Corona Cases and Lockdown News LIVE : रश्मी ठाकरे नियमित तपासणीसाठी रिलायन्स रुग्णालयात

| Updated on: Mar 31, 2021 | 6:35 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : रश्मी ठाकरे नियमित तपासणीसाठी रिलायन्स रुग्णालयात
सांकेतिक फोटो
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Mar 2021 10:26 PM (IST)

    रश्मी ठाकरे नियमित तपासणीसाठी रिलायन्स रुग्णालयात

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे नियमित  तपासणीसाठी मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात पोहोचल्या.

    काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे कोरोना यांना कोरोना संसर्ग झाला होता.

  • 30 Mar 2021 08:34 PM (IST)

    परभणी जिल्ह्यात 379 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, दिवसभरात 9 जणांचा मृत्यू 

    परभणी कोरोना अपडेट

    मागील 24 तासांत 379 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

    आज उपचारादरम्यान 9 बांधितांचा मृत्यू

    आतापर्यंत 13 हजार 959 जणांना कोरोनाची लागण

    आतापर्यंत एकूण 408  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    जिल्ह्यात 2196 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू

    आज दिवसभरात 215 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज


  • 30 Mar 2021 08:30 PM (IST)

    गोंदियामध्ये दिवसभरात 27 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 27

    आज झालेले मृत्यू – 03

    आज बरे झालेले रुग्ण – 53

    तालुक्यानुसार रुग्णसंख्या

    गोंदिया—————18 रुग्ण

    तिरोडा—————01 रुग्ण

    गोरेगाव—————00 रुग्ण

    आमगाव————–02 रुग्ण

    सालेकसा————-00 रुग्ण

    देवरी——————00 रुग्ण

    सडक अर्जुनी ———–00 रुग्ण

    अर्जुनी मोरगाव——–05 रुग्ण

    इतर राज्य————–01 रुग्ण

    एकूण रुग्ण – 15944

    एकूण मृत्यू – 187

    एकूण बरे झालेले रुग्ण – 14936

    एकूण उपचार घेत असलेले रुग्ण – 655

  • 30 Mar 2021 08:28 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 3532 नवे कोरोना रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

    नाशिक कोरोना अपडेट

    नाशिकमध्ये दिवसभरात 2641 जण कोरोनामुसक्त

    दिवसभरात 3532 नवे कोरोनाग्रस्त आढळले

    नाशिक मनपा भागात- 2096 रुग्ण

    नाशिक ग्रामीण भागात- 1269 रुग्ण

    मालेगाव मनपा भागात – 0121 रुग्ण

    जिल्हा बाह्य – 0046 रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत 2374 जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात एकूण 23 बाधितांचा मृत्यू

    नाशिक मनपामध्ये- 10 जणांचा मृत्यू

    मालेगाव मनपामध्ये- 04 जणांचा मृत्यू

    नाशिक ग्रामीण भागात- 09 जणांचा मृत्यू

     

  • 30 Mar 2021 08:25 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 3226 नवे कोरोनाग्रस्त, एकूण 35 जणांचा मृत्यू

    पुणे :  दिवसभरात 3226 नवे कोरोनाग्रस्त आढळले

    – दिवसभरात 3268 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात  35 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू. 8 रूग्ण पुण्याबाहेरील

    – सध्या 725 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 264885 वर

    – पुण्यातील सध्या  32806 रुग्णांवर उपचार रुरु

    पुण्यात आतापर्यंत 5270 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    पुण्यात आतापर्यंत  226809 जण कोरोनामुक्त

  • 30 Mar 2021 08:18 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 1837 नवे रुग्ण, 13 जणांचा मृ्त्यू

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट

    दिवसभरातील नवे कोरोना रुग्ण -1837

    दिवसभरात 1420 जण कोरोनामुक्त

    दिवसभरात एकूण 13 जणांचा मृत्यू

    कोरोनाग्रस्तांचा आकडा 137850 वर

    आतापर्यंत एकूण 118912 जण कोरोनामुक्त

    मृतांचा आकडा पोहोचला 1988 वर

  • 30 Mar 2021 07:20 PM (IST)

    नांदेडमध्ये 24 तासांत 20 जणांचा मृत्यू, दिवसभरात 950 नवे कोरोनाग्रस्त

    नांदेड  कोरोना अपडेट

    24 तासांत 20 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण 770 जणांचा मृत्यू

    दिवसभरात 950  नवे कोरोना रुग्ण

    सध्या 9958 जणांवर उपचार सुरु

    165  रुग्णांची प्रकृती नाजूक

  • 30 Mar 2021 06:41 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 242 नवे रुग्ण

    जिल्ह्यात आज 342 जण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आज 02 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 31 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील 31 दिवसांत आढळले 7491 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 15867

    सध्या 2621 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

    आतापर्यंत 13058 जण कोरोनामुक्त

    वाशिममध्ये एकूण 187 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 30 Mar 2021 06:17 PM (IST)

    नागपुरात कोरोनामुळे दिवसभरात 50 जणांचा मृत्यू, 1156 नव्या रुग्णांची नोंद

    नागपुरात चौथ्या दिवशीसुद्धा मृतांचा आकडा 50 च्या पार

    आज नागपुरात कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू

    रुग्ण संख्या मात्र काहीशी कमी झाली

    आज 1156 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    दिवसभरात 1191 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 223153

    आतापर्यंत 179904 जण कोरोनामुक्त

    नागपुरात मृतांचा आकडा 5040 वर

  • 30 Mar 2021 05:03 PM (IST)

    ठाणे जिल्हयात कोरोनामुळे मृत्यूचा दर 2.6 टक्के

    ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सातत्याने वाढत आहे. एका दिवसात जिल्ह्यात 3 हजार 144 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 12 हजार 705 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 2 लाख 77 हजार 536 रुग्ण हे डिस्चार्ज झाले आहेत.सध्या 28 हजार 715 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत ठाण्यात 6 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यू दर 2.6 टक्क्यावर पोहोचला असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

  • 30 Mar 2021 03:36 PM (IST)

    काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण, ट्वीटरवरुन माहिती

    काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सचिन सावंत यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन सचिन सावंत यांनी केलं आहे. तसंच कोरोना नियम पाळा आणि सुरक्षित राहा, अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केली आहे.

     

  • 30 Mar 2021 02:58 PM (IST)

    मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक, मुंबईतील कोरोना परिस्थितीवर चर्चा

    मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील कोरोना परिस्थितीवर बैठक
    दुपारी 4 वाजता होणार बैठक
    बैठकीत महापौर तसेच महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थिती राहणार

  • 30 Mar 2021 02:57 PM (IST)

    लाॅकडाऊन लोकांच्या हातात, नियम पाळले तर लागू होणार नाही : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

    मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

    मुख्यमंत्री वारंवार विनंती करत आहेत
    बाहेर पडू नका, नियम पाळा
    पण कोण ऐकत नाही,
    पण अशीच परिस्थिती राहिली तर
    जे नियम रात्रीचे आहेत ते नियम सकाळी लावावे लागतील

    बेड खूप उपलब्ध आहेत, ८० टक्के खाजगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे

    झोपडपट्टी भागापेक्षा मोठ मोठ्या बिल्डिंगमध्ये कोरोनाची संख्या वाढत चालली आहे

    लोकांचा बिझनेस सांभाळायचा आहे त्याचबरोबर लोकांचा जीवही वाचवायचा आहे

    नियोजन कसं करायचं याबद्दल टास्क फोर्स काम करतंय

    लाॅकडाऊन लोकांच्या हातात आहे,

    लोकांनी नियम पाळले तर नाही होणार

    सकाळी किराना दुकान, माॅल्स, रेल्वे इ ठिकाणी काय व्यवस्था करावी यासाठी नियोजन सुरु आहे

    आम्ही लाॅकडाऊन काळात स्थलांतरीत लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती

    जॅम्बो कोव्हिड सेंटर सुरु करू शकतो

    सगळ्यांनी मिळूनच याबाबत काळजी घेतली पाहिजे.भाजप यावर नुसत राजकारण करत आहे. हा प्रश्न राजकीय नाही आहे

  • 30 Mar 2021 02:55 PM (IST)

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    निफाड तालुका कोरोना अपडेट
    30 मार्च 2021

    नविन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 51

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 186

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 6591

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 5154

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 1251

  • 30 Mar 2021 02:49 PM (IST)

    स्थिती आटोक्याबाहेर गेली तर लॉकडाऊन करावाच लागेल : मुंबई महापालिका आयुक्त

    जर लोकांनी व्यवस्थित नियम पाळले नाही. लोक असेच गर्दी करत राहिले. मास्कचा वापर केला नाही आणि गर्दी होत राहिली. मार्केटमध्ये शॉपिंग सेंटरमध्ये मग नाईलाजाने गव्हर्मेंटला विचार करावाच लागेल. आता लोकांच्या हातात आहे लॉकडाऊन होणार की नाही? आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत. ही स्थिती आटोक्याबाहेर गेली तर लॉकडाऊन करावाच लागेल, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची प्रतिक्रिया

  • 30 Mar 2021 12:31 PM (IST)

    स्थानिक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंढरपूरची पोटनिवडणूक लढवणार – चंद्रकांत पाटील

    चंद्रकांत पाटील –

    – स्थानिक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंढरपूरची पोटनिवडणूक लढवणार,

    – शरद पवार आणि अमित शहा भेटीची अफवा असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, मग त्यांनी अवस्थ होण्याचे कारण काय?

    – मात्र भेट झाली की नाही आणि भेटीत काय चर्चा झाली याला आम्ही दुजोरा देत नाही,

    – लॉकडाऊन लावण्याआधी सरकारने असंघटित कामगारांना मदत करावी,

  • 30 Mar 2021 11:43 AM (IST)

    येवल्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    येवला :- दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    आतापर्यंत ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील  एकूण कोरोना बधितांची संख्या १९७८ पोहचली

    कोरोनावर १५७५ जणांनी मात

    उर्वरित ३४० जण कोरोना उपचार घेत आहे

    गेल्या 3 दिवसात 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

  • 30 Mar 2021 10:23 AM (IST)

    कोरोनामुळे 19 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू, सोलापुरातील धक्कादायक घटना

    सोलापूर : कोरोनाने 19 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू, माढा तालुक्यातील तांबवे येथील घटना

    गरोदर महिला आजारी असल्यामुळे खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

    घरी आल्यावर सासू आढळल्या होत्या पॉजिटीव्ह

    त्यामुळे गरोदर महिलेला उपचारासाठी सिव्हीलला केले होते दाखल

    उपचारादरम्यान पोटातील बाळ मृत असल्याचे आढळले

    त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असताना झाला मृत्यू

    कोरोना महामारी सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ही दुसरी घटना

    गरोदर महिलेच्या मृत्यू, गुंतागुंत कशामुळे निर्माण झाली? याची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येणार

  • 30 Mar 2021 10:20 AM (IST)

    भिवंडीतील कोव्हिड सेंटर सज्ज, खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध

    भिवंडी

    भिवंडी पालिका कोरोना लढ्यासाठी पालिकेचे 115 O2 तर 18 ICU बेड चे कोव्हिडं सेंटर सज्ज

    तर खाजगी रुग्णालयात 392 बेड उपलब्ध त्यापैकी O2 – 53,ICU -22

    भिवंडी शहरात 90 तर ग्रामीण भागात 52 रुग्णांची 24 तासात वाढ ,एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचली 796 वर .

     

  • 30 Mar 2021 09:16 AM (IST)

    सांगलीत लॉकडॉऊन केल्यास व्यापारी आंदोलन करणार, व्यापारी ऐकता असोसिएशनचा इशारा

    सांगली –

    लॉकडॉऊन केल्यास व्यापारी तर्फे आंदोलन

    व्यापारी ऐकता असोसिएशनचे समीर शाह यांनी दिला इशारा

    व्यावसायची वेळ मर्यादित करा हवी तर जिल्हा बंदी करा पण लॉक डाऊन नको

    मुख्यमंत्री यांनी प्रशासनास लॉक डॉउनची तयारी करा आदेश दिलाने

    व्यापारींनी अदोलनाचा इशारा दिला आहे

  • 30 Mar 2021 07:55 AM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा वेग वाढला

    पुणे :

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा वेग वाढला

    कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

    जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आदेश

    या नियोजनात ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालये, खाटांचे नियोजन , गंभीर रुग्ण व त्यावरील उपचार, व्हेंटीलेटरवरील रुग्ण, ॲक्टिव्ह आणि त्यांच्यावरील उपचाराचे नियोजन आदी बाबींचा समावेश करण्याचे आदेश

    मायक्रो प्लॅनिंग करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यावर

    याशिवाय तालुकास्तरावर दररोज सायंकाळी सात वाजता तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेणे बंधनकारक

  • 30 Mar 2021 07:14 AM (IST)

    नवी मुंबईत 72 दिवसांमध्ये 87 हजार नागरिकांचे लसीकरण

    नवी मुंबईत 72 दिवसांमध्ये 87 हजार नागरिकांचे लसीकरण

    मनपा क्षेत्राची लोकसंख्या जवळपास 14 लाखावर

    नवी मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

    आतापर्यंत 87,730 जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, यामधील 18,912 जणांना दुसरा डोसही देण्यात आला

    16 जानेवारीपासून आतापर्यंत 23 हजार 65 आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली कोरोनाची लस

    पोलीस आणि इतर पहिल्या फळीतील 16,597 जणांनाही दिली लस

    ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याशी असणाऱ्या 48 हजार 68 जणांना दिली लस

    प्रत्येक नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी नागरिकांची मागणी

    सोबत लसीकरणाचा वेगही वाढवन्याची केली मागणी

    दररोज नवी मुंबईत वाढतेय कोरोना रुग्णांची आकडेवारी

  • 30 Mar 2021 07:04 AM (IST)

    खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेडवर ताबा मिळविण्याची पुणे महापालिकेची तयारी

    पुणे –

    खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेडवर ताबा मिळविण्याची पुणे महापालिकेची तयारी

    बेड न देणाऱ्या हॉस्पिटलचे परवाने रद्द करणार

    प्रत्येक रूग्णालयात महापालिकेचे अधिकारी नेमून रुग्णांच्या सोयीपुरते बेड ताब्यात घेतले जाणार

  • 30 Mar 2021 07:03 AM (IST)

    नाशकात गेल्या 24 तासात 2 हजार 847 नव्या रुग्णांची भर

    नाशिकमधील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढला

    नाशकात गेल्या 24 तासात 2 हजार 847 नव्या रुग्णांची भर

    2 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले

    नाशिकमध्ये आज दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    नव्या कोरोना रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात 1 हजार 658, नाशिक ग्रामीणमधील 981, मालेगाव महापालिका क्षेत्रात 175 तर नाशिक जिल्ह्याबाहेरील 33 नवे रुग्ण आढळले

  • 30 Mar 2021 07:00 AM (IST)

    नागपुरात गेल्या 24 तासात 3 हजार 177 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात गेल्या 24 तासात 3 हजार 177 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    2 हजार 600 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त

    दिवसभरात 55 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 997 वर पोहोचली

    1 लाख 78 हजार 713 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त

    नागपुरात आतापर्यंत 4 हजार 986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 30 Mar 2021 06:57 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 547 नवे कोरोनारुग्ण आढळले

    पुण्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 547 नवे कोरोनारुग्ण आढळले

    2 हजार 771 जणांचा डिस्चार्ज

    पुण्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू

    8 रुग्ण हे पुण्याबाहेरील

    पुण्यात सध्या 32 हजार 875 रुग्णांवर उपचार सुरु

    674 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं

  • 30 Mar 2021 06:49 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासात 5 हजार 888 नव्या रुग्णांची नोंद

    मुंबईत गेल्या 24 तासात 5 हजार 888 नव्या रुग्णांची नोंद

    तर 3 हजार 561 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त

    12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    मृतांपैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते

  • 30 Mar 2021 06:46 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद 

    राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद

    20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले

    दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

    राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 74 लाख 5 हजार 518  वर पोहोचली

    एकूण 54 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू