Dasara Melava 2024 LIVE : मुंडेसाहेबांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवला- पंकजा मुंडे

| Updated on: Oct 12, 2024 | 2:45 PM

Dasara Melava 2024 : आज राज्यात दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. दसरा मेळाव्यातील महत्वाचे मुद्दे या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. यासह इतरही घडामोडी या ब्लॉगमध्ये तुम्ही दिवस भर वाचू शकता...

Dasara Melava 2024 LIVE : मुंडेसाहेबांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवला- पंकजा मुंडे
महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Oct 2024 02:45 PM (IST)

    मी राजकारणात चिटकून बसण्यासाठी नाही- पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी राजकारणात चिटकून बसण्यासाठी अजिबात नाहीये.

  • 12 Oct 2024 02:43 PM (IST)

    मी राज्यभरात दाैरा करणार- पंकजा मुंडे

    नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, मी राज्यभरात दाैरा करणार आहे.


  • 12 Oct 2024 02:41 PM (IST)

    मुंडेसाहेबांनी तुमची जबाबदारी मला दिलीये- पंकजा मुंडे

    दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मुंडेसाहेबांनी तुमची जबाबदारी मला दिलीये…

  • 12 Oct 2024 02:40 PM (IST)

    मी कोणाला घाबरत नाही- पंकजा मुंडे

    मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी कोणालाही घाबरत नाही.

  • 12 Oct 2024 02:38 PM (IST)

    आपल्याला आपला डाव खेळायचाय- पंकजा मुंडे

    दसरा मेळाव्याच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी म्हटले की, आपल्याला आपला डाव खेळायचा आहे.


  • 12 Oct 2024 02:37 PM (IST)

    पंकजा मुंडे यांच्याकडून दाैऱ्याची घोषणा

    पंकजा मुंडे यांच्याकडून दाैऱ्याची घोषणा ही नुकताच करण्यात आलीये.

  • 12 Oct 2024 02:26 PM (IST)

    मैं गोपीनाथ मुंडे कि बेटी हूं…- पंकजा मुंडे

    दसऱ्या मेळाव्यातील भाषणात पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे.

  • 12 Oct 2024 02:19 PM (IST)

    पंकजाताईंनी खूप मोठा संघर्ष केलाय- धनंजय मुंडे

    दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी खूप मोठा संघर्ष केलाय.

  • 12 Oct 2024 02:14 PM (IST)

    जेवढे संत होऊन गेले त्यांनी कधी जातपात पाहिली नाही- धनंजय मुंडे

    शिवाजी महाराजांनी कधी जात पहिली नाही. हे राज्य कधी जातीपतीच नव्हतं. त्यांचे काम सर्व जाती धर्मासाठी होतं. मुंडे साहेबांचेही काम जाती धर्माचे नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 02:08 PM (IST)

    बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय- धनंजय मुंडे

    मी आज भारावून गेलोय, बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 02:06 PM (IST)

    सुजय विखे यांनी केले मोठे विधान

    लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे आमची लाडकी बहीण म्हणजे पंकजा ताई मुंडे आहे. मुंडे परिवारावर असच प्रेम असू द्या. संपूर्ण मुंडे कुटुंब व्यासपीठावर आलेले आहे. दोन्ही भाऊ बहिण महाराष्ट्रात अशीच प्रगती करत राहो, असे सुजय विखे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 01:59 PM (IST)

    अन्यायाविरोधात लढायला हिंदू धर्माने शिकवलं- मनोज जरांगे पाटील

    अन्यायाविरोधात लढायला हिंदू धर्माने शिकवलं. कायद्याने आणि संविधानाने शिकवलं, अन्याय सहन करायचा नाही. अन्याय होत असेल तर न्यायासाठी लढायचं हे शिकवलं, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 01:51 PM (IST)

    संयम धरा, विजय आपला नक्की आहे… मनोज जरांगे

    एखाद्या शब्दाची चूक झाली तर समाजाला ते सहन करावं लागेल. म्हणून मी गप्प बसतोय. नाही तर इथून हाणत हाणत निघालो तर गुजरात आणि हरियाणा, पानीपत आणि कटकपर्यंत हाणत हाणत जाणारा हा समाज आहे. तो समाज हा गप्प कसा आहे. आपल्याला टोकलं जात आहे. आपला विजय होत आहे. त्यामुळे संयम धरा. विजय नक्की आहे.

  • 12 Oct 2024 01:44 PM (IST)

    आता दाखवतो यांना कचका- मनोज जरांगे

    आता मग दाखवतो यांना कचका. आता दाखवतो यांना कचका. नाटकं करतात व्हय. करोडोच्या संख्येने समुदाय न्यायासाठी लढत आहे. जो समुदाय न्यायासाठी लढतोय त्यांच्या बाजूने न्याय करणारे लोकं नाहीत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 01:36 PM (IST)

    दिल्लीला वाकवणार- मनोज जरांगे

    नारायण गडानं जातीवाद न करण्याची शिकवण या गडाने दिली आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण या गडाने दिली आहे. या गडाची महिमा, किमया आणि आशीर्वाद ज्याच्या ज्याच्या पाठिवर पडतो तो दिल्लीही वाकवतो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

  • 12 Oct 2024 01:31 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्या भाषणाचा उत्सुक्ता- पंकजा मुंडे

    नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यात येण्यासाठी हेलिपॅडवर दाखल झाल्या आहेत.

  • 12 Oct 2024 01:31 PM (IST)

    मराठा समाजवर संस्कार- मनोज जरांगे

    मराठा समाजवर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही.

  • 12 Oct 2024 01:14 PM (IST)

    मनोज जरांगे यांना शुभेच्छा- संजय शिरसाट

    मागच्या वर्षी शरद पवार यांनी दसरा मेळावा घेतला होता यावर्षी मनोज रंगे पाटील दसरा मेळावा घेतात आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

  • 12 Oct 2024 01:03 PM (IST)

    मनोज जरांगे नारायण गडावर

    मनोज जरांगे नारायण गडावर दाखल झाले आहे. ते दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव नारायण गडावर आले आहेत.

  • 12 Oct 2024 11:54 AM (IST)

    बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल – माजी खासदार सुजय विखे पाटील यांची टीका

    बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल, अशी टीका माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.

    जातीपातीच्या राजकारणामुळे लोकसभेला माझा पराभव झाला आहे. मागासवर्गीय समाज, हिंदू मुस्लिम यांच्या मनात भिती निर्माण केली त्यामुळे माझा पराभव झाला.

  • 12 Oct 2024 11:41 AM (IST)

    यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलीपॅड वरून मेळावा स्थळापर्यंत ओपन जीप मधून जाणार

    यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलीपॅड वरून मेळावा स्थळापर्यंत ओपन जीप मधून जाणार आहेत.  मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडे या फुलांनी सजविण्यात आलेल्या ओपन जीप द्वारे मेळाव्यास्थळी जाणार आहेत. पंकजा मुंडे तसेच प्रीतम मुंडे एकाच रथातून मेळाव्यास्थळी जाणार आहेत.

  • 12 Oct 2024 11:21 AM (IST)

    खरी शिवसेना कोणती हे अख्खा महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊ

    खरी शिवसेना कोणती हे अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश जाणतो. दिल्लीच्या तख्तासमोर झुकून ज्यांनी खऱ्या शिवसेने सोबत बेइमानी करून पक्ष स्थापन केला त्यांना खरी शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाहीये, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

  • 12 Oct 2024 11:06 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील होमगार्ड्सना गिफ्ट

    देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील होमगार्ड्सना गिफ्ट देण्यात आलं आहे. मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता मानधन प्रतिदविस 570 रुपयांवरून 1083 रुपये करण्यात आलं आहे.

  • 12 Oct 2024 11:04 AM (IST)

    महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद, जागावाटपासंदर्भात होणार घोषणा ?

    महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. जागावाटपासंदर्भात उद्या महत्वाची घोषणा होऊ शकते. या पत्रकार परिषदेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Oct 2024 10:58 AM (IST)

    मनोज जरांगे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार?

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरुन कुणावर निशाणा साधणार हे थोड्याच वेळात समोर येईल. मराठा आंदोलनाचा मुद्दा अजूनही कायम आहे. ओबीसी प्रवर्गातून समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. ते काय बोलतात याकडे राजकीय नेत्यांचे पण लक्ष आहे.

  • 12 Oct 2024 10:50 AM (IST)

    हीच क्रांतीची वेळ-राज ठाकरे

    हीच क्रांतीची वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता. आणि नंतर ते शस्त्र बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. ज्यांनी सांभाळलंत त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली. शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, हीच ती क्रांतीची वेळ, असं राज ठाकरे यांनी जनतेला संबोधून म्हटलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

  • 12 Oct 2024 10:40 AM (IST)

    राज ठाकरे यांना राऊतांचा चिमटा

    तुमच्या मताशी प्रतारणा करण्यात आली असे राज ठाकरे म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अगदी बरोबर बोलत आहेत पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत ते उभे राहिले होते, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 12 Oct 2024 10:36 AM (IST)

    धनंजय मुंडे दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवान गडावर येणार

    अनेक वर्षांनी धनंजय मुंडे दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवान गडावर येणार आहे. थोड्याच वेळात कृषिमंत्री धनंजय मुंडे अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवान गडावर येणार. भगवानगडावर श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती.

  • 12 Oct 2024 10:17 AM (IST)

    संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा निशाणा

    खासदार संजय राऊत यांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच आहे. डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी घातला.

  • 12 Oct 2024 10:00 AM (IST)

    दुर्बलता हा अपराध, मोहन भागवत यांचे हिंदूंना मोठे आवाहन

    दुर्बलता हा अपराध आहे, हे हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे. जगात अशा काही घटना घडत आहेत. त्यात ही दुर्बलता हिंदूंसाठी घातक असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

  • 12 Oct 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News: आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देवून बाहेर पडलो – हसन मुश्रीफ

    आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देवून बाहेर पडलो… समरजितसिंह घाटगे मला निष्ठा शिकवणार का? हसन मुश्रीफ… हा कसला राजा हा तर भिकारी, हसन मुश्रीफांची घाटगेंवर टीका…

  • 12 Oct 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: शिवसेनेच्या वेगवेगळ्या दोन दसरा मेळाव्याने आज सर्वत्र मुंबई भगवीमय

    शिवसेनेच्या वेगवेगळ्या दोन दसरा मेळाव्याने आज सर्वत्र मुंबई भगवीमय झाली आहे.. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व मुख्य रस्त्यावर शिंदे गटाकडून बॅनर आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमा सिग्नल, फॅशन स्ट्रीट रोड, सीएसटी परिसर, जे जे फ्लाय ओव्हर, यासह मुंबईच्या सर्व रस्त्यावर शिवसेना दसरा मेळाव्याच्या बॅनर आणि झेंड्याने परिसर भगवा झाला आहे…

  • 12 Oct 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra News: मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज दसरा मेळावा

    बीड जिल्ह्यातील नारायण गडावर होणार दसरा मेळावा.. राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज नारायण गडावर येणार.. दुपारी बारा वाजता नारायण गडावरून मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात.. जरांगे पाटील आज सरकार आणि विरोधी पक्षावर काय निशाण साधतात यावर सर्वांचे लक्ष…

     

  • 12 Oct 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्याच्या निमित्ताने पथसंचलन

    पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्याच्या निमित्ताने पथसंचलन… स्वागतासाठी दुतर्फा नागरिकांची, महिलांची मोठी गर्दी… भगव्या ध्वजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागत… यावर्षी संघाचे शताब्दी वर्षात पदार्पण…

  • 12 Oct 2024 08:57 AM (IST)

    राज ठाकरे काय बोलणार?

    आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे संबोधित करणार आहेत. ‘राजमुद्रा’ या यूट्यूब चॅनेलवर राज ठाकरे यांचा पॉडकास्ट थोड्याच वेळात प्रसारित होणार आहे. या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • 12 Oct 2024 08:45 AM (IST)

    आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे

    मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही दसरा मेळाव्याला महत्व आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

  • 12 Oct 2024 08:35 AM (IST)

    ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात फुलांची सजावट

    पुण्याच्या आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात विजया दशमी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.  संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजलंय. हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. भजन- किर्तनाच्या कार्यक्रमात दंग झाले आहेत.

  • 12 Oct 2024 08:25 AM (IST)

    विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट

    आज दसऱ्याच्या निमित्त पंढरपुरात उत्साहाचं वातावरण आहे. विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा तसंच  मंदिराच्या इतर भागांना केसरी- पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा… आज दसरा सण… या निमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर आज दिवसभर दसरा मेळावे देखील पार पडणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा आयोजित केला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचाही मेळावा होणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.