वर्धा : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारनं पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्याचा निर्णय़ घेतला आहे. स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार वर्धा जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सर्व कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना आता RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.(RTPCR test mandatory for participation in all events in Wardha district)
वर्धा जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता एखाद्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलन, सामूहिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना RTPCR चाचणी करावी लागणार आहे. कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांची RTPCR चाचणी झाली आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच कार्यक्रमास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.
वर्धा जिल्ह्यात बुधवारी 24 तासांत 174 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात सातत्याने रुग्णवाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 756 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 351 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 109 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात एकच खळबळ उडाली होती. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं. या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवतण्यात आले आलं होतं. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले.
हिंगणघाट शहराच्या सातेफळमधील एका खासगी संस्थेचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. सुरुवातीला वसतिगृहातील 39 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 30 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये आणखी 45 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं होतं.
‘मास्क लावून काळजी घ्या’, राज ठाकरेंचं नाव घेता अजित पवारांचा टोलाhttps://t.co/bohNIZtBaN@AjitPawarSpeaks @RajThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या :
‘मास्क लावून काळजी घ्या’, राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा टोला
‘अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवा नाहीतर रस्त्यावर उतरु’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा
RTPCR test mandatory for participation in all events in Wardha district