Maharashtra Coronavirus LIVE Update : आज नाशकात 165 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 166 जणांना डिस्चार्ज

| Updated on: Jul 10, 2021 | 6:46 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  |

Maharashtra Coronavirus LIVE Update : आज नाशकात 165 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 166 जणांना डिस्चार्ज
corona virus
Follow us on

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 09 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jul 2021 09:02 PM (IST)

    अंबरानथ-बदलापुरात शनिवारी, रविवारी लसीकरण बंद

    अंबरनाथ आणि बदलापुरात उद्या लसीकरण बंद राहणार

    शासनाकडून आजही लसी न मिळाल्याने उद्या लसीकरण बंद राहणार

    रविवारी लसीकरणाला सुट्टी असते, त्यामुळे आता थेट सोमवारी लसीकरण सुरू होणार

  • 09 Jul 2021 08:44 PM (IST)

    अकोल्यात आज 6 कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

    अकोल्यात आज 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
    आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56,499 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 43 रुग्ण उपचार घेत आहेत.
    आज दिवसभरात 69 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


  • 09 Jul 2021 07:26 PM (IST)

    आज नाशकात 165 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 166 जणांना डिस्चार्ज

    आज नाशकातील पूर्ण बरे झालेले रुग्ण- 166

    पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 165

    नाशिक मनपा – 073
    नाशिक ग्रामीण – 072
    मालेगाव मनपा – 008
    जिल्हा बाह्य – 012

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8,420

    आजचे मृत्यू :- 07
    नाशिक मनपा – 02
    मालेगाव मनपा – 00
    नाशिक ग्रामीण – 05
    जिल्हा बाह्य – 00

  • 09 Jul 2021 06:09 PM (IST)

    लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    – कोरोना आढावा बैठक पार पाडली
    -उद्या लस येण्याची शक्यता, केंद्राकडून जेवढा लसींचा पुरवठा झाला पाहिजे तसा होत नाहीय
    – लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले
    – मुलांसाठी बेडसची उपलब्धता करण्यात आलीय

    – 607 रुग्ण म्युकरमायकोसिस आहेत,

    – ज्यांच्या लसींचा दोन्ही डोस घेतलेत ते मास्क घालत नाही,

    – माझी विनंती आहे, निष्काळजीपणा करू नका मास्क वापरा,

    – पुण्याचा मृत्यूदर 1.6 टक्के आहे, त्यामध्ये ससूनमध्ये जास्त आहे

    – 4 नंतर सरसकट बंद झाले पाहिजे, पोलिसांना आदेश

    – ऑक्सिजन वाढवला आहे,

    – हेच निर्बंध कायम असणार आहेत

  • 09 Jul 2021 11:45 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 393 नवे कोरोना रुग्ण, 911 जणांचा मृत्यू

    दिल्ली –

    देशात 24 तासात नवे रूग्ण – 43,393

    देशात 24 तासात मृत्यू – 911

    देशात 24 तासात डीस्चार्ज – 44,459

    एकूण रूग्ण – 3,07,52,950

    एकूण मृत्यू – 4,05,939

    एकूण डीस्चार्ज – 2,98,88,284

    एकूण एक्टीव्ह रूग्ण – 4,58,727

    एकूण लसीकरण – 36,89,91,222

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  • 09 Jul 2021 09:46 AM (IST)

    सोलापुरात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु होणार

    सोलापूर –

    678 गावातील माध्यमिक शाळा सुरु होणार

    आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु होणार

    कोव्हिडमुक्त  ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

    जिल्ह्यातील 678 गावे महिनाभरापासून कोरोनामुक्त

    त्यामुळे या गावातील 861 शाळांची घंटा 15 जुलैपासून वाजणार

    मात्र  शहरातील  शाळा सुरु करण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

  • 09 Jul 2021 09:40 AM (IST)

    सोलापुरात शहरात बुधवारपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम ठप्प

    सोलापूर –

    शहरात बुधवारपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम ठप्प

    लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प

    पालिकेच्या 34 लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहीम तीन दिवसांपासून ठप्प

    लसीकरण मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद

    मात्र वारंवार लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम होत आहे खंडित

  • 09 Jul 2021 09:05 AM (IST)

    नाशकात शासकीय रुग्णालयांमध्ये बालकांसाठी 300 खाटा

    नाशिक – शासकीय रुग्णालयांमध्ये बालकांसाठी 300 खाटा

    तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी

    जिल्ह्यासह शहरात देखील रुग्णालयांना सूचना

    बालरोग तज्ञाना देखील प्रशासनाच्या सूचना

    शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये 600 बेड आरक्षित

  • 09 Jul 2021 08:28 AM (IST)

    कोरोनानंतर नागपूर जिल्ह्यात आता डेंग्यूचा उद्रेक

    – कोरोनानंतर नागपूर जिल्ह्यात आता डेंग्यूचा उद्रेक

    – जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत १८९ डेंग्यूचे रुग्ण

    – नागपूर शहरात सात दिवसांत १४४ तर ग्रामीणमध्ये ४५ रुग्ण

    – जिल्हयात पावसामुळे वाढली डासांची संख्या

    – किटकनाशकांची फवारणी होत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी

    – कोरोनामुळे इतर संभाव्य आजारांकडे दुर्लक्ष झाल्याची नागरीकांची भावना

  • 09 Jul 2021 07:56 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 वरून आला 12 टक्‍क्‍यांवर

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा

    जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 वरून आला 12 टक्‍क्‍यांवर

    चाचण्या वाढवून हे रुग्ण संख्येत वाढ नसल्याचं दिलासादायक चित्र

    गृहविलगीकरण प्रमाण कमी केल्याचाही परिणाम

    जिल्ह्यातील 127 गावे ही झाली कोरोनामुक्त

  • 09 Jul 2021 06:50 AM (IST)

    कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा मीरा भाईंदर पालिकेकडून सत्कार

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांच अंत्यसंस्कार करणारे कोरोना योद्धाचं पालिकेकडून सत्कार करण्यात आला

    या कार्यक्रमात मनपा महापौर ज्योत्स्ना हसनाळे ,आयुक्त दिलीप ढोले सहित अनेक जण उपस्थित होते

    गेल्यावर्षांपासून देशात कोरोनाचा संकट आहे

    कोरोना आजारामुळे अनेक रुग्णनं मृत्युमुखी पडले असे मृत रुग्णांजवळ कोणी जायला तयार नव्हते, तेव्हा यांनी मृत रुग्णांवर आपल्या जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार केला

    मीरा भाईंदर महानगरपालिकेत काम करणाऱ्या अशा कोरोना योद्ध्यांचा पालिकेकडून सत्कार करण्यात आला

  • 09 Jul 2021 06:47 AM (IST)

    अंबरनाथ आणि बदलापूर शहरात आज लसीकरण बंद राहणार

    अंबरनाथ :

    अंबरनाथ आणि बदलापूर शहरात आज लसीकरण बंद राहणार

    लसींचा पुरवठा न झाल्यामुळे आज लसीकरण बंद

    नियमितपणे लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे