अखेरच्या घटका मोजणाऱ्या दाऊदला मोठा धक्का, त्याच्या गावातीलच…

| Updated on: Dec 22, 2023 | 1:04 PM

दाऊद इब्राहिम गेल्या काही काळापासून आजारी... विषप्रयोग झाल्याच्या चर्चा... रुग्णालयात उपचार, प्रकृती गंभीर असल्याची बातमी.. आजारी दाऊदला मोठा धक्का.. रत्नागिरीतील त्याच्या गावातील.. दाऊदला कसला मोठा धक्का ? वाचा सविस्तर

अखेरच्या घटका मोजणाऱ्या दाऊदला मोठा धक्का, त्याच्या गावातीलच...
Follow us on

मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी | 22 डिसेंबर 2023 : कुख्यात गुन्हेगार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमच्या प्रकृतीसंदर्भातील उलटसुलट चर्चांनीच हा आठवडा उजाडला. पाकिस्तानातील कराचीमध्ये त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची बातमी समोर आल्याने एक च खळबळ माजली. तसेच त्याची प्रकृतीही गंभीर असून तो अखेरच्या घटना मोजत असल्याचे वृत्त समोर आले.

मात्र यात तथ्य नसल्याचे दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलने याने सांगितले. तसेच मुंबई पोलिसांनाही हा दावा फेटाळून लावला. मात्र आता याच दाऊदला एक मोठा धक्का बसला आहे. मूळचा भारतात जन्मलेला दाऊद गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमध्ये लपला आहे. मात्र असे असले तरीही भारतात त्याची बरीच मालमत्ता असून आता त्याच्या मालकीच्या असलेल्या जागेचा लिलाव होणार आहे.

रत्नागिरीतील जागेचा होणार लिलाव

हे सुद्धा वाचा

दाऊद इब्राहिम याच्या नावावर असलेल्या जागेचा पुढल्या महिन्यात, म्हणजेच 5 जानेवारी 2024 रोजी लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी मुंबके येथील चार जागांचा लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिमच्या नावावर चार शेत जमिनी असून जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव होईल. त्या चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे.

मुंबके परिसरातील दाऊद इब्राहिम याच्या चार जागा सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. 21 नोव्हेंबर 2023 रोजी या लिलावाबाबत सराकारतर्फे नोटीस काढण्यात आली होती. आता 5 जानेवारीला या जागांचा लिलाव होईल.

विषप्रयोग झाल्याच्या बातमीने माजली होती खळबळ

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली. दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्याने त्याच्यावर कराचीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आल. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दाऊदबद्दलची कुठलीही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तिथे गूगल सर्विसेज, ट्विटर एकूणच सोशल मीडिया डाऊन करण्यात आलं. इंटरनेटही ठप्प झालं. पाकिस्तानी पत्रकार आरजू कासमीने दाऊदची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून जगभरात याच विषयावर चर्चा सुरू होती.

पण त्यानंतर दाऊदचा अगदी जुना, खास आणि विश्वासू सहकारी छोटा शकील याने याबाबतचं वृत्त दिलं.छोटा शकीलने दाऊदच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘भाई (दाऊद) 1000 टक्के फिट आहे’ असा दावा केला. दाऊदच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा, सर्व वृत्त निराधार असल्याचा पुनरुच्चार शकीलने केला. . ‘दाऊदला विषबाधा झालेल नाही, ना त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो एक हजार टक्के ठणठणीत आणि फिट आहे. त्याच्याबद्दल येणाऱ्या बातम्या या निराधार आहेत’ असे छोटा शकीलने सांगितले.