उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे जिल्हा पातळीवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांबाबतही निर्णय घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसंच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलाय.(Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple)
राज्यातील मंदिरं सुरु केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात रोज 20 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता ही संख्या निम्यावर आणण्यात आली आहे. आता रोज फक्त 10 हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर 2 हजार पेड पास दिले जातील. त्याचबरोबर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे 3 दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे हे 3 दिवस आणि मोठ्या सण, उत्सवाला 30 हजार मोफत पास दिले जात होते. तर इतर दिवशी 20 हजार मोफत पास दिले जात होते. पण आता ही संख्या निम्म्यावर आणण्यात येणार आहे.
विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, त्यामुळे ही शहरं अॅलर्ट झालीत.
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील(Aurangabad सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय
मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन
Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple