‘जगात जर्मनी भारतात परभणी’… जिल्ह्याच्या भूमिपुत्राकडून भारतातील दोन लसींना परवानगी

| Updated on: Jan 03, 2021 | 10:27 PM

परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्र वेणूगोपाळ सोमानी यांनी आपल्या देशातील दोन कोरोना लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली.

जगात जर्मनी भारतात परभणी... जिल्ह्याच्या भूमिपुत्राकडून भारतातील दोन लसींना परवानगी
Follow us on

परभणी :  जगात जर्मनी भारतात परभणी ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवासियांना आला. परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने आपल्या देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. घोषणा करणारे वेणूगोपाळ सोमानी (Venugopal Somani) हे मूळचे परभणीचे असून सध्या ते DCGI चे संचालक म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. (Corona vaccine announced by Venugopal Somani From Parbhani)

वेणूगोपाळ याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही परभणी जिल्ह्यात झालं आहे. पुढे त्यांचं उच्च शिक्षण M.Pharm आणि Ph.D नागपूर विद्यापीठातून केलं. काही कालावधीनंतर Central Drugs Standard Control Organisation सोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून सुरु झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे जो DCGI (Drugs Controller General of India) पदापर्यंत पोहोचलाय.

डॉ. व्ही. जे सोमानी यांनी मुंबई, अहमदाबाद, कोलकता, दिल्ली अशा ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर यशस्वी कामगिरी बजावली आहे. संपूर्ण देश ज्या कोरोना लसीच्या प्रतिक्षेत होता ती आज पूर्ण झालीय. वेणुगोपाल यांनी केलेल्या कार्याचा जिल्हावासियांना अभिमान वाटतो आहे.

आमच्या मुलाचा आम्हाला आनंद वाटतो आहे. खेडेगावात काही सुविधा उपलब्ध नसताना ही तो पुढे गेला. लहानपणापासून वेणूगोपाल धाडसी आणि हुशार होता. दरवर्षी त्याला स्कॉलरशिप मिळत होती. त्यातून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आज त्याने मोठी गगनभरारी घेऊन संपूर्ण देश ज्या कोरोना लसीच्या प्रतिक्षेत होता त्या लसीला आज परवानगी देऊन स्वत:चं, आमचं, गावाचं आणि देशाचं नाव उज्वल केलं, अशा भावना त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या.

कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लसीला परवानगी

भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय) कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज डीसीजीआयची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला या तिन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आठवडाभरातच फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस टोचली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे ही वाचा

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी