महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 113 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 1069 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 50257 जणांनी कोरोनावर मात केली आहे
सध्या 4351 रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात 411 जण कोरोनामुक्त झाले आहेत
पालघर :
जन्माला आल्यानंतर 12 तास झालेल्या नवजात बालकाला करोना झाल्याची पालघर जिल्ह्यातील पहिली केस समोर आली आहे
आईचं अँटिजेंट टेस्ट नेगिटिव्ह तर
बाळाचे अँटिजेंट टेस्ट पॉझिटिव्ह
बालकाची आई पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे
बालक मुलीला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येत आहे
तिसऱ्या लाटेत बालकाला करोना झाल्याची ही पहिलीच केस असल्याचे चिन्ह
नवजात मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरमार्फत सांगण्यात येत आहे
सफाळे येथील टेकरीचा पाडा येथील रहिवासी,
नंदुरबार : राज्य शासनाच्या निर्देशनुसार संचारबंदी कालावधित 15 जून 2021 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांसहित इतर आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
नव्या नियमानुसार जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद राहतील. अत्यावश्यक सेवा आणि पुरवठा आस्थापना हे पुर्ण वेळ सुरू राहतील. यामध्ये वैद्यकीय सेवा, औषधे, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दूध विक्रेता व वृत्तपत्र छपाई तसेच वितरण, कृषी अवजारे व कृषी उत्पादने यांच्याशी संबंधित असलेली दुकाने व आस्थापना खते, बि-बियाणे, इलेक्ट्रीक मोटार/ट्रॅक्टर यांची खरेदी व दुरूस्ती करणाऱ्या आस्थापनांचा समावेश असेल.
अकोला : अकोल्यात दुकाने,आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सुरु राहणार
शनिवार आणि रविवार संपूर्ण बंद
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आदेश
राज्यातील काही शहरांमधील पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आल्याने महाराष्ट्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार या शहरांमध्ये दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, गोंदिया जिल्हा, लातूर, पुणे, वर्धा जिल्हा, नागपूर यांचा समावेश आहे.
सांगली कोरोना / म्युकर अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 981 कोरोना रुग्ण
म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 169, आज आढळलेले रुग्ण 9
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 23 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3424 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 11933 वर
तर उपचार घेणारे 1130जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 103010 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 118367 वर
वाशिम :
वाशिम जिल्ह्यात संचारबंदीची सुधारित नियमावलीत निर्बंध शिथिल
सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मंगल कार्यालये, शाळा, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद
उस्मानाबाद – जिल्ह्यात आता फक्त दर रविवारी जनता कर्फ्यू
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आदेश
यापूर्वी दर शनिवारी व रविवारी सलग 2 दिवस होता वीक एन्ड जनता कर्फ्यू
नाशिक :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 890
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 396
नाशिक मनपा- 168
नाशिक ग्रामीण- 216
मालेगाव मनपा- 07
जिल्हा बाह्य- 05
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4724
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -58
नाशिक मनपा- 20
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 36
जिल्हा बाह्य- 00
पुणे : पुण्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकान सुरू राहणार, सोमवारी ते शुक्रवार पर्यंत दुकान सुरू राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
कोरोना रुग्ण शंभरावर आल्याने नांदेडकरांना दिलासा, सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, नांदेडमध्ये आता कोरोनाचे रोज शंभर ते दीडशे आढळतायत रुग्ण, पॉझिटिव्ह रेट कमी आल्याने मॉल वगळता सर्व दुकाने उघडण्यास मुभा.
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी
आज शहरात फक्त १८० कोरोनाबधित रुग्ण आढळले
गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी
दिवसभरात ७५१ जण कोरोनामुक्त तर २४ जण मृत्यू
शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांवर
शहरात एकूण ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबधित रुग्ण
दिवसभरात १८० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७५१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
– ८४४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९९२७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६०२०.
– एकूण मृत्यू -८२५६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५५६५१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४४३९.
वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने आता कॅम्प लावून अँटिजेन टेस्ट करायला सुरुवात केली आहे. आज वसई पश्चिम स्टेशन परिसरात दोन कॅम्प लावून परिसरातील फेरीवाल्याची कोव्हिडं अँटिजेन टेस्ट केल्या आहेत. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दोन कॅम्प मध्ये 184 जणांच्या टेस्ट केल्या असून यात 3 फेरीवाले पॉझिटिव्ह आले आहेत. तर 181 जण निगेटिव्ह आले आहेत.
नागपूर –
नागपूरला आज मोठा दिलासा , मृत्यू संख्या झाली कमी
आज नागपुरात कोरोना मुळे 10 जणांचा मृत्यू
319 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद
तर 829 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 474605
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 459442
एकूण मृत्यू संख्या – 8902
सांगली : आटपाडीमधील पाच तरुणांनी केले तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार.या तरुणानी जीवाची परवा न करता सामाजिक बांधिलकी जपत अंत्यसंस्कार करून माणुसकी जिवंत ठेवली.
राजस्थानमध्ये 500 कोरोना लसीचा वायल कचऱ्यात सापडल्या
राजस्थानमधील 35 केंद्रावरील प्रकार आला समोर
दैनिक भास्कर आँनलाईन वेबपोर्टलचा दावा
या प्रकरणी राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाकडून चौकशीचे आदेश
जालना येथे आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 20 अॅम्ब्युलन्सचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी राजेश टोपे यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यास ‘वन नेशन वन प्राईस’ होऊ शकते. राजेश टोपे म्हणाले, लसीकरण हे केंद्र सरकारच्या नियमानुसार चालते आणि जी लस उत्पादक कंपन्यांची 50 टक्के लास केंद्र सरकारला दिली पाहिजे 25 टक्के लस सर्वच राज्य सरकारला दिली पाहिजे आणि उर्वरित लस खाजगी रुग्णालयाला दिली जाते. यात खाजगी रुग्णालय बुकिंग केलेल्या लस जास्त किंमतीने देत असतील तर काही हॉटेलमध्येही पॅकेज तयार करण्यात आले आहेत. याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि हे काही योग्य नाही. सुप्रीम कोर्टाचा वन नेशन वन प्राईस असा निकाल अपेक्षित आहे आणि त्यामुळे लसीच्या किमती बाबत पडदा पडेल.
मुंबईला दिलासा देणारी बातमी
धारावीत आज कोरोनाचे 2 रूग्ण
आज दादरमध्ये 10 कोरोना रूग्ण
आज माहिममध्ये 15 कोरोना रूग्ण
पुणे महापालिकेला सिरम इन्स्टिट्यूट लस द्यायला तयार मात्र केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही ?
काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींचा भाजपला सवाल,
पुण्याच्या राजकारणात दोन गट पडलेत, एक देवेंद्र फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील तर दूसरा गिरीश बापटांचा एक गट,
त्यामुळे गिरीश बापट दिल्ली दरबारी प्रयत्न करत नसल्याची मोहन जोशींची टीका,
तर दिल्लीत गिरीश बापटांची दिल्लीत पत उरली नाही असा प्रश्न निर्माण झालाय ,
केंद्राची परवानगी मिळायला भाजपचा अंतर्गत कलह कारणीभूत ठरतोय,
पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका, केंद्रातून परवानगी मिळवा मोहन जोशींचा भाजपला टोला
अहमदनगर
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर त्यात 8881 मुले 18 वयोगटातील आत
लहान मुलांमध्ये वाढत आहे कोरोनाचा प्रमाण…
मे महिन्यात जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी…
जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्स ची केली निर्मिती याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित मुलांसाठी स्पेशल वर्ड तयार करन्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना..
नाशिक -जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बोलावली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक
बैठकीत नाशिक मध्ये काय शिथिल करणार यावर होणार निर्णय
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10 च्या खाली असल्याने नागरिकांना मिळणार काही अंशी दिलासा
आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष
सांगली –
ताकारी योजना पूर्णत्वाच्या मार्गावर
आतापर्यंत 870 कोटी निधी खर्च
उर्वरित कामासाठी आणखी 200 कोटी रुपयांची गरज
गेली 30 वर्षाहून अधिक काळ रखडलेली पाणी योजना
बहुतांश कामे पूर्ण त्यामुळे योजना पूर्णत्व च्या उंबरठ्यावर
आता पर्येंत 16 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
नागपूर ब्रेकिंग
दिव्यांगसाठी लसीकरण आज पासून यशवंत स्टेडियम येथे
दिव्यांग व्यक्ती साठी विशेष व्यवस्था
45 वर्षा वरील दिव्यांगसाठी नागपूर महानगरपालिका आणि CRC तर्फे लसीकरण
आज पासून होणार सुरवात ,दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचं करण्यात आलं आवाहन
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 52 हजार 734 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 3 हजार 128 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 2 लाख 38 हजार 22 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
India reports 1,52,734 new #COVID19 cases, 2,38,022 discharges & 3,128 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,80,47,534
Total discharges: 2,56,92,342
Death toll: 3,29,100
Active cases: 20,26,092Total vaccination: 21,31,54,129 pic.twitter.com/FVhbrhYMgY
— ANI (@ANI) May 31, 2021
– पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन,
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन,
– हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची संकल्पना,
– मुंबई नंतर पुण्यात दुसरं ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन
वर्धा
– जिल्ह्यात 2,18,980 व्यक्तींना पहिला तर 54,898 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस
– लसीचा मुबलक साठा नसल्याने 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक
– 45 वयोगटावरील नागरिकांचे सुरू आहे लसीकरण
– 16 जानेवारीपासून सुरू झाले होते जिल्ह्यात लसीकरण
– नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद
– विदर्भात कोरोना मृत्यू आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा
– गेल्या २४ तासांत विदर्भात ५२ मृत्यू तर २१४२ कोरोना रुग्णांची भर
– बऱ्याच आठवड्यानंतर विदर्भातील मृत्यूसंख्या ५० च्या टप्प्यात
– नागपूर जिल्ह्यात २४ तासांत १३ मृत्यू, ३५७ नवे कोरोना रुग्ण
– रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा
पुणे –
– शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार,
– शहरात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 16 मार्च पासून 27 मेपर्यंत 9 लाख 95 हजार 357 लसींचे डोस देण्यात आले आहेत.
– यामध्ये 2 लाख 54 हजार 693 जणांचे दोन्ही डोस पुर्ण झाले असून 7 लाख 40 हजार 682 जणांचा पहिला डोस दिला आहे,
– दरम्यान पहिला डोस घेतलेल्यांमध्ये 35 हजार नागरिक 18 ते 44 वयोगटातील,
– शहरात करोना लसीकरणाची एकूण 217 केंद्र असून त्यात, 130 शासकीय, 76 खासगी केंद्र आहेत
– महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती.
पुणे
पुण्यात आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या साडे सात लाख पुणेकरांवर कारवाई,
कारवाईत पुणे पोलिसांनी 32 कोटी 22 लाख रुपयांचा दंड केला वसूल,
विनामास्क फिरणाऱ्या पुणेकराकडून 500 रुपयांचा दंड केला जातोय वसूल स
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात आतापर्यंत ही कारवाई करण्यात आलीये,
पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे मनपा आणि पुणे पोलिसांनी 22 कोटीचा दंड वसूल केलाय
पुणे –
– शहरातील 15 लसीकरण केंद्रांवर आज दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे,
– ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ३ मे पूर्वी घेतला आहे. अशा नागरिकांना १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़,
– शहरातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय महापालिकेच्या एका केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आलेत
– दरम्यान राज्य सरकारकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध न झाल्याने, आज शहरात महापालिकेच्या कोणत्याही केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार नाही,
– त्यामुळे राज्य सरकारकडून उपलब्ध होईल त्यानुसार महापालिकांना लसीचे डोस वितरित केले जात आहेत.
– नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती संथच
– संपूर्ण जिल्ह्यात काल 1209 जणांचं लसीकरण
– काल दिवसभरात शहरात 999 तर ग्रामीणमध्ये 210 जणांनी घेतली लस
– लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण संथ गतीने
– संथ लसीकरणामुळे 100 टक्के उद्दीष्ट कधी साध्य होणार
पुणे –
– पुणे शहरातील निर्बध काही प्रमाणात शिथिल होणार,
– अत्यावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेपर्यंत उघडी ठेवण्याबरोबरच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता,
– पुणे महापालिका ह्ददीतील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यानुसार हे निर्बध कमी होणार,
– जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा गेल्या आठवड्यातील दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आणी एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील त्याठिकाणीचे निर्बध कमी करण्याचा निर्णय,
– या निर्णयाचा फायदा पुणे शहराला मिळणार आहे
पुणे –
– जिल्ह्यात लहान मुलांसाठी तब्बल 7 हजार 939 बेड्स तयार,
– कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला,
– आतापर्यंत जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात केवळ लहान मुलांसाठी तब्बल ७ हजार ९३९ बेडची तयारी करून ठेवली आहे,
– यामध्ये ५२८ आयसीयू बेड असून १८३ व्हेंटिलेटर्स बेडचा समावेश आहे,
– पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सरकारी आणि खासगी हाॅस्पिटलमध्ये देखील लहान मुलांच्या उपचारांची सर्व तयारी सुरू आहे.
– यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्ससह आवश्यक डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती देखील करण्यात येत आहे.