उस्मानाबाद: ‘बस नाम हि काफी है’, ‘नावात सर्व काही आहे’, असे डायलॉग्ज आपण अनेकदा ऐकतो. काळानुरुप बाळांचे नामकरण (Baby name) आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे केले जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. (Couple in Osmanabad Maharashtra keep their child name as Rashtrapati)
ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन नाव ठेवले जाते. देव – देवतांचे नाव ठेवण्याची प्रथा अजुनही आहे, अलीकडच्या काळात मात्र राजकीय,चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील बी. कॉम., डी.एड. झालेले दत्ता चौधरी सुशिक्षित बेरोजगार आहेत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा पैसे नसल्याने गावातच शिकवणी वर्ग सुरू केले. दत्ता चौधरी आणि कविता चौधरी यांना १९ जून २०२० रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला.
तेव्हापासून कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. नुकतेच या मुलाचे बारसे झाले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाचे नाव चक्क राष्ट्रपती असे ठेवले. जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतुन राष्ट्रपती दत्ता चौधरी या नावाने जन्म प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर नुकतेच या नावाचे आधारकार्डही काढून घेतले आहे.
राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबातही राष्ट्रपती असावा अशी संकल्पना असावी म्हणूनच मुलाचे नामकरण राष्ट्रपती केले. मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवल्याने भविष्यात त्यांचा मुलगा राष्ट्रपती होईल असा विश्वास त्याचा वडिलांना वाटतो. तर येत्या काळात दुसरं अपत्य झाल्यास त्याचे नाव प्रधानमंत्री ठेवण्याचा संकल्प दत्ता चौधरी यांनी केला आहे.
इतर बातम्या:
काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, मुलाचं नाव ठेवलं काँग्रेस
ढाण्या वाघाच्या सुटकेवेळी नगरमध्ये मुलाचा जन्म, नाव ठेवलं – ‘अभिनंदन’
एअरस्ट्राईक दरम्यान मुलाचा जन्म, नाव ठेवलं ‘मिराज सिंह’
(Couple in Osmanabad Maharashtra keep their child name as Rashtrapati)