कोरोनाचा भयंकर वास्तव, 12 हजार लेकरांनी पालक गमावले, 401 लेकरांनी माय-बाप, सरकार काय करणार?

| Updated on: Jun 29, 2021 | 5:12 PM

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी प्रोजेक्ट मुंबई आणि इंडियन सायक्ट्रिक सोसायटी यांचा राज्य सरकारसोबत करार झालाय. या सगळ्या बालकांचा पुढील 3 वर्षाच्या शिक्षणाचा खर्च या संस्था करत असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सांगितलं

कोरोनाचा भयंकर वास्तव, 12 हजार लेकरांनी पालक गमावले, 401 लेकरांनी माय-बाप, सरकार काय करणार?
यशोमती ठाकूर
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळच्या लोकांना गमावलं. अनेक लहानग्यांचं छत्र हरपलं. कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी प्रोजेक्ट मुंबई आणि इंडियन सायक्ट्रिक सोसायटी यांचा राज्य सरकारसोबत करार झालाय. या सगळ्या बालकांचा पुढील 3 वर्षाच्या शिक्षणाचा खर्च या संस्था करत असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सांगितलं. (Project Mumbai and Indian Psychiatric Society’s agreement with the state government for Corona Orphans)

कोरोना काळात आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांच्या 3 वर्षाच्या शिक्षणाचा खर्च आता सरकार आणि या संस्थांद्वारे केला जाणार आहे. तसंच त्यांना मानसिक आधार देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिलीय. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना टेक्नॉलॉजीचीही मदत सरकारकडून केली जाणार आहे. त्याच सायकल, मोबाईल, लॅपटॉप अशा साहित्याचा समावेश असेल. या मुलांना मानसिक आधार देण्यासाठी ऑनलाईन संपर्क साधत असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिलीय. त्याचबरोबर या मुलांना पुढे देखील टप्प्या टप्प्याने मदत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी हेल्पलाईन नंबर

राज्यात कोरोनामुळे 1 पालक गमावलेल्या मुलांची संख्या तब्बल 12 हजार झाली आहे. तर दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या 401 आहे. या बालकांसाठी राज्य सरकारकडून एक हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे. तो हेल्पलाईन नंबर 18001024040 असा आहे.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना अर्थसहाय्य

कोरोनाच्या संकटात अनेक लहानग्यांच्या डोक्यावर छत्र हरपलं. अनेक मुलं अनाथ झाली. या मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सरकारकडून कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे राज्य सरकारकडून 5 लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येणार आहे. या मुलांना ही मदत 21 व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अनाथ झालेल्या मुलांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्या कोरोनामुळे 5 हजार 172 मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावलं आहे. तर 162 मुलांचे आई आणि वडिल अशा दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मुलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. या ही मुलं 21 वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. त्यामुळे शिक्षण आणि उद्योग-व्यवसायासाठी या मुलांना थोडी आर्थिक मदत मिळेल.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये: सुप्रिया सुळे

Video: वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!

Project Mumbai and Indian Psychiatric Society’s agreement with the state government for Corona Orphans