“श्रध्दा आणि सबुरी ठेवा…”, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदेंचा मोलाचा सल्ला

| Updated on: Dec 16, 2024 | 9:46 AM

मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी नाराज झालेल्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

श्रध्दा आणि सबुरी ठेवा..., मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदेंचा मोलाचा सल्ला
एकनाथ शिंदे
Follow us on

Maharashtra Cabinet Minister 2024 : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी आता महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी नाराज झालेल्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं

शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी राजभवनावर न जाता ते थेट हॉटेलमधूनच बॅग पॅक करुन निघून गेले. तसेच प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर या शिंदे गटाच्या आमदारांचीही मंत्रि‍पदाची संधी हुकली आहे. त्यामुळे आता शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी नाराज झालेल्यांना एक मोठा सल्ला दिला आहे. “श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं दिली जातील”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल

“मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार केला जाईल. काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल. योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

दीपक केसरकरांचे कौतुक

दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली आहे, त्यांचेही एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. तर , नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटातून सुरू आहे. तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेतील मंत्र्यांची यादी

1 शिवसेना दादा भूसे
2 शिवसेना गुलाबराव पाटील
3 शिवसेना संजय राठोड
4 शिवसेना उदय सांमत
5 शिवसेना शंभूराज देसाई
6 शिवसेना प्रताप सरनाईक
7 शिवसेना योगेश कदम
8 शिवसेना आशिष जैस्वाल
9 शिवसेना भरत गोगावले
10 शिवसेना प्रकाश आबिटकर
11 शिवसेना संजय शिरसाट