नागपूर : गोपीचंद पडळकर म्हणाले सभागृहात मी तारांकित प्रश्न टाकलेला होता. देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देशात सर्वांना माहीत आहे. अहिल्याबाईंना शस्त्र आणि शास्त्र घेऊन राज्यकारभार केला. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे जिर्णोद्धार अहिल्यादेवी यांनी केलेला देशाला माहिती आहे. १२ जोतीर्लिंग घाटबांधणी असे अनेक विषय अहिल्यादेवी यांच्या हातून झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेस्वराच्या मंदिरात अहिल्यादेवी यांचा पुतळा तयार केला. केंद्र सरकारनं ही दखल घेतली. राज्य सरकारनंही अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावं, अशी मागणी केली.
सरकारच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,सरकार अहिल्यादेवी यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्याबाबत सकारात्मक आहे. तसा अहवाल आयुक्त अहमदनगर, रेल्वे प्रमुख, पोस्ट खात्याचे प्रमुख यांच्याकडून तसा अहवाल मागितला आहे.
अहिल्यादेवी यांचं नाव किती दिवसात देण्यात येईल, असं विचारलं असता येत्या काही दिवसांत कॅबिनेटसमोर हा विषय आणू. परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवू, असं सांगण्यात आल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.सरकारच्या वतीनं सकारात्मक भूमिका घेतली आहे. अहिल्यादेवींवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करत असल्याचंही पडळकर म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या बाबतीत अग्रेसर भूमिका घेतली ते नवसाजी नाईक. इंग्रज आणि निजामांविरोधत नवसाजी नाईक हे ताकदीनं लढले होते. यांचा इतिहास महाराष्ट्रातील लोकांच्या समोर यावा. इसापूर जलाशयाला नवसाजी नाईक यांना नाव देण्यात यावं. अशी मागणी सभागृहात केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी यालाही सकारात्मक उत्तर दिलं आहे. नामकरण करण्यात येईल, असं उत्तर सरकारच्या वतीनं देण्यात आल्याचंही पडळकर यांनी सांगितलं.