या 66159 नव्या रुग्णांची नोंद, 771 जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 30, 2021 | 12:29 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Maharashtra Coronavirus LIVE Update

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाच्या नव्या 66159 नव्या रुग्णांची नोंद, 771 जणांचा मृत्यू
MAHARASHTRA Corona
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Maharashtra Coronavirus LIVE Update

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2021 10:19 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजाराच्या पुढे

    सांगली कोरोना अपडेट

    सांगली जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजाराच्या पुढे

    तर जिल्ह्यात आज दिवसभरात 1308 नवे कोरोना रुग्ण आढळले

    दिवसभरात 36 कोरोना रुग्णांचा मृत्य

    जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 2242 जणांचा मृत्यू

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12918 वर

    उपचार घेणारे 798 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59238 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना 74398 कोरोना रुग्णांची नोंद

  • 29 Apr 2021 08:54 PM (IST)

    उस्मानाबादमध्ये लसीकरणाच अजब प्रकार, जिल्हा आरोग्य यंत्रणेने 100 पैकी 101.84 टक्के लसीकरण केल्याचा दावा

    उस्मानाबाद – कोरोना लसीकरण मोहिमेत प्रशासनाचा अजब प्रकार उघड

    उस्मानाबाद जिल्ह्यात पुरवठा लसीपेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण

    जिल्हा आरोग्य यंत्रणेने 100 पैकी 101.84 टक्के लसीकरण केल्याचा दावा

    उस्मानाबाद जिल्ह्याला 1 लाख 49 हजार 810 कोरोना लसीचे डोस आले त्यापैकी 1 लाख 52 हजार 561 नागरिकांना डोस दिले

    पुरवठा केलेल्या लससाठ्या पैकी 2 हजार 751 जणांना अतिरिक्त लस देण्याची किमया उस्मानाबाद प्रशासनाने केली

    उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा अकडेवारीचा खेळ उघड


  • 29 Apr 2021 08:53 PM (IST)

    वसई विरारमध्ये 655 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, 11 जणांचा मृत्यू

    वसई विरार-  मागच्या 24 तासात 655 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

    तर आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

    तसेच 688 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53,029

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 40909

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या 1085

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या 11035

  • 29 Apr 2021 08:42 PM (IST)

    राज्यात कोरोनाच्या नव्या 66159 नव्या रुग्णांची नोंद, 771 जणांचा मृत्यू

    राज्यात आज दिवसभरात तब्बल 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. गेल्या चोवीस तासात तब्बल 771 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 68 हजार 537 रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

  • 29 Apr 2021 08:09 PM (IST)

    राज्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, त्याआधी ऑक्सिजनबाबत परिपूर्ण होण्याचं ध्येय : राजेश टोपे

    “राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांना नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. सध्या 1715 टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज दहा ते पंधरा हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी”, अशी सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • 29 Apr 2021 07:53 PM (IST)

    भारतरत्न सचिन तेंडूलकरची मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटींची मदत

    भारतरत्न सचिन तेंडूलकरने केली 1 कोटीची मदत
    मिशन आँक्सिजन इंडीयाला केली मदत
    दिल्लीतील 25 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या मिशनला मदत

  • 29 Apr 2021 07:35 PM (IST)

    नागपुरात कोरोनामुळे दिवसभरात तब्बल 89 रुग्णांचा मृत्यू, 7496 नवे कोरोनाबाधित

    नागपूर :

    नागपुरात आज कोरोनामुळे 89 रुग्णांचा मृत्यू

    7496 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 6984 जणांनी केली कोरोना वर मात

    एकूण रुग्ण संख्या – 401326

    एकूण बरं होणार्याची संख्या – 316399

    एकूण मृत्यू संख्या – 7300

  • 29 Apr 2021 07:21 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 29 रुग्णांचा मृत्यू, 1741 नवे कोरोनाबाधित

    चंद्रपूर :

    गेल्या 24 तासात 1741 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 29 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 58645

    एकूण कोरोनामुक्त : 41408

    ऍक्टिव्ह रुग्ण : 16360

    एकूण मृत्यू : 877

    एकूण नमूने तपासणी : 373004

  • 29 Apr 2021 07:20 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 574 नवे रुग्ण

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 574
    आज झालेले मृत्यू – 13
    आज बरे झालेले – 520

    तालुका नुसार रुग्णसंख्या

    गोंदिया————–205
    तिरोडा————–36
    गोरेगाव————–08
    आमगाव————– 68
    सालेकसा————- 63
    देवरी—————— 40
    सडक अर्जुनी ———– 88
    अर्जुनी मोरगाव——– 65
    इतर राज्य————–01

    एकूण रुग्ण – 32486
    एकूण मृत्यू – 523
    एकूण बरे झालेले – 26000
    एकूण उपचार घेत असलेले – 5963

  • 29 Apr 2021 07:18 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील बंद पडलेले लसीकरण पुन्हा सुरू होणार 

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यातील बंद पडलेले लसीकरण पुन्हा सुरू होणार

    आज जिल्ह्यात कोविशिल्डचे 4 हजार डोस दाखल

    लस संपल्याने आज दिवसभर जिल्ह्यातील लसीकरण मोहीम बंद होती

    जिल्ह्यात उद्यापासून 140 पैकी 40 केंद्रावर होणार पुन्हा लसीकरणला सुरुवात

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 55 हजार जणांचं लसीकरण झालं

    जिल्ह्यात आतापर्यंत मिळाले होते 1 लाख 69 हजार डोस

  • 29 Apr 2021 07:16 PM (IST)

    येवल्यात दिवसभरात 64 नवे कोरोनाबाधित

    येवला :- कोरोनाबाधित 64 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

    आता पर्यंत 158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील 3908कोरोन बधितांची एकूण संख्या पोहचली

    कोरोनावर 3194जणांनी मात करत केली घरवापसी

    उर्वरित 564 जण कोरोणा उपचार घेत आहे

  • 29 Apr 2021 07:15 PM (IST)

    खासदार सुजय विखे पाटील प्रकरणात औरंगाबाद हायकोर्टाचे महत्वाचे आदेश

    अहमदनगर :

    खासदार सुजय विखे पाटील प्रकरणात औरंगाबाद हायकोर्टाचे महत्वाचे आदेश

    शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खाजगी चार्टट प्लेनची माहिती कोर्टात सादर करण्याचे आदेश

    10 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात शिर्डी विमानतळ येथे आलेल्या खाजगी चार्टट प्लेनची माहिती सादर करण्याचे आदेश

    त्याचप्रमाणे विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही कोर्टात सादर करण्याचे आदेश

    गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी माहिती सादर करण्याचे आदेश

    त्याचप्रमाणे या रेमडेसिवीरबाबत अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सर्व औषध कायदेशीर मागवण्यात आली होतीत.

    हे सर्व जिल्ह्यामार्फत मागवण्यात आलं होतं

    यावेळी याचिकाकर्ते यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी सुजय विखे पाटील यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप कोर्टात सादर केल्या. त्यानंतर कोर्टाने जिल्हाधिकारी यांच्या नक्की स्टँड काय आहे हे कोर्टा समोर मांडवं, असे आदेश कोर्टाने दिलेत.

    पुढील सुनावणी तीन मे रोजी होणार आहे.

  • 29 Apr 2021 07:10 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात तब्बल 93 रुग्णांचा मृत्यू, 2516 नवे कोरोनाबाधित

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट :

    नवे कोरोनाबाधित रुग्ण -2516
    कोरोनामुक्त -2247
    मृत्यू -93

    आत्तापर्यंत
    कोरोना रुग्ण -208417
    कोरोनामुक्त -183086
    मृत्यू -2880

  • 29 Apr 2021 05:43 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 524 नवे रुग्ण, 8 बाधितांचा मृत्यू

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज आठ रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 524 नवे रुग्ण तर 386 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 29 दिवसात एकूण 103 रुग्णांचा झाला मृत्यू, तर एकूण आढळले नवे 10937 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 27012

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 3889

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 22832

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 290

  • 29 Apr 2021 05:13 PM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

    ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण
    अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूरचे वडील आहेत रणधीर कपूर
    मुंबईच्या कोकीलाबेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल

  • 29 Apr 2021 05:08 PM (IST)

    भारतातून बाहेर पडा, अमेरिका सरकारचा भारतातील अमेरिकन्सला सूचना

    अमेरिका सरकारने भारतातील अमेरिकन नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. भारतात कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी भारत सोडावा, अशी सूचना अमेरिकेकडून देण्यात आली आहे. ही अॅडव्हायजरी लेव्हल 4 ची आहे.

  • 29 Apr 2021 05:03 PM (IST)

    जम्बो कोव्हिड सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांमध्ये अनुभवाचा अभाव असल्याचा मनसेचा आरोप

    मुंबईच्या बीकेसी कोव्हीड केंद्रात फक्त एकच डॉक्टर एमबीबीएस इतर सर्व बीएएमएस, बीएएमएस, बीडीएस असल्याची माहिती

    जम्बो कोव्हिड सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांमध्ये अनुभवाचा अभाव असल्याचा मनसेचा आरोप

    मनसेने सादर केली डॉक्टरांच्या डिग्री आणि अनुभवाची यादी

    यापैकी ९० टक्के डॉक्टर हे फ्रेशर आणि त्यापैकी अनेकांचे रजिस्ट्रेशनची मुदत संपली असल्याचा मनसेचा दावा,

    सर्वाधिक अनुभव असणार्या डॉक्टरचा अनुभव कालावधी फक्त ६वर्ष इतकाच

    अस असतानाही त्याच कंत्राटदाराला महापालिकेने नेस्को कोव्हीड सेंटरचे कंत्राट दिले

    महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये चांगले अनुभवी डॉक्टर मिळू नये याबाबत मनसेने व्यक्त केली खंत.

  • 29 Apr 2021 05:02 PM (IST)

    पालघरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये तांत्रिक दोष, कंपनीचे इंजेक्शन परत करण्याचे आदेश

    पालघर : हेट्रो हेल्थ केयर लिमिटेड या कंपनीने 8 एप्रिलला पालघर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरवठा केला होता. जवळपास 900 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. हेट्रो हेल्थ केअर कंपनीच्या या इंजेक्शन मधीक एक बेच पुरवठा पुन्हा कंपनीने परत मागिवल्याने रुग्णामध्ये एकच खडबळ उडाली आहे. HCL21013 हा बॅच नंबर असलेल्या इंजेक्शनमध्ये तांत्रिक दोष असल्याने तो पुरवठा वापरू नये. तो परत करण्याचे आदेश कंपनी प्रशासनाने वितरकांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील 47 हॉस्पिटलला रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामधील ज्या रुग्णालयांना HCL21013 हा बॅच पुरवठा झाला होता त्यांच्याकडून तो माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयातील दोन रुग्णाला हे इंजेक्शन दिल्यावर सौम्य रिऍक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोनीही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक (पालघर) मनिष चौधरी यांंनी याबाबत माहिती दिली आहे.

    या HCL21013 बेच चा पुरवठा महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात देखील झाल्याची माहिती मिळाली आहे. तेथून देखील झालेला पुरवठा माघारी बोलावल्याची माहिती समोर आली आहे, आधीच या इंजेकॅशनचा तुटवडा सुरू असून त्यात असा प्रकार घडल्याने रुग्णाच्या नातेवाईक व डॉक्टर यांना त्रास सहन करावा लागत आहे

  • 29 Apr 2021 04:36 PM (IST)

    हिंगोलीत शासकीय रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाही, अशी तक्रार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

    हिंगोली : शासकीय रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाही. वरिष्ठांना सांगूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा ऑडियो मेसेज पोलीस अधिक्षकांना पाठवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा आज अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑडियो मेसेजनंतर त्यांच्यावर योग्य उपचारासाठी पोलिसांनी धावपळ केली. मात्र त्याला खूप उशीर झाला होता.

  • 29 Apr 2021 03:12 PM (IST)

    नागपूरात कोरोना रुग्णाचं पाच लाखांचं बील 30 मिनिटांत आलं अडीच लाखांवर

    नागपूरात कोरोना रुग्णाचं पाच लाखांचं बील 30 मिनिटांत आलं अडीच लाखांवर

    – नागपूरातील न्यू इरा हॅास्पीटलमधला धक्कादायक प्रकार

    – दिपक सोमानी यांच्या पत्नीचं बिल काढलं पाच लाख रुपये

    – तक्रारीनंतर हॅास्पीटलमध्ये धडकले नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी

    – संदीप जोशी यांनी चौकशी केल्यानंतर पाच लाखांचं बिल झालं अडीच लाख रु.

    – नागपूरात अनेक रुग्णालयांकडून सुरु आहे कोरोना रुग्णांची लूट

  • 29 Apr 2021 03:00 PM (IST)

    पुण्यात मृत रुग्णांना नेण्यासाठी शववाहिका कमी पडू लागल्या, आता स्कुल बसमधून होणार मृतदेहांची वाहतूक

    पुणे –

    – पुण्यात मृत रुग्णांना नेण्यासाठी शववाहिका कमी पडू लागल्या,

    – त्यामुळे आता 10 दहा स्कुल बसमधून होणार मृतदेहाची वाहतूक,

    – शववाहिका कमी पडत असल्यानं महापालिकेनं आरटीओकडे मागितली होती 10 स्कुलबसची परवानगी,

    – आरटीओनं दिली 10 स्कुल बसला परवानगी,

    – प्रतिदीन देणार 1600 रु.भाडे,

    – पालिकेची यंत्रणा मेटाकुटीला , वाढत्या मृत्यू संख्येनं शववाहिकेची कमतरता ….

  • 29 Apr 2021 02:58 PM (IST)

    केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या : देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्यानेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसी दिल्या. तसेच भारताने अमेरिकेला कठीण काळात मदत केलीय. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांनी आम्ही देखील मदतीसाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं आहे. अमेरिककडून मदतही सुरु झाली, अशी प्रतिक्रिया दिली.

  • 29 Apr 2021 02:48 PM (IST)

    1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणासाठी प्रभागात पुणे महापालिका करणार दोनच लसीकरण केंद्र

    पुणे –

    – 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणासाठी प्रभागात महापालिका करणार दोनच लसीकरण केंद्र

    – अपुरं मनुष्यबळ आणि लसीची पुरवठा कमी होणार असल्यानं महापालिकेनं घेतला निर्णय,

    – सद्यस्थितीत 180 लसीकरण केंद्रावर सुरू आहे लसीकरण मात्र लस नसल्याने अनेक केंद्र बंद आहेत,

    – लसीचा पुरवठा जास्त झाल्यास लसीकरण केंद्र वाढवू,

    – मात्र एका प्रभागात दोनच लसीकरण केंद्र करणार असल्याची अतिरिक्त आयुक्तांची माहिती,

    – महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली माहिती

  • 29 Apr 2021 01:59 PM (IST)

    राजीव सातव यांना कोरोना, 28 एप्रिलपासून व्हेंटिलेटरवर – विश्वजित कदम

    विश्वजित कदम –

    19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवली

    22 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

    पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासुन आयसीयुमध्ये उपचार सुरु आहे

    28 तारखेपासून हे व्हेंटिलेटरवर आहेत

  • 29 Apr 2021 01:13 PM (IST)

    नितीन गडकरींच्या प्रयत्नाने कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु

    – नितीन गडकरींच्या प्रयत्नाने कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु

    – लॅबमध्ये ४२५ रुपयांत रोज २५०० जणांची RTPCR चाचणी होणार

    – आजपासून मोबाईल लॅबचं नागपूरात इन्स्टॉलेशन

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या लॅबचं नागपूरात उद्घाटन करण्यात आलं

    – यामुळे कोरोना चाचणीचा वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार

  • 29 Apr 2021 12:49 PM (IST)

    ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला सोलापूर अन्याय खपवून घेत नाही, उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर काँग्रेस शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर निशाणा

    सोलापूर : उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर काँग्रेस शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर जोरदार निशाणा

    पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या नादाला लागू नये, ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला सोलापूर अन्याय खपवून घेत नाही याची जाण ठेवावी

    काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका

    काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पालकमंत्र्यांच्या चुकीच्या निर्णयाचा रस्त्यावर उतरून सामना करेल, पालकमंत्री याना जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही

    उजनीतील पाणी इंदापूरला नेण्याच्या वृत्तावरून काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची भरणेंवर टीका

    उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यात आल्याची माहिती आली होती समोर, स्वतः भरणे यांनी मात्र वृत्त फेटाळले होते

  • 29 Apr 2021 12:07 PM (IST)

    1 मे पासून 18 वर्षावरील लोकांना लस देवू शकत नाही हे खरं आहे – विनायक राऊत

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेली परिस्थिती खरी आहे

    1 मे पासून 18 वर्षावरील लोकांना लस देवू शकत नाही हे खरं आहे

    लसीकरणावर नियंत्रण हे केंद्र सरकारचे

    अत्यंत तुटपुंजा लसीचा केंद्राकडून पुरवठा

    मनात इच्छा असून १ मे पाासून लसीकरण करता येणार नाही

    केंद्र सरकारने न्याय पद्धतीने लसीचे वापट करावे, महाराष्ट्राल पुरेसा वाटा मिळाल्यास १ मे पासून लसीकरण होवू शकतं

    कोरोना ग्रामिण भागात त्यामुळे आरोग्य यंत्रणेत बदल करणं आवश्यक

    केंद्र सकराने आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याकडे भर द्यावा

    कोरोनाची परिस्थिती आणीबाणीची सर्वांनी समजुतदाप पणे वागणे आवश्यक

    विरोधकांच्या नजरेत महाविकास आघाडीतचा द्वेश भरलाय.

    द्वेशाची कावीळ कमी होत नाही तो पर्यत विरोघकांना सदबुद्धी येणार नाही

  • 29 Apr 2021 12:06 PM (IST)

    लसीकरणाच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर टिकास्त्र, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली नाराजी

    रत्नागिरी-

    लसीकरणाच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर टिकास्त्र

    शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली नाराजी

    दवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारवर टिका करणं एवढंच काम

    मोगलांना जसे संताजी धनाजी दिसत होते तसे आता दवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांना महाविकास आघाडी सरकार दिसतंय

    महाराष्ट्र सरकारने मोफत लसीकरणाचे धोरण जाहिर केलंय ते कुठे कमी पडणार नाही

    केंद्र सरकारने लस दिली नाही तर लसीकरण करायचं कसं, खासादर राऊत यांचा सवाल

    त्यामुळे विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हि भुमिका प्रधान मंत्र्यासमोर जावू मांडावी

    त्यांना हि परिस्थिती मांडून महाराष्ट्राला न्याय हक्काने लसींचा पुरवठा मागुन घ्यावा

  • 29 Apr 2021 11:08 AM (IST)

    दिवसेंदिवस नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने परिस्थिती बिकट

    नाशिक –

    दिवसेंदिवस नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने परिस्थिती बिकट

    ऑक्सिजन तुटवडा आणि बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल

    मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालया समोर 30 ते 35 रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत

    खासगी आणि सरकारी रुग्णालयात कुठेही बेड मिळत नसल्याने रुग्णांनी झाकीर हुसेन रुग्णालया समोर केली गर्दी

  • 29 Apr 2021 08:53 AM (IST)

    नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आक्रमक, कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या हॅास्पिटलवर कारवाईची मागणी

    – नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आक्रमक

    – कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्या हॅास्पिटलवर कारवाईची मागणी

    – ‘मनपाने नेमलेल्या भ्रष्ट ॲाडीटरला सांभाळून ठेवा’

    – मनपा प्रशासनाला संदिप जोशींचा इशारा

    – लूट करणाऱ्या हॅास्पीटलच्या तक्रारीसाठी दिले स्वताचे फोन नंबर

    – रोज दुपारी चार ते सहा मनपा मुख्यालयातून करणार तक्रार निवारण

    – नागपूरात कोरोना रुग्णांची मोठी लूट, ३ ते पाच लाखांचं बिल

  • 29 Apr 2021 08:52 AM (IST)

    सोलापुरात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू

    सोलापूर –

    गेल्या 24 तासात कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू

    तर 1878 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले

    शहरात 232 तर ग्रामीण भागात 1664 कोरोनाबाधित रुग्ण

    शहरातील 24 हजार 745 पैकी 20हजार 584 जणांनी कोरोनावर केली आहे मात

    ग्रामीण भागातील 70 हजार 925 पैकी 57 हजार 825 जणांनी केली आहे कोरोनावर मात

  • 29 Apr 2021 08:37 AM (IST)

    काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु

    पुणे

    काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु

    राजीव सातव यांना कोरोनाची लागण, सातव यांची प्रकृती स्थिर

    मुंबईतील लिलावती हॉस्पिटल मधील डॉक्टरांची टीम पुण्यात सातव यांना तपासण्यासाठी येणार

  • 29 Apr 2021 08:30 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोरोना प्रतिबंधक लसीचे 35 हजार डोस येणार

    कोल्हापूर

    जिल्ह्यासाठी आज कोरोना प्रतिबंधक लसीचे 35 हजार डोस येणार

    दोन दिवसांपूर्वी आलेल्या हजार डोस मधील काही जवळपास 15 हजार डोस शिलक

    शिल्लक डोसच आज दुपारपर्यंत होणार वितरण

    मात्र नवे डोस आजच मिळणार असल्यानं लसीकरण ठप्प करण्याची वेळ येणार नाही

  • 29 Apr 2021 07:58 AM (IST)

    औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणीत लसींचा खडखडाट

    औरंगाबाद –

    मराठवाड्यात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा

    औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद आणि परभणीत लसींचा खडखडाट

    तर हिंगोली आणि नांदेड मध्ये किरकोळ लसींचा साठा उपलब्ध

    औरंगाबाद सह सहाही जिल्ह्यातील लसीकरण आज राहणार बंद

    येत्या दोन दिवसात लस उपलब्ध होण्याची शक्यता धूसर

    लस टंचाई मुळे मराठवाड्यात चिंतेचं वातावरण

  • 29 Apr 2021 07:41 AM (IST)

    नाशिक पालिकेने वाचवले रुगणांचे पावणे पाच कोटी रुपये, बिलांची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल

    नाशिक पालिकेने वाचवले रुगणांचे पावणे पाच कोटी रुपये

    बिलांची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल

    महापालिकेने लेखापरिक्षकां मार्फत कमी केले रुगणांचे बिल

    आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून 134 रुग्णालयांमध्ये लेखापरिक्षकांची नेमणूक

    20762 बिलांची आतावर्यंत झाली तपासणी

  • 29 Apr 2021 07:31 AM (IST)

    नागपुरात काही हॅास्पिटलकडून रुग्णांची लूट, माजी महापौर संदीप जोशी संतप्त

    – नागपुरात काही हॅास्पिटलकडून रुग्णांची लूट, माजी महापौर संदीप जोशी संतप्त

    – काही खाजगी हॅास्पीटलमध्ये घेतले जातात ४-५ लाख डिपॅाझीट

    – ‘रुग्णांची सूट थांबवा, अन्यथा रुग्णांसोबत आक्रमकपणे उतरू’

    – मनपाच्या ॲाडीटरवर माजी महापौर संदीप जोशींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

    – अतिरिक्त बिलाबाबत रुग्णांनी तक्रार करण्याचं संदीप जोशींचं आवाहन

  • 29 Apr 2021 07:30 AM (IST)

    लोणावळा परिसरात चेकपोस्टवर नागरिकांची केली जात आहे कोरोना अँटिजेन चाचणी

    पुणे –

    – लोणावळा परिसरात चेकपोस्टवर नागरिकांची केली जात आहे कोरोना अँटिजेन चाचणी

    – शहरातील कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरात येणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटीजेन चाचणी केली जात आहे

    – कुमार चौक व भांगरवाडी इंद्रायणी पूल यादरम्यान चेकपोस्ट नाके लावण्यात आले आहे

    – या केलेल्या चाचण्यांमध्ये ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे त्यांची कोविड सेंटर ला रवानगी करण्यात येत आहे

  • 29 Apr 2021 07:23 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढल्याने पुन्हा रुग्णसंख्येचा स्फोट

    नागपूर –

    – नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढल्याने पुन्हा रुग्णसंख्येचा स्फोट

    – जिल्हयात २४ तासांत २६५२६ चाचण्या, ७५०३ नवे रुग्ण

    – जिल्हयात २४ तासांत १०२ जणांचा कोरोना मुत्यू झाल्याने चिंता वाढली

    – लॅाकडाऊन नंतरंही नागपूरातील परिस्थिती सुधारेना

    – जिल्हयात २४ तासांत ६९३५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

  • 29 Apr 2021 06:45 AM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई, 1 कोटींची दारु जप्त

    रत्नागिरी –

    मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई

    कारवाईत राज्य उत्पादन शुल्काच्या हाती अवैध दारुचा मोठं घबाड

    तब्बल 1 कोटींची दारु जप्त

    90 हजार विदेशी मद्याच्या दारूच्या बाटल्या केल्या जप्त

    गोव्याहून मुंबईकडे कंटेनर मधून निघाला होता दारूसाठा

    लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

  • 29 Apr 2021 06:44 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 872 रुग्ण

    उस्मानाबाद :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 872 रुग्ण

    11 मृत्यू, तर 466 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 352 रुग्ण

    तुळजापूर 92 रुग्ण

    उमरगा 72 रुग्ण

    लोहारा 46 रुग्ण

    कळंब 123 रुग्ण

    वाशी 76 रुग्ण

    भूम 56 रुग्ण

    परंडा 55 रुग्ण

  • 29 Apr 2021 06:39 AM (IST)

    कडेगाव तालुक्यातील शिरसगावमध्ये एक महिन्यात तब्बल 136 जण कोरोना पॉझिटिव्ह

    सांगली –

    कडेगाव तालुक्यातील शिरसगावमध्ये एक महिन्यात तब्बल 136 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

    गावात वास्तुशांती च्या कार्यक्रमात आला पाहुणा

    तो पॉझिटिव्ह होता त्यामुळे वास्थुशांती असलेले कुटुंब झाले पोजिटिव्ह

    नंतर ते कुटुंब गावात अनेक ठिकाणी गेलेवर रुग्ण संख्येत झाली वाढ.

    गावात ऐका महिंनेयेत 136 जण पोजिटिव्ह

    31 मार्च ला झाला गावात वास्तुशांती चा कार्यक्रम

    सद्या 68 जण कोरोना मुक्त तर 75 अॅक्टिव्ह रुग्ण

    गावाला कोरोना चैन रोकन्येत आले यश

    गावात ग्रामपंचायत कडून नियमाचे होत आहे काटेकोरपणे पालन

  • 29 Apr 2021 06:36 AM (IST)

    पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागातील 58 वर्षीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनाने मृत्यू

    पुणे

    पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागातील 58 वर्षीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनाने मृत्यू

    बुधवारी उपचारादरम्यान झाला मृत्यू कोरोना संसर्गामुळे पोलीस दलातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली

    ऑनड्युटी असताना मोळे यांना 10 एप्रिलला कोरोनाची लागण

    त्यानंतर त्यांच्यावर खराडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते

    विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत

    यापूर्वी त्यांनी वारजे पोलीस ठाणे, स्पेशल ब्रँचमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते

  • 29 Apr 2021 06:36 AM (IST)

    पुणे महापालिकेने थेट कंपनीकडूनच मिळवले रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    पुणे

    महापालिकेने थेट कंपनीकडूनच मिळवले रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    पहिल्या टप्प्यात ८०० इंजेक्शन उपलब्ध तर पुढच्या टप्प्यात आणखी ३ हजार इंजेक्शन येणार

    महापालिकेच्या जम्बो, नायडू, दळवी, बाणेर, लायगुडे या रुग्णालयांमध्ये रोज किमान २०० रेमडेसिव्हिरची आवश्‍यकता

    जिल्हा प्रशासनाकडून इंजेक्शन न मिळत पालिकेने थेट कंपन्यांशी संपर्क साधून ८०० इंजेक्शन मिळवले

    महापालिका शहरातील कोरोना बाधितांना आवश्यक असल्यास मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचा निर्णय

    त्यासाठी २५ हजार इंजेक्शन मिळविण्यासाठी कंपन्यांशी चर्चा सुरू

    त्यासाठी कंपन्यांना आगाऊ पैसे देण्याचीही पालिकेची तयारी पूर्ण

    स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

  • 29 Apr 2021 06:35 AM (IST)

    पुणे जिल्ह्यासाठी सुमारे सात हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होणार

    पुणे

    आज पुणे जिल्ह्यासाठी सुमारे सात हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होणार

    जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती

    महापालिकेच्या रुग्णालयांसह इतर सरकारी रुग्णालयांना शासकीय स्तरावरून रेमडेसिव्हीर उपलब्ध होतायेत

    रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून केवळ खासगी रुग्णालयांनाच त्याचा पुरवठा

    तरीही जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच ससून रुग्णालयास सुमारे चार हजार रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाची माहिती