मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona Update) डोकं वर काढल्याने पुन्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आजची कोरोनाची आकडेवारी (Today Corona Update)ही आणकी टेन्शन वाढवणारी आहे. आज राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत 1765 नवे कोरोना रुग्ण (Mumbai Corona Update) आढळून आल्याने पुन्हा प्रशासनाला धडकी भरली आहे. आता निर्बंध टाळायचे असतील तर नियम पाळल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती पुन्हा निर्माण होतोना दिसत आहे. तर मुंबईसह उपनगरांचाही धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या घटल्याने थोडा दिलासा मिळाला होता. दोन वर्षांनंतर लोकांच्या तोंडावरचे मास्क उतरवण्याची मुभा मिळाली होती. पुन्हा जग मोकळा श्वास घेऊ लागलं होतं. मात्र आता पुन्हा मास्क सक्तीही होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही काही नेत्यांकडून देण्यात आले आहेत. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मत्ृयचूी नोंद झालेली नाही, ही थोडी दिलासादायक बाब आहे.
‘Stranger Things’ & Covid Cases are back, and you shouldn’t leave your house without wearing a mask.#SayNoToCorona pic.twitter.com/si0kLJEXBt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 8, 2022
नव्या कोरोना रुग्णात सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. एकट्या मुंबईतच साडे सतराशेपेक्षाही जास्त रुग्ण वाढल्याने पुन्हा मुंबई महाविकास आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. तिसऱ्या लाटेवेळीही मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ सुरूवातीला अशीच होती. मात्र काही दिवसातच मुंबई महापालिकेने या रुग्णवाढीला यशस्वीरित्या लगाम लावला होता. त्यामुळे तिसरी लाट फार काही नुकसान करू शकली नाही. तसेच कोरोनाकाळातल्या गाजलेल्या मुंबई पॅटर्नला पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात सर्व सुरळीत झाल्याने पुन्हा सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढली आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. कल्याण डोंबवली महापालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 30 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता आत्तापर्यंत 119 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे उपनगरेही सध्या अलर्ट मोडवर आहेत.