बुलढाणा: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक रुग्णालयांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामध्ये आता बुलढाण्यातील कोव्हिड रुग्णालयाची (Covid 19) भर पडली आहे. या रुग्णालयात कोरोना झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार करण्यासाठी चक्क मुदत उलटून गेलेली (एक्स्पायर) औषधे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Covid centre in Buldhana Maharashtra using expired insulin injection for treatment)
दिगंबर कन्हैयालाल कपाटे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दिगंबर कपाट हे बुलडाण्याच्या धाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. साधारण महिनाभरापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती.
तेव्हा कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना उपचारासाठी बुलडाण्याच्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले. कपाटे यांना मधुमेहाची व्याधी असल्याने त्यांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत असे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रात्रीच्यावेळी इन्सुलिन देण्यात आले. मात्र, इन्सुलिनच्या बाटलीवर पाहिले असता त्याची एक्स्पायरी डेट उलटून गेली होती. दिगंबर कपाटे यांनी ही गोष्ट डॉक्टरांच्या कानावर घातली. परंतु, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
अखेर कोरोनातून बरे होऊन घरी परतल्यानंतर दिगंबर कपाटे यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा सगळा प्रकार समोर आणला. यामध्ये त्यांनी एक्स्पायर झालेली इन्सुलिन वापरणाऱ्या रुग्णालयावर टीका केली. सध्या कपाटे यांची प्रकृती चांगली असून ते पुन्हा पोलीस ड्युटीवर रुजू झाले आहेत. मात्र, या सगळ्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
लॉकडाऊन हा मुख्यमंत्र्यांनाच काय राज्यातील कोणत्याही व्यक्तीला नकोच आहे. मात्र, तशी वेळ आल्यास लॉकडाऊनचा (Lockdown) पर्याय वापरावा लागतो. कारण, माणसाच्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नसते, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. (Rajesh Tope important statement on Lockdown in Maharashtra)
राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेळ पडल्यास लॉकडाऊनचा पर्याय नाईलाजाने का होईना पण अंमलात आणावा लागेल, असे संकेत दिले. लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
माणसाच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर राजेश टोपेंची ‘सीधी बात’
Covid centre in Buldhana Maharashtra using expired insulin injection for treatment)